Chinese Mobile Brands - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 21 Sep 2020 12:18:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतीय यूजर्सना नको आहेत Nokia चे स्मार्टफोन, जाणून घ्या यामागील कारणे https://www.91mobiles.com/marathi/5-point-disappointed-about-nokia-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-point-disappointed-about-nokia-smartphone-in-india/#respond Tue, 11 Aug 2020 11:31:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7769 जे लोक नोकियाचा फोन वापरात आहेत ते लोक इतरांना Nokia फोन विकत न घेण्याचा सल्ला देत आहेत.

The post भारतीय यूजर्सना नको आहेत Nokia चे स्मार्टफोन, जाणून घ्या यामागील कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही महिन्यात चीनी मोबाईल कंपन्या आणि ब्रँड्सकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला आहे. एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेताना इंडियन यूजर्स तो चायनीज ब्रँडचा नसावा असा प्रयत्न करत आहेत. भारतीय बाजारात चीनी कंपन्यांचा बोलबाला आहे आणि त्यामुळे नॉन-चायनीज ब्रँड्सचे पर्याय पण कमी आहेत. Xiaomi, Oppo, Vivo, Realme आणि OnePlus सारख्या हिट चीनी ब्रँड्सच्या समोर Samsung, Apple आणि Nokia सारख्या निवडक कंपन्या आहेत ज्यांच्याकडे भारतीयांचे लक्ष जाते. बायकॉट चायनाचा लाभ Samsung ला मिळत आहे पण भारतीय Nokia पासून लांब राहत आहेत. यूजर्सना फोन विकत घ्यायचे आहेत पण नोकिया अपेक्षा पूर्ण करत नाही. पुढे आम्ही असे काही मुद्दे सांगितले आहेत ज्यात जर काही सुधार झाला तर भारतीय यूजर्स Nokia वर पुन्हा आधीसारखा विश्वास ठेऊ लागतील.

कमी आहे रॅम

Nokia जेव्हा नवीन फोन लॉन्च करते तेव्हा त्यात 3 जीबी किंवा 4 जीबी रॅम मिळतो. तर दुसरीकडे चीनी ब्रँड्स त्याच बजेटच्या आसपास 6 जीबी ते 8 जीबी रॅम असलेले फोन्स देतात. भारतीय ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट मध्ये 4 जीबी पेक्षा कमी रॅम पुरेसा वाटत नाही. आणि याच कारणामुळे भारतात Nokia एक चांगला पर्याय म्हणून बघितला जात नाही. मग त्या फोनचा प्रोसेसर किंवा जीपीयू चीनी ब्रँडच्या तुलनेत जास्त दमदार असलातरी जास्त रॅम इंडियन यूजर्स चांगल्या परफॉर्मंसची निशाणी समजतात. नोकिया ब्रँडच्या मिड बजेट फोन मध्ये 6 जीबी किंवा 8 जीबी रॅम नसल्यामुळे नोकिया फॅन्सची निराश होते.

बॅटरीची पावर कमी

सध्या स्मार्टफोन्स मध्ये 4,000एमएएच व यापेक्षा जास्त पावर सामान्य झाली आहे. गेल्या काही दिवसांत Samsung आणि Realme ने स्वस्तात 6,000एमएएच बॅटरी असलेले फोन आणून या सेग्मेंटला नवीन दिशा दिली आहे. पण असे असूनही Nokia या शर्यतीत कुठेही दिसत आहे. हैराणीची बाब म्हणजे सध्या भारतात कोणताही असा नोकिया स्मार्टफोन नाही ज्यात 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. दुसरीकडे चीनी कंपन्या 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत 5,000एमएएच बॅटरी असलेले फोन्स लॉन्च करतात. Nokia स्मार्टफोन्स मध्ये कमी एमएएच पावरची बॅटरी असल्याने कंपनीचे फॅन्स निराश होतात आणि हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे भारतीय यूजर नवीन फोन घेताना नोकियाला बाजूला ठेवतात.

