Charger - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Dec 2019 14:34:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/new-fast-charge-technology/ https://www.91mobiles.com/marathi/new-fast-charge-technology/#respond Tue, 03 Dec 2019 14:34:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5953 रिपोर्टनुसार हुवावे P30 मध्ये इस टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.

The post गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या स्मार्टफोन मध्ये अनेक प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे. पण सर्व टेक्नॉलॉजीच्या मध्ये हँडसेट मध्ये फास्ट चार्जिंग एक असा फीचर आहे जो जवळपास सर्वांची गरज आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने कमी वेळात फोन चार्ज केला जाऊ शकतो. सध्या शाओमी आणि वीवो पण आपल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी वर काम करत आहे. आणि यूनीवर्सिटी ऑफ साइंस अँड टेक्नॉलजी ऑफ चाइनाचे प्रोफेसर हुआंग युनहुई ने एक नवीन टेक्नॉलजी सादर केली आहे जी स्मार्टफोन फक्त 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल.

हि टेक्नोलॉजी प्रोफेसरने पेकिंग यूनिवर्सिटी ग्लोबल अलुमनी फोरम मध्ये प्रदर्शित केली आहे. हि नवीन टेक्नॉलजी ‘कंस्ट्रक्शन आणि सिनर्जी मॅकॅनिज्म ऑफ हाई परफॉर्मेंस कंपोजाइट इलेक्ट्रोड मटेरियल्स फॉर एनर्जी स्टोरेज’ प्रजेक्टचा भाग आहे. रिपोर्टनुसार हुवावे P30 मध्ये इस टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.

शाओमी आणि वीवो पण आपल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी वर काम करत आहे. वीवोचा दावा आहे कि कंपनी 120W फास्ट चार्जिंग (फ्लॅश चार्ज) टेक्नॉलजी वर काम करत आहे. शाओमीने पण एक खास टेक्नॉलजी सादर केली आहे. शाओमीच्या या टेक्नॉलजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होईल.

शाओमी आपल्या 100 W सुपर चार्ज टर्बो टेक्नॉलजी वर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे आणि या वर्षांच्या सुरवातीला कंपनीने हि लोकांसमोर ठेवली होती. शाओमीने डेवेलपर कॉन्फ्रेंस मध्ये 100 W फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी सादर केली होती.

Vivo ने Super FlashCharge 120W टेक्नोलॉजी सादर केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000एमएएच बॅटरी च्या बॅटरीला सपोर्ट करणारा स्मार्टफोन या टेक्नॉलॉजी द्वारे फक्त 5 मिनिटांतच 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. या एडवांस टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर Super FlashCharge नवीन चार्ज पंप टेक्नॉलॉजी द्वारे 120W (20V/6A) पर्यंतच्या स्पीडने फोन चार्ज करते. हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या एडप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबतच चालते. तसेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) चार्जिंग दरम्यान विजेचा वॉल्ट कंट्रोल करून बॅलेंस करते.

फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीयेत्या काळात अजून चांगली होताना दिसत आहे. सध्या फास्ट चार्जिंग वायरलेस चार्जिंगपेक्षा चांगली मानली जाते. वेळ कमी असल्यामुळे आणि फोनच्या गरजेमुळे फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी खूप यशस्वी पण झाली आहे.

The post गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-fast-charge-technology/feed/ 0
चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/smartphone-will-charge-by-walk-kinetic-energy-delhi-student-develop-new-techno-gadget-make-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-will-charge-by-walk-kinetic-energy-delhi-student-develop-new-techno-gadget-make-in-india/#respond Fri, 29 Mar 2019 15:23:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3971 दोन प्रोटोटाईप प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले होते.

