गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन

सध्या स्मार्टफोन मध्ये अनेक प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे. पण सर्व टेक्नॉलॉजीच्या मध्ये हँडसेट मध्ये फास्ट चार्जिंग एक असा फीचर आहे जो जवळपास सर्वांची गरज आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने कमी वेळात फोन चार्ज केला जाऊ शकतो. सध्या शाओमी आणि वीवो पण आपल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी वर काम करत आहे. आणि यूनीवर्सिटी ऑफ साइंस अँड टेक्नॉलजी ऑफ चाइनाचे प्रोफेसर हुआंग युनहुई ने एक नवीन टेक्नॉलजी सादर केली आहे जी स्मार्टफोन फक्त 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल.

हि टेक्नोलॉजी प्रोफेसरने पेकिंग यूनिवर्सिटी ग्लोबल अलुमनी फोरम मध्ये प्रदर्शित केली आहे. हि नवीन टेक्नॉलजी ‘कंस्ट्रक्शन आणि सिनर्जी मॅकॅनिज्म ऑफ हाई परफॉर्मेंस कंपोजाइट इलेक्ट्रोड मटेरियल्स फॉर एनर्जी स्टोरेज’ प्रजेक्टचा भाग आहे. रिपोर्टनुसार हुवावे P30 मध्ये इस टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.

शाओमी आणि वीवो पण आपल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी वर काम करत आहे. वीवोचा दावा आहे कि कंपनी 120W फास्ट चार्जिंग (फ्लॅश चार्ज) टेक्नॉलजी वर काम करत आहे. शाओमीने पण एक खास टेक्नॉलजी सादर केली आहे. शाओमीच्या या टेक्नॉलजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होईल.

शाओमी आपल्या 100 W सुपर चार्ज टर्बो टेक्नॉलजी वर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे आणि या वर्षांच्या सुरवातीला कंपनीने हि लोकांसमोर ठेवली होती. शाओमीने डेवेलपर कॉन्फ्रेंस मध्ये 100 W फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी सादर केली होती.

Vivo ने Super FlashCharge 120W टेक्नोलॉजी सादर केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000एमएएच बॅटरी च्या बॅटरीला सपोर्ट करणारा स्मार्टफोन या टेक्नॉलॉजी द्वारे फक्त 5 मिनिटांतच 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. या एडवांस टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर Super FlashCharge नवीन चार्ज पंप टेक्नॉलॉजी द्वारे 120W (20V/6A) पर्यंतच्या स्पीडने फोन चार्ज करते. हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या एडप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबतच चालते. तसेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) चार्जिंग दरम्यान विजेचा वॉल्ट कंट्रोल करून बॅलेंस करते.

फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीयेत्या काळात अजून चांगली होताना दिसत आहे. सध्या फास्ट चार्जिंग वायरलेस चार्जिंगपेक्षा चांगली मानली जाते. वेळ कमी असल्यामुळे आणि फोनच्या गरजेमुळे फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी खूप यशस्वी पण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here