मर्यादित मॉडेल्स

एकीकडे चीनी कंपन्या जवळपास प्रत्येक महिन्याला एखादा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणतात. याउलट Nokia कंपनी वर्षभरात नेमकेच मोबाईल फोन्स भारतात लॉन्च करते. चीनी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या अनेक सीरीज बाजारात उपलब्ध आहेत ज्या प्रत्येक प्राइस रेंज व बजेट मध्ये ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देतात. पण Nokia फोनचे मर्यादित मॉडेल्स यूजर्सच्या निवड क्षमतेवर बंधन आणतात. इंडियन यूजर्स कोणतीही वस्तू घेताना खासकरून मोबाईल फोन घेण्याआधी सर्व पैलू तपासून घेतात आणि त्यामुळे नोकियाचे मोजकेच मॉडेल्स ग्राहकांना दुसऱ्या कंपनी व ब्रँडकडे जाण्यास भाग पाडतात.

किंमत

Nokia आपले स्मार्टफोन्स भारतात वाजवी दरात लॉन्च करते. कंपनीचे बरेचशे फोन मिड बजेट मध्ये येतात जे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर विक्रीसाठी उपलब्ध होतात. नोकिया स्मार्टफोन महाग असतात हे म्हणणे चुकीचे ठरेल. पण बाजारात उपलब्ध असेलेल्या इतर ब्रँड्स व चीनी कंपन्यांच्या मोबाईल्सच्या कमी किंमती Nokia च्या प्रोडक्ट्सना इतरांपेक्षा महाग बनवतात. जे फीचर्स ग्राहकांना 8,000 ते 10,000 रुपयांमध्ये मिळतात त्यासाठी इंडियन यूजर्सना 15,000 रुपये खर्च करणे आवडत नाही. जे लोक Nokia ब्रँडसाठी जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात त्यांना पण हि रक्कम जास्त वाटत तसेच स्पेसिफिकेशन्स मध्ये पण तडजोड करावी लागते.

आफ्टर सेल सर्विसची तक्रार

Nokia यूजर्सच्या मते फोन विकत घेतल्यानंतर जर तो बिघडला तर तो दुरुस्त करण्यासाठी सर्विस सेंटरच्या अनेक चकरा माराव्या लागतात. वॉरंटी मध्ये असूनही फोन सर्विस सेंटर वर दिल्यावर तो दुरूस्त होण्यास एक महिना लागतो. सध्या 1 दिवस पण फोनविना राहणे कठीण आहे त्यामुळे स्वतःचा फोन दुरुस्त करण्यासाठी 1 महिन्याची वाट बघावी लागणे कोणाला आवडेल. यूजर्सनुसार Nokia ची आफ्टर सेल सर्विस चांगली नाही आणि सर्विस सेंटर्स वर पण व्यवस्था चांगली नाही. हे एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे जे लोक नोकियाचा फोन वापरात आहेत ते लोक इतरांना Nokia फोन विकत न घेण्याचा सल्ला देत आहेत.

The post भारतीय यूजर्सना नको आहेत Nokia चे स्मार्टफोन, जाणून घ्या यामागील कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-point-disappointed-about-nokia-smartphone-in-india/feed/ 0
चायनीज फोन वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी करावा लागेल जास्त खर्च https://www.91mobiles.com/marathi/phone-repair-cost-increased-in-india-shortage-of-chinese-mobile-parts/ https://www.91mobiles.com/marathi/phone-repair-cost-increased-in-india-shortage-of-chinese-mobile-parts/#respond Wed, 15 Jul 2020 10:41:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7647 भारतात सुरु असलेल्या अँटी-चायना लाटेत चीनी ब्रँड्सच्या स्मार्टफोनच्या विक्रीवर परिणाम होताना दिसत आहे.

The post चायनीज फोन वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी करावा लागेल जास्त खर्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात बायकॉट चायना मोहीम सुरु आहे. लोक एकमेकांना चीनी ब्रँड्सचे स्मार्टफोन विकत न घेण्याचा सल्ला देत आहेत. सोशल मीडिया वर पण चीनी कंपन्यांबाबत वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर जेव्हा आम्ही एखादी टेक्नोलॉजी क्षेत्राशी संबंधित बातमी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रकाशित करतो तेव्हा 91मोबाईल्सला पण काही लोक देशभक्तीच्या तराजू मध्ये तोलत आहेत. चीन विरुद्ध निर्माण झालेल्या या रागामुळे Xiaomi, Realme, Oppo आणि Vivo सारख्या ब्रँड्सच्या मार्केटिंग वर परिणाम तर झाला आहे पण या मोहिमेचा परिणाम त्या भारतीय यूजर्सच्या खिश्यावर होणार आहे जे आधीपासून एखाद्या चीनी कंपनीचा मोबाईल वापरात आहेत.