The post चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्सची टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. फोनचा लुक आणि डिजाईन सोबतच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण एडवांस झाले आहेत. लो बजेट फोन असो वा ​हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस सर्वांमध्ये जीव ओतण्याचे काम करते फोनची बॅटरी. जास्तीत जास्त बॅकअप देण्यासाठी स्मार्टफोन ब्रँड फोन मध्ये मोठी बॅटरी देतात जे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतात. पण हे चार्ज करण्यासाठी तुम्हाला प्लग इन करावेच लागते. पण जरा विचार करा तुमच्या चालण्यामुळे तुमचा मोबाईल चार्ज होऊ लागला तर कसे वाटेल. वाचताना निश्चितच वेगळे किंवा अशक्य वाटत असेल पण हि टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. आणि तुम्हाला ऐकून आनंद होईल कि हि अनोखी टेक्नॉलॉजी शोधणारे अमेरिका किंवा चीन मधले नसून भारताची राजधानी दिल्ली मध्ये राहणारी 2 मुलं आहेत.

हे तर सर्वांनाच माहित आहे कि मोबाईलमुळे जीवनशैली एडवांस तर झाली आहे पण फोनच्या वापराने लोकांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम पण झाला आहे. मोबाईल मध्ये गेम आणि इंटरनेटमुळे लोकांची मेहनत कमी झाली आहे. फोन बारीक होत आहेत आणि वापरकर्ते जाड. याच विचाराने दिल्लीच्या दोन किशोरवयीन मुलांना नवीन टेक्नॉलॉजी निर्माण करण्यास प्रेरणा दिली आहे. या मुलांची नावे आहेत मोहक भल्ला आणि आनंद गंगाधरन.

चालण्यामुळे होईल फोन चार्ज
मोहक आणि आनंद यांनी एका अश्या गॅजेटची निर्मिती केली आहे जो तुमच्या चालण्यामुळे निर्माण होणाऱ्या उर्जेला विद्युत ऊर्जेत रूपांतरित करून फोनची बॅटरी चार्ज करेल. दोन्ही युवकांनी बनवलेला हा गॅजेट सध्या प्रोटेटाईप स्टेज वर आहे. हा डिवाईस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या सिद्धांतावर चालतो. हा डिवाईस बुटांमध्ये टाचेखाली असेल, ज्यात एक डायनामो आहे जो बफर मॅक्नेजिम वर चालतो. जेव्हा व्यक्ति चालतो तेव्हा हा फिरतो. चालताना हा फिरून कायनेटिक एनर्जी निर्माण करतो. हि पावर केबल द्वारे मोबाईल पर्यंत पोहचवली जाते जी विजेट रूपांतरित होऊन फोनची बॅटरी चार्ज होते.

10वीच्या मुलांचा कारनामा
आनंद आणि मोहक यांना हि कल्पना 4 वर्षांपूर्वी सुचली होती जेव्हा ते 10वीत होते. फिजिक्सच्या एका प्रोजेक्ट साठी त्यांनी या गॅजेट वर काम करायला सुरवात केली होती. शाळा शिक्षक आणि कुटुंबाच्या मदतीने त्यांनी अश्या डिवाईसची निर्मिती केली जो चालल्यावर निर्माण झालेल्या एनर्जीने फोन चार्ज करू शकतो. विशेष म्हणजे या गॅजेटची निर्मिती पहिल्या दुसऱ्या नव्हे तर तिसऱ्या प्रयत्नात झाली होती. दोन प्रोटोटाईप प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले होते.

फक्त 500 रुपये असेल कॉस्ट
मोहक आणि आनंद आज कॉलेज मध्ये शिकत आहेत. ते म्हणतात कि येत्या काही दिवसांत हा प्रोटोटाईप पूर्णपणे डेवेलप होऊन बाजारात येईल. या एडवांस टेक्नॉलॉजी वाल्या गॅजेटची किंमत पण जास्त नसेल. 500 रुपयांच्या किंमतीत हा डिवाईस सहज विकत घेता येईल.

सोर्स

The post चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-will-charge-by-walk-kinetic-energy-delhi-student-develop-new-techno-gadget-make-in-india/feed/ 0