गेल्या काही महिन्यात चीनी मोबाईल कंपन्या आणि ब्रँड्सकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला आहे. एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेताना इंडियन यूजर्स तो चायनीज ब्रँडचा नसावा असा प्रयत्न करत आहेत. भारतीय बाजारात चीनी कंपन्यांचा बोलबाला आहे आणि त्यामुळे नॉन-चायनीज ब्रँड्सचे पर्याय पण कमी आहेत. Xiaomi, Oppo, Vivo, Realme आणि OnePlus सारख्या हिट चीनी ब्रँड्सच्या समोर Samsung, Apple आणि Nokia सारख्या निवडक कंपन्या आहेत ज्यांच्याकडे भारतीयांचे लक्ष जाते. बायकॉट चायनाचा लाभ Samsung ला मिळत आहे पण भारतीय Nokia पासून लांब राहत आहेत. यूजर्सना फोन विकत घ्यायचे आहेत पण नोकिया अपेक्षा पूर्ण करत नाही. पुढे आम्ही असे काही मुद्दे सांगितले आहेत ज्यात जर काही सुधार झाला तर भारतीय यूजर्स Nokia वर पुन्हा आधीसारखा विश्वास ठेऊ लागतील.
कमी आहे रॅम
Nokia जेव्हा नवीन फोन लॉन्च करते तेव्हा त्यात 3 जीबी किंवा 4 जीबी रॅम मिळतो. तर दुसरीकडे चीनी ब्रँड्स त्याच बजेटच्या आसपास 6 जीबी ते 8 जीबी रॅम असलेले फोन्स देतात. भारतीय ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट मध्ये 4 जीबी पेक्षा कमी रॅम पुरेसा वाटत नाही. आणि याच कारणामुळे भारतात Nokia एक चांगला पर्याय म्हणून बघितला जात नाही. मग त्या फोनचा प्रोसेसर किंवा जीपीयू चीनी ब्रँडच्या तुलनेत जास्त दमदार असलातरी जास्त रॅम इंडियन यूजर्स चांगल्या परफॉर्मंसची निशाणी समजतात. नोकिया ब्रँडच्या मिड बजेट फोन मध्ये 6 जीबी किंवा 8 जीबी रॅम नसल्यामुळे नोकिया फॅन्सची निराश होते.
बॅटरीची पावर कमी
सध्या स्मार्टफोन्स मध्ये 4,000एमएएच व यापेक्षा जास्त पावर सामान्य झाली आहे. गेल्या काही दिवसांत Samsung आणि Realme ने स्वस्तात 6,000एमएएच बॅटरी असलेले फोन आणून या सेग्मेंटला नवीन दिशा दिली आहे. पण असे असूनही Nokia या शर्यतीत कुठेही दिसत आहे. हैराणीची बाब म्हणजे सध्या भारतात कोणताही असा नोकिया स्मार्टफोन नाही ज्यात 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. दुसरीकडे चीनी कंपन्या 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत 5,000एमएएच बॅटरी असलेले फोन्स लॉन्च करतात. Nokia स्मार्टफोन्स मध्ये कमी एमएएच पावरची बॅटरी असल्याने कंपनीचे फॅन्स निराश होतात आणि हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे भारतीय यूजर नवीन फोन घेताना नोकियाला बाजूला ठेवतात.
मर्यादित मॉडेल्स
एकीकडे चीनी कंपन्या जवळपास प्रत्येक महिन्याला एखादा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणतात. याउलट Nokia कंपनी वर्षभरात नेमकेच मोबाईल फोन्स भारतात लॉन्च करते. चीनी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या अनेक सीरीज बाजारात उपलब्ध आहेत ज्या प्रत्येक प्राइस रेंज व बजेट मध्ये ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देतात. पण Nokia फोनचे मर्यादित मॉडेल्स यूजर्सच्या निवड क्षमतेवर बंधन आणतात. इंडियन यूजर्स कोणतीही वस्तू घेताना खासकरून मोबाईल फोन घेण्याआधी सर्व पैलू तपासून घेतात आणि त्यामुळे नोकियाचे मोजकेच मॉडेल्स ग्राहकांना दुसऱ्या कंपनी व ब्रँडकडे जाण्यास भाग पाडतात.
किंमत
Nokia आपले स्मार्टफोन्स भारतात वाजवी दरात लॉन्च करते. कंपनीचे बरेचशे फोन मिड बजेट मध्ये येतात जे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर विक्रीसाठी उपलब्ध होतात. नोकिया स्मार्टफोन महाग असतात हे म्हणणे चुकीचे ठरेल. पण बाजारात उपलब्ध असेलेल्या इतर ब्रँड्स व चीनी कंपन्यांच्या मोबाईल्सच्या कमी किंमती Nokia च्या प्रोडक्ट्सना इतरांपेक्षा महाग बनवतात. जे फीचर्स ग्राहकांना 8,000 ते 10,000 रुपयांमध्ये मिळतात त्यासाठी इंडियन यूजर्सना 15,000 रुपये खर्च करणे आवडत नाही. जे लोक Nokia ब्रँडसाठी जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात त्यांना पण हि रक्कम जास्त वाटत तसेच स्पेसिफिकेशन्स मध्ये पण तडजोड करावी लागते.
आफ्टर सेल सर्विसची तक्रार
Nokia यूजर्सच्या मते फोन विकत घेतल्यानंतर जर तो बिघडला तर तो दुरुस्त करण्यासाठी सर्विस सेंटरच्या अनेक चकरा माराव्या लागतात. वॉरंटी मध्ये असूनही फोन सर्विस सेंटर वर दिल्यावर तो दुरूस्त होण्यास एक महिना लागतो. सध्या 1 दिवस पण फोनविना राहणे कठीण आहे त्यामुळे स्वतःचा फोन दुरुस्त करण्यासाठी 1 महिन्याची वाट बघावी लागणे कोणाला आवडेल. यूजर्सनुसार Nokia ची आफ्टर सेल सर्विस चांगली नाही आणि सर्विस सेंटर्स वर पण व्यवस्था चांगली नाही. हे एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे जे लोक नोकियाचा फोन वापरात आहेत ते लोक इतरांना Nokia फोन विकत न घेण्याचा सल्ला देत आहेत.