Coronavirus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/#respond Fri, 27 Mar 2020 16:17:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6929 आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने संपूर्ण भारताला थांबवले आहे. किंवा महामारीमुळे संपूर्ण भारत देश 21 दिवसांचा Lockdown सहन करत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्सची पण अपील आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनचा प्रभाव वाढू देऊ नका. आम्ही समजू शकतो कि पूर्ण दिवस घरी राहिल्यावर फक्त एक इंटरनेटच आहे जो तुमची सर्वात जास्त साथ देतो. इंटरनेटमुळे लोकांचा टाईमपास होत आहे. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्रीपर्यंत संपतो. काही कंपन्या आपल्या प्लान्स मध्ये एफयूपी लिमिट पण देत आहेत, पण त्यात पण डेटा स्पीड खूप कमी होतो. तुमची हि समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा त्यात गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडीच्या माध्यमातून सेटअप होतो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. बऱ्याचदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यावर नोटिफिकेशन्स येते. जर तुम्ही मेलचा जास्त वापर करत जरी नसला तरी पण बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकमुळे फोनचा इंटरनेट डेटा पण सतत वापरला जातो. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यावर डेटाचा वापर कमी होईल.

2) WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड करा ऑफ

आज देशात व्हाट्सऍपचा वापर सर्वात जास्त होतो. घरातील प्रत्येकाच्या फोन मध्ये हा मेसेंजिंग ऍप आहे. इतके ग्रुप असतात कि सारखी फोनची घंटी वाजत असते. बऱ्याचदा लोक WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड ऑन ठेवतात. त्यामुळे एखादी नवीन ईमेज किंवा वीडियो फाईल व्हाट्सऍप वर आल्यावर आपोआप डाउनलोड होऊन फोन गॅलरी मध्ये सेव होतात. काही फाईल छोट्या तर काही मोठ्या असतात. सध्या तर Corona चे मेसेज धडाधड येत आहेत आणि ते डाउनलोड झाल्यावर डेटाचा वापर पण होतो. त्यामुळे जर व्हाट्सऍप वर मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ केले तर इंटरनेट डेटा वाचेल.

3) ऍप करा बंद

फोन मध्ये गेम खेळात असताना काम आल्यावर होम बटण दाबून किंवा फोन लॉक करके तुम्ही तुम्ही काम करू लागता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेऱ्याच्या वापरानंतर पण अनेक लोक होम बटण दाबून ते बंद करतात. पण फक्त होम बटण दाबल्याने हे फंक्शन पूर्णपणे बंद होत नाहीत उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहतात आणि सतत बॅटरीचा वापर करतात. त्यामुळे कोणत्याही ऍप किंवा फीचरचा वापर केल्यावर ते बंद करा.

4) डेटा सेवर मोड येईल कामी

जवळपास सर्व ब्रँडसच्या स्मार्टफोन्स मध्ये डेटा सेवरचा ऑप्शन दिला जातो. फोन मधील ऍप्स द्वारा वापरला जाणारा डेटा कन्सम्प्शन मर्यादित करता यावा म्हणून हे फिचर दिलेले असते. हा मोड ऑन करून यूजर फोन मध्ये इंस्टाल्ड ऍपचा इंटरनेट वापर कमी करू शकतात. काही स्मार्टफोन्स मध्ये ‘लिमिट बॅकंग्राउंड डेटा यूज’ चा ऑप्शन पण असेल. हा ऑन केल्यावर ऍप्स द्वारे वापरला जाणारा इंटरनेट डेटा नियंत्रित केला जाऊ शकतो.

5) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्यांना लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक असे ऍप्स असतात जे सतत लोकेशन ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे इंटरनेटचा पण सतत वापर होत असतो. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यकता नसल्यास लोकेशन सर्विसच बंद करा. काही प्रमाणात इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

6) ऑनलाईन कंटेंट ‘लो’ क्वॉलिटी वर वापरा

आधी गाणी ऐकण्यासाठी फोनच्या मेमरी मध्ये शेकडो गाणी सेव केली जात होती. पण सध्या गाणी ऐकण्यासाठी किंवा वीडियो बघण्यासाठी थेट Youtube उघडतात. त्यामुळे फक्त ऑडियो ऐकायचा असेल तर यूट्यूब मध्ये वीडियो क्वॉलिटी सर्वात कमी रेज्ल्यूशन वर ठेवा. त्याचप्रमाणे जर एखादी ऑडियो स्ट्रीमिंग ऍप वापरत असाल तर तुमची आवडती गाणी किंवा जी तुम्ही रोज ऐकता ती ऑफलाईन गॅलरी मध्ये सेव करण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

