मोबाईल यूजर म्हणतात कि ‘सध्या पबजीचे वेड आहे’, पण जरा विचार करा कि खरंच पबजीची क्रेज आहे कि दुसरं काही आहे? माझ्या मते याचे उत्तर असे असेल कि पबजी तर चर्चेत पण क्रेज मोबाईल गेमची आहे. ऑफिस, घर, बस, ट्रेन, मेट्रो आणि विमानात पण लोक गेम खेळताना दिसतात. त्याचे कारण असे कि आता लोकांच्या हातात दमदार मोबाईल फोन आले आहेत. एकेकाळी 512 एमबी रॅम जास्त वाटायचा पण आज 4,6 आणि 8जीबी रॅम असलेले फोन बजेट मध्ये आहेत ज्यात 6 इंचाच्या मोठ्या स्क्रीन सह 64 जीबी आणि 128 जीबी मेमरी असते. त्याचबरोबर ताकदवान ऑक्टाकोर प्रोसेसर सह जीपीयू अर्थात ग्राफिक्स प्रोसेसर यूनिट पण असतो जो हेवी ग्राफिक्स मोबाईल मध्ये सहज रेंडर करतो. याच गोष्टींमुळे मोबाईलचा वापर बदलला आहे. गेल्या काही वर्षांत मोबाईल गेमचे क्रेज झपाटयाने वाढले आहे ज्यात पबजी सर्वात जास्त आहे. परंतु जर तुम्ही गेमचे चाहते असाल तर फक्त पबजी का? अजूनही अनेक शानदार गेम आहेत जे पबजी पेक्षा चांगले म्हटले जातात. पुढे आम्ही अश्या 5 दमदार गेम्सची माहिती दिली आहे जे पबजीसाठी चांगला पर्याय म्हणून उपलब्द आहेत तसेच यात पण तुम्हाला फक्त लढाई करायची आहे.

‘वॉर’ म्हणजे युद्धासाठी यापेक्षा चांगला गेम असू शकत नाही. Call of Duty®: Mobile गेमची सुरवात पीसी पासून झाली होती. 2003 मध्ये हा बनवण्यात आला होता आणि तेव्हा दुसऱ्या महायुद्धाची थीम होती पण नंतर याचे अनेक वर्जन आले आणि दरवेळी हा अपग्रेड होत गेला. अलीकडेच याचा मोबाईल वर्जन आला आहे तोही तितकाच चांगला आहे. याचे ग्राफिक्स शानदार आहेत आणि खूप लढाई आहे. असे पण बोलले जाते कि याचे कंट्रोल पबजी पेक्षा जास्त चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही खूप हा गेम खेळू शकता.
बेस्ट बॅटलग्राउंड ऍप किंवा मग पबजी गेमच्या ऑप्शन बद्दल बोलायचे तर Garena Free Fire: Spooky Night चा उल्लेख करावाच लागेल. यात 50 लोकांसह तुम्हाला हा गेम खेळावा लागतो. एका बेटावर तुम्हाला सोडले जाते तुम्हाला सर्वांना मारायचे आहे. जो शेवटी वाचतो तो विजेता. यात तुम्ही स्टार्टींग पोजिशन निवडू शकता आणि हत्यार पण अपग्रेड करू शकता. तुम्हाला हा गेम खेळून खूप मजा येईल.
हे देखील वाचा: काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे
Fortnite गेम पण काही कमी नाही. यात 100 प्लेयर्स सोबत तुम्हाला लढायचे आहे. तुम्हाला एका बेटावर सोडण्यात येईल जिथे तुम्हाला युद्धासाठी आवश्यक सर्व सामान गोळा करायचे आहे आणि मग आपलं हत्यार घेऊन लढायचे आहे. क्षणाक्षणाला धोका असेल. या गेम मध्ये पण तुम्हाला खूप मजा येईल. सध्या हा गेम एंडरॉयड यूजर साठी उपलब्ध नाही, आईओएस वर डाउनलोड करता येईल.
RULES OF SURVIVAL गेम पबजी मोबाईलशी मिळता जुळत आहे. परंतु यात युद्ध करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त सामान मिळते. तुम्हाला सर्वात आधी विमानाने एखाद्या ठिकाणी सोडले जाते आणि तिथे स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला सामान गोळा करावे लागेल. त्यानंतर काही लोकांना मारून जिवंत राहावे लागेल. यात तुम्हाला 120 लोकांशी भिडावे लागेल आणि त्यासाठी सर्व प्रयत्न करावे लागतील. पबजी मोबाईल पेक्षा जास्त यात हत्यार मिळतील. तसेच गाड्या पण जास्त आहेत. सुरवातीला थोडा त्रास होईल पण मजा येईल.
हे देखील वाचा: आता होणार धमाल! PUBG Mobile Lite झाला भारतात लॉन्च
पबजी मोबाईलचा दुसरा पर्याय म्हणून Battlelands Royale पण खूप चांगला आहे. यात लढाई तर तुम्हाला 32 लोकांशी कारवी लागेल पण हा गेम सोप्पा नाही. यात अनेक स्टेज आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला 3—5 मिनिटे लागतील पण कधी कधी जास्त वेळ लागतो. तुम्हाला फक्त आपल्या क्षत्रूंना मारायचे नाही तर नवीन हत्यार शोधायचे आहेत ज्यामुळे तुमची ताकद वाढेल. यात कॅरेक्टर अपग्रेड करता येईल, तसेच मॅप आणि रोड सहित इतर अनेक गोष्टी मिळतील. एकंदरीत तुम्हाला जोरदार कधी करायची आहे ज्यात तुमचे मनोरंजन होईल.


