भारतात सुरु असलेल्या अँटी-चायना लाटेत चीनी ब्रँड्सच्या स्मार्टफोनच्या विक्रीवर परिणाम होताना दिसत आहे. लोक चीनी कंपन्यांद्वारे निर्मित स्मार्टफोन्स घेणे टाळत आहेत आणि Samsung सारख्या इतर देशांच्या मोबाईल्स वर विश्वास दाखवत आहेत. पण ज्या लोकांकडे आधीपासून चीनी ब्रँडचे स्मार्टफोन्स आहेत त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे कि देशात चायनीज मोबाईल्सच्या पार्ट्सची कमतरता भासू लागली आहे. या टंचाईमुळे स्मार्टफोन्सचे पार्ट्स महाग झाले आहेत तसेच मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आता आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

मोबाईल पार्ट्सची कमतरता

हि गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही कि भारतात चीनी स्मार्टफोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. देशातील टॉप 5 मोबाईल ब्रँड्स मध्ये 4 नावे चीनी कंपन्यांची आहेत. Xiaomi सतत नंबर वन इंडियन स्मार्टफोन ब्रँड बनत आहे. भारतात चीनी कंपन्या हिट होण्याची सर्वात मोठे कारण स्वस्तात जास्त फीचर्स असलेले स्मार्टफोन विकणे हे आहे. या फोन्सची किंमत कमी असण्याचे मुख्य कारण फोन मधील पार्ट्सची किंमत कमी आहे.

चीनी कंपन्या ज्या फोन ‘मेक इन इंडिया’ च्या टॅग सह विकतात त्यांचे बहुतांश पार्ट्स चीन मधून आयात केले जातात. तसेच आता माहिती समोर येत आहे कि भारतात या चीनी कंपन्यांच्या पार्ट्सची कमतरता निर्माण झाली आहे. आणि या टंचाईमुळे मोबाईल्स मध्ये तसेच रिपेयरिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सची किंमत पण बाजारात वाढली आहे.

रिपेयरिंग होईल महाग

स्थानिक मोबाईल मेकॅनिकनुसार काही आठवड्यांपूर्वी जो फोल्डर 1,000 रुपयांमध्ये मिळत होते, त्याची किंमत आता 1,300 रुपये झाली आहे. तसेच फोनच्या बॅटरीच्या किंमतीत 50 से 150 रुपये तसेच स्पीकर मध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. फोन मधील माइक्रोएसडी कार्ड पण आधीपेक्षा बाजारात 100 रुपयांपर्यंत जास्त महाग विकला जात आहे. मोबाईल दुरुस्त करणाऱ्या लोकांच्या मते पार्ट्स महाग मिळाल्यामुळे त्यांना रिपेयरिंग चार्ज पण वाढवावे लागतील. त्याचबरोबर टॅम्पर्ड ग्लास, इयरफोन व डेटा केबलच्या किंमती पण वाढल्या आहेत.

तुम्हाला माहितीच असेल कि गेल्या आठवड्यात देशातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने पाचव्यांदा आपल्या हिट स्मार्टफोन Redmi Note 8 च्या किंमतीत वाढ केली आहे. रिटेलर्सनुसार बायकॉट चायना मोहिमेचे परिणाम ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर होत आहेत. मोबाईल दुकानांवर लोक चीनी कंपन्यांच्या फोन्सना प्राधान्य देत नाहीत. पण दुसरीकडे ऑनलाईन शॉपिंग साइट्स वर अजूनही OnePlus, Poco, Xiaomi, Realme आणि Oppo, Vivo चे स्मार्टफोनचा सेल ‘स्टॉक आउट’ होत आहे.

The post चायनीज फोन वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी करावा लागेल जास्त खर्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-repair-cost-increased-in-india-shortage-of-chinese-mobile-parts/feed/ 0
जगभरात विकले जातील ‘Made in India’ Nokia फोन, चीनी ब्रँड्सना मागे टाकण्याचा दावा https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-will-manufacture-made-in-india-nokia-phone-take-on-chinese-smartphones/ https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-will-manufacture-made-in-india-nokia-phone-take-on-chinese-smartphones/#respond Fri, 19 Jun 2020 10:49:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7492 एचएमडी ग्लोबल कडून सिंह यांनी कबुली दिली आहे कि Nokia भारतात आपल्या फोन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगचा विस्तार करण्याची तयारी करत आहे.

