काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे

गेमिंगच्या चाहत्यांसाठी नुकताच टेंसेंट गेम्स ने Call of Duty मोबाईल गेम 1 ऑक्टोबरला अधिकृतपणे रिलीज केला होता. पबजी प्रमाणे या गेम ने खूप कमी दिवसांत रेकॉर्ड केला आहे. गेम कमी वेळात 3.5 कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाला आहे. हा गेम Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म साठी उपलब्ध आहे.

भारतात पण हा मोबाईल गेम कमी काळात खूप प्रसिद्ध झाला आहे. हा गेम 100 पेक्षा जास्त देशात उपलब्ध केला आहे. Activision च्या रिपोर्टने याचा खुलासा केला आहे. रिपोर्ट नुसार Call of Duty मोबाईल ऍप इतर ऍपच्या तुलनेत सर्वात कमी काळात इतके डाउनलोड करण्यात आले आहेत.

अनेक दिवस हा गेम Beta वर्जन वर चालू होता आणि निवडक प्लेयर्सना हा खेकता येत होता. आता हा गेम सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. Call of Duty: Mobile एक फ्री टू प्ले गेम आहे ज्यात तुम्हाला पॅक्स मॅप्स, मोड्स, हत्यारे मिळतात. या गेमची टक्कर भारतात सर्वात पॉप्यूलर मोबाईल गेम पबजीशी आहे.

विशेष म्हणजे प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे पबजी गेमची लोकप्रियता आज शिखरावर आहे. अलीकडेच गूगल ने पण PUBG मोबाईलला बेस्ट गेम ऑफ द ईयरचा अवॉर्ड दिला होता, जो गूगल प्ले वर आता पर्यंत 200 मिलियन पेक्षा जास्त वेळा (20 कोटीपेक्षा जास्त) डाउनलोड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here