जगभरात विकले जातील ‘Made in India’ Nokia फोन, चीनी ब्रँड्सना मागे टाकण्याचा दावा

Nokia चे नाव सध्या मोबाईल बाजारातील सर्वात जुन्या नावांपैकी एक आहे. नोकियाने अलीकडेच भारतात आपला नवीन मोबाईल फोन Nokia 5310 लॉन्च केला आहे जो फक्त 3,399 रुपयांमध्ये वर बाजारात आला आहे. नोकिया 5310 ‘मेड इन इंडिया’ फोन आहे ज्याची निर्मिती पूर्णपणे भारतात झाली आहे. India manufacturing बाबत Nokia ने आता म्हटले आहे कि कंपनीची योजना भारतातच आपली मोबाईल फॅक्टरी उभारण्याची आहे. नोकिया फक्त भारतातच नाही तर जगातील दुसऱ्या देशांमध्ये पण भारतात बनलेले स्मार्टफोन्स विकेल.

नोकियाच्या या योजेनचा खुलासा नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलचे वाइस प्रेजीडेंट सनमित सिंह कोचर यांनी द मोबाईल इंडियन सोबतच झालेल्या मुलाखतीत केला आहे. एचएमडी ग्लोबल फिनलँडची कंपनी आहे आणि Nokia ब्रँडच्या मोबाईल फोन्सची निर्मिती या कंपनी द्वारे केली जात आहे. सध्या स्मार्टफोन्स विश्वात एचएमडी ग्लोबल एकमेव अशी कंपनी आहे जी यूरोप मधल्या फिनलँड देशातील आहे.

जगभरात विकले जातील ‘Made in India’ नोकिया फोन

नोकियाच्या अधिकाऱ्यांनी मुलाखतीती सांगितले कि भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल बाजार आहे आणि इंडियन मार्केट Nokia ब्रँडसाठी पण तेवढाच महत्वाचा आहे. कोचर यांच्या मते सध्या भारतीय वापरत असलेल्या Nokia फोन्स पैकी जवळपास 99 टक्के मोबाईल्सची निर्मिती भारतात केली जाते. भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग हब बनवण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नोकियाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे कि भारत ज्या वेगाने आणि ज्या रस्त्यावर चालत आहे ते पाहता लवकरच भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल निर्माता बनू शकतो.

एचएमडी ग्लोबल कडून सिंह यांनी कबुली दिली आहे कि Nokia भारतात आपल्या फोन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनीची योजना अशी आहे कि येत्या काळात Nokia ब्रँडचे फीचर फोन व स्मार्टफोन भारतातच बनवले जातील आणि इथूनच या स्मार्टफोन्सची आयात जगातील विविध भागांमधून केली जाईल. म्हणजे ते दिवस दूर नाहीत जेव्हा प्रत्येक देशात ‘Made in India’ टॅग असलेले Nokia मोबाईल मिळतील.

Nokia 5.3 चे प्रोडक्शन पण झाले आहे सुरु

भारतात चीनी ब्रँड्सच्या वाढत्या मार्केट शेयर वर सनमित सिंह कोचर यांनी म्हटले आहे कि “Nokia स्मार्टफोन चायनीज स्मार्टफोन्सना टक्कर देण्याची क्षमता बाळगतात आणि लवकरच फक्त चीनी नाही तर इतर देशातील दुसऱ्या ब्रँड्सना पण नोकिया मागे टाकू शकते”. Nokia 5310 व्यतिरिक्त कंपनीने भारतात Nokia 5.3 चे प्रोडक्शन पण सुरु केले आहे आणि हा फोन पुढल्या महिन्यात बाजारात येईल. नोकिया 5.3 पूर्णपणे भारतात बनलेला स्मार्टफोन असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here