The post जगभरात विकले जातील ‘Made in India’ Nokia फोन, चीनी ब्रँड्सना मागे टाकण्याचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia चे नाव सध्या मोबाईल बाजारातील सर्वात जुन्या नावांपैकी एक आहे. नोकियाने अलीकडेच भारतात आपला नवीन मोबाईल फोन Nokia 5310 लॉन्च केला आहे जो फक्त 3,399 रुपयांमध्ये वर बाजारात आला आहे. नोकिया 5310 ‘मेड इन इंडिया’ फोन आहे ज्याची निर्मिती पूर्णपणे भारतात झाली आहे. India manufacturing बाबत Nokia ने आता म्हटले आहे कि कंपनीची योजना भारतातच आपली मोबाईल फॅक्टरी उभारण्याची आहे. नोकिया फक्त भारतातच नाही तर जगातील दुसऱ्या देशांमध्ये पण भारतात बनलेले स्मार्टफोन्स विकेल.

नोकियाच्या या योजेनचा खुलासा नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलचे वाइस प्रेजीडेंट सनमित सिंह कोचर यांनी द मोबाईल इंडियन सोबतच झालेल्या मुलाखतीत केला आहे. एचएमडी ग्लोबल फिनलँडची कंपनी आहे आणि Nokia ब्रँडच्या मोबाईल फोन्सची निर्मिती या कंपनी द्वारे केली जात आहे. सध्या स्मार्टफोन्स विश्वात एचएमडी ग्लोबल एकमेव अशी कंपनी आहे जी यूरोप मधल्या फिनलँड देशातील आहे.

जगभरात विकले जातील ‘Made in India’ नोकिया फोन

नोकियाच्या अधिकाऱ्यांनी मुलाखतीती सांगितले कि भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल बाजार आहे आणि इंडियन मार्केट Nokia ब्रँडसाठी पण तेवढाच महत्वाचा आहे. कोचर यांच्या मते सध्या भारतीय वापरत असलेल्या Nokia फोन्स पैकी जवळपास 99 टक्के मोबाईल्सची निर्मिती भारतात केली जाते. भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग हब बनवण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नोकियाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे कि भारत ज्या वेगाने आणि ज्या रस्त्यावर चालत आहे ते पाहता लवकरच भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल निर्माता बनू शकतो.

एचएमडी ग्लोबल कडून सिंह यांनी कबुली दिली आहे कि Nokia भारतात आपल्या फोन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनीची योजना अशी आहे कि येत्या काळात Nokia ब्रँडचे फीचर फोन व स्मार्टफोन भारतातच बनवले जातील आणि इथूनच या स्मार्टफोन्सची आयात जगातील विविध भागांमधून केली जाईल. म्हणजे ते दिवस दूर नाहीत जेव्हा प्रत्येक देशात ‘Made in India’ टॅग असलेले Nokia मोबाईल मिळतील.

Nokia 5.3 चे प्रोडक्शन पण झाले आहे सुरु

भारतात चीनी ब्रँड्सच्या वाढत्या मार्केट शेयर वर सनमित सिंह कोचर यांनी म्हटले आहे कि “Nokia स्मार्टफोन चायनीज स्मार्टफोन्सना टक्कर देण्याची क्षमता बाळगतात आणि लवकरच फक्त चीनी नाही तर इतर देशातील दुसऱ्या ब्रँड्सना पण नोकिया मागे टाकू शकते”. Nokia 5310 व्यतिरिक्त कंपनीने भारतात Nokia 5.3 चे प्रोडक्शन पण सुरु केले आहे आणि हा फोन पुढल्या महिन्यात बाजारात येईल. नोकिया 5.3 पूर्णपणे भारतात बनलेला स्मार्टफोन असेल.

The post जगभरात विकले जातील ‘Made in India’ Nokia फोन, चीनी ब्रँड्सना मागे टाकण्याचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-will-manufacture-made-in-india-nokia-phone-take-on-chinese-smartphones/feed/ 0