चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी

स्मार्टफोन्सची टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. फोनचा लुक आणि डिजाईन सोबतच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण एडवांस झाले आहेत. लो बजेट फोन असो वा ​हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस सर्वांमध्ये जीव ओतण्याचे काम करते फोनची बॅटरी. जास्तीत जास्त बॅकअप देण्यासाठी स्मार्टफोन ब्रँड फोन मध्ये मोठी बॅटरी देतात जे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतात. पण हे चार्ज करण्यासाठी तुम्हाला प्लग इन करावेच लागते. पण जरा विचार करा तुमच्या चालण्यामुळे तुमचा मोबाईल चार्ज होऊ लागला तर कसे वाटेल. वाचताना निश्चितच वेगळे किंवा अशक्य वाटत असेल पण हि टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. आणि तुम्हाला ऐकून आनंद होईल कि हि अनोखी टेक्नॉलॉजी शोधणारे अमेरिका किंवा चीन मधले नसून भारताची राजधानी दिल्ली मध्ये राहणारी 2 मुलं आहेत.

हे तर सर्वांनाच माहित आहे कि मोबाईलमुळे जीवनशैली एडवांस तर झाली आहे पण फोनच्या वापराने लोकांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम पण झाला आहे. मोबाईल मध्ये गेम आणि इंटरनेटमुळे लोकांची मेहनत कमी झाली आहे. फोन बारीक होत आहेत आणि वापरकर्ते जाड. याच विचाराने दिल्लीच्या दोन किशोरवयीन मुलांना नवीन टेक्नॉलॉजी निर्माण करण्यास प्रेरणा दिली आहे. या मुलांची नावे आहेत मोहक भल्ला आणि आनंद गंगाधरन.

चालण्यामुळे होईल फोन चार्ज
मोहक आणि आनंद यांनी एका अश्या गॅजेटची निर्मिती केली आहे जो तुमच्या चालण्यामुळे निर्माण होणाऱ्या उर्जेला विद्युत ऊर्जेत रूपांतरित करून फोनची बॅटरी चार्ज करेल. दोन्ही युवकांनी बनवलेला हा गॅजेट सध्या प्रोटेटाईप स्टेज वर आहे. हा डिवाईस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या सिद्धांतावर चालतो. हा डिवाईस बुटांमध्ये टाचेखाली असेल, ज्यात एक डायनामो आहे जो बफर मॅक्नेजिम वर चालतो. जेव्हा व्यक्ति चालतो तेव्हा हा फिरतो. चालताना हा फिरून कायनेटिक एनर्जी निर्माण करतो. हि पावर केबल द्वारे मोबाईल पर्यंत पोहचवली जाते जी विजेट रूपांतरित होऊन फोनची बॅटरी चार्ज होते.

10वीच्या मुलांचा कारनामा
आनंद आणि मोहक यांना हि कल्पना 4 वर्षांपूर्वी सुचली होती जेव्हा ते 10वीत होते. फिजिक्सच्या एका प्रोजेक्ट साठी त्यांनी या गॅजेट वर काम करायला सुरवात केली होती. शाळा शिक्षक आणि कुटुंबाच्या मदतीने त्यांनी अश्या डिवाईसची निर्मिती केली जो चालल्यावर निर्माण झालेल्या एनर्जीने फोन चार्ज करू शकतो. विशेष म्हणजे या गॅजेटची निर्मिती पहिल्या दुसऱ्या नव्हे तर तिसऱ्या प्रयत्नात झाली होती. दोन प्रोटोटाईप प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले होते.

फक्त 500 रुपये असेल कॉस्ट
मोहक आणि आनंद आज कॉलेज मध्ये शिकत आहेत. ते म्हणतात कि येत्या काही दिवसांत हा प्रोटोटाईप पूर्णपणे डेवेलप होऊन बाजारात येईल. या एडवांस टेक्नॉलॉजी वाल्या गॅजेटची किंमत पण जास्त नसेल. 500 रुपयांच्या किंमतीत हा डिवाईस सहज विकत घेता येईल.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here