7) फ्लाइट मोडची मदत घ्या

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये एखादा असा गेम खेळत असाल जो ऑनलाईन नेटवर्क वर चालत नाही किंवा फोन मध्ये डाउनलोडेड एखादा वीडियो बघत असाल आणि अश्यावेळी एखादा महत्वाचा कॉल किंवा मेसेज येणार नसेल तर तुम्ही काही काळासाठी फोन फ्लाइट मोड वर ठेवू शकता. या स्थितीत जीपीएस वर खर्च होणारा इंटरनेट डेटा पण वाचेल. विशेष म्हणजे फोन फ्लाइट मोड वर टाकल्यावर फोनची बॅटरी पण जास्त टिकेल.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/feed/ 0
Jio नंतर Airtel ने सादर केला हा शानदार टूल, अशी करा Covid-19 ची टेस्ट https://www.91mobiles.com/marathi/airtel-launch-tools-to-check-the-risk-of-coronavirus/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-launch-tools-to-check-the-risk-of-coronavirus/#respond Fri, 27 Mar 2020 13:06:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6923 एयरटेलने आपला टूल अपोलो हॉस्पिटलच्या मदतीने बनवला आहे.

The post Jio नंतर Airtel ने सादर केला हा शानदार टूल, अशी करा Covid-19 ची टेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus महामारीला रोखण्यासाठी सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. टेलीकॉम विश्वातील दिग्गज कंपनी रिलायंस जियोने अलीकडेच एक टूल लॉन्च केला होता. या टूलच्या मदतीने यूजर स्वतःहून चेक करू शकतात कि त्यांना कोरोना वायरसची लक्षणे आहेत कि नाही. तर आता भारती एयरटेलने आश्याचप्रकारचा टूल लॉन्च केला आहे, ज्याच्या मदतीने COVID-19 ची प्राथमिक तपासणी करता येईल.

नवीन टूलच्या मदतीने एयरटेल कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जियो प्रमाणे एयरटेलच्या नवीन टूल मध्ये यूजर्सना त्यांच्या तब्येतीविषयी आणि प्रवासाच्या इतिहासाविषयी प्रश्न विचारले जातील. यातून यूजरला कोरोनाची लागण होण्याची भीती आहे कि नाही हे समजण्याचा प्रयत्न केला जाईल. असे केल्याने लोकांना समजेल कि त्यांना कोरोना होण्याची किती शक्यता आहे.

एयरटेलने आपला टूल अपोलो हॉस्पिटलच्या मदतीने बनवला आहे. या टूलला Apollo 247 असे नाव देण्यात आले आहे. हा टूल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे दिशानिर्देश लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे.

भारती एयरटेलच्या टूल मध्ये यूजर द्वारे देण्यात आलेल्या माहिती नुसार, एयरटेल अपोलो टूल रिस्क लेवल सांगतो. हा टूल Airtel Thanks ऍप मध्ये आहे. रिस्क लेवल चेक केल्यानंतर पण तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेण्याची सूचना केली जाते.

चीन मधील वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आहे. या खतरनाक वायरसमुळे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे.

The post Jio नंतर Airtel ने सादर केला हा शानदार टूल, अशी करा Covid-19 ची टेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-launch-tools-to-check-the-risk-of-coronavirus/feed/ 0
लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/ https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/#respond Thu, 26 Mar 2020 13:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6908 आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोनामुळे जगभरात सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. तसेच 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाउन मध्ये वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आम्ही लॉकडाउनच्या काळात तुमचा वेळ चांगला जावा यासाठी काही अश्या मोबाईल गेम्स बाबत सांगणार आहोत, जे तुम्हाला वेळ घालवण्यास मदत करतील.

आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता. प्ले स्टोर वर असे अनेक गेम्स आहेत, यातील बेस्ट गेम्स शोधून आम्ही तुमच्यासाठी 5 स्मार्टफोन गेम्सची यादी घेऊन आलो आहोत.

पबजी

सर्वात आधी बोलूया प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे PUBG बाबत. हे नाव कदाचित सर्वांना माहित असेल. हा गेम लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत याची नशा तरुणांच्या डोक्यातून उतरली नाही. हा गेम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता. यात चार लोकांचा ग्रुप असतो. तसेच तुम्ही या ऑनलाइन गेम मध्ये बोलू पण शकता. शानदार ग्राफिक्स सह हा गेम येतो.

लूडो किंग

हा तुमच्या बालपणातील आवडता खेळ लूडोचा ऑनलाइन वर्जन आहे. या गेमचे नाव लूडो किंग आहे, जो तुम्ही आणि तुमचे तीन मित्र मिळून खेळू शकता. इतकेच नव्हे तर हा गेम कमी रोम व रॅम स्मार्टफोन असलेल्या फोन्स मध्ये पण सह खेळता येतो. इतकेच नव्हे तर या गेम मधेच साप शिडी खेळण्याचा ऑप्शन पण आहे.

कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल

PUBG ची लोकप्रियता पाहून काही दिवसांपूर्वी हा गेम मोबाईलसाठी सादर केला गेला होता. या गेम मध्ये 5vs5 मोड पण मिळतो, जो प्लेयर्सना सर्वात जास्त आवडतो. वेगवेगळे मॅप्स आणि लोकेशंस वर पाच प्लेयर्सची टीम दुसऱ्या टीम विरुद्ध खेळते.

अस्फाल्ट 9

अस्फाल्ट 9 एक पॉप्यूलेर रेसिंग गेम आहे. जर तुम्ही रेसिंग गेमचे चाहते असाल तर हा गेम तुम्हाला खूप आवडेल या गेम तुम्ही लो-ग्राफिक्स पासून हाई-ग्राफिक्स सह पण खेळू शकतात. गेम मध्ये रेसिंग ट्रॅक्स पण निवडता येतात.

रूल्स ऑफ सर्वाइवल

Rules of Survival एक फ्री मल्टीप्लयेर ऑनलाइन बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम मोठ्या प्रमाणात पबजी सारखा आहे. या गेम मध्ये पण तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत एक ग्रुप बनवून दुसऱ्या ग्रुप्सना हरवायचे असते. यात पण PUBG प्रमाणे तुम्हाला शेवटपर्यंत जिवंत राहायचे असते.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/feed/ 0
CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/#respond Wed, 25 Mar 2020 14:45:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6900 COVID-19 संक्रमणामुळे फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन शिपमेंट्स मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

The post CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मध्ये सुरु झालेल्या CoronaVirus ने सध्या संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे. कोरोना वायरसचा परिणाम सूर्य इंडस्ट्रीज सोबतच स्मार्टफोन इंडस्ट्री वर दिसत आहे. COVID-19 संक्रमणामुळे फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन शिपमेंट्स मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

38 टक्के घसरण झाली

समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन मार्केटच्या परफॉर्मेंसच्या तुलनेत यावर्षी स्मार्टफोन्सची विक्री खूप कमी झाली आहे आणि याचे कारण कोरोना वायरस असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार ग्लोबल शिपमेंट फेब्रुवारी मध्ये 6.1 कोटी यूनिट्स होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्री मध्ये 38 टक्क्यांची कमतरता दिसली आहे.

फेब्रुवारी 2019 बद्दल बोलायचे तर 9.9 कोटी स्मार्टफोन्स विकले गेले होते. स्मार्टफोन मार्केट मधील या स्थितीला COVID-19 जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या वायरसमुळे स्मार्टफोन कंपन्या पण नवीन डिवाइस लॉन्च इवेंट्स करण्याऐवजी ऑनलाइन लॉन्च करत आहेत.

स्मार्टफोन्सची सेल डेट पुढे ढकलण्यात आली

याव्यतिरिक्त कंपन्यांनी आपल्या फोन्सची सेल डेटस पुढे ढकलल्या आहेत. यात शाओमी आणि रियलमी सारख्या कंपन्यांचा पण समावेश आहे. तसेच वीवोने भारतात लॉन्च होणाऱ्या वीवो वी19 चा लॉन्च रद्द केला आहे. हा लॉन्च 26 मार्चला भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर होणार होता.

2019 होता चांगला

जानेवारी मध्ये चीन मध्ये स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्यात आली होती. याचा परिणाम मोठ्या कंपन्यांच्या सप्लाई चेन वर झाला होता. ग्लोबल मार्केट मध्ये ऍप्पल आणि शाओमी सारख्या कंपन्या 2019 च्या शेवटपर्यंत चांगल्या परफॉर्म करत होत्या, 2020 च्या सुरवातीला त्याच्या विक्री वर पण परिणाम होऊ लागला आहे.

भारतात बंद झाले मान्यफॅक्चरिंग प्लांट

भारतात पण अनेक कंपन्यांनी आपले मान्यफॅक्चरिंग प्लांट बंद केले आहेत. साउथ कोरियन टेक कंपनी सॅमसंगने आपल्या नोयडा मधील सर्वात मोठा प्लांट काही दिवस शट डाउन केला आहे.

भारत झाला लॉकडाउन

सॅमसंग व्यतिरिक्त भारतात ओप्पो, वीवो आणि एलजी चे पण प्लांट आहेत, जे कंपन्यांनी काही दिवसांसाठी बंद केले आहेत. दुसरीकडे सरकारने आज म्हणजे 25 मार्च पासून 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन संपूर्ण देशात लागू झाला आहे.

The post CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/feed/ 0
Realme Narzo 10 आणि Narzo 10A आता नाही होणार भारतात लॉन्च, Coronavirusमुळे ब्रँडच्या सर्व लॉन्च स्थगित https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-series-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-series-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/#respond Wed, 25 Mar 2020 12:18:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6888 Realme Narzo 10 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन अलीकडेच म्यानमार मध्ये लॉन्च झालेल्या Realme 6i चा रिब्रँडेड वर्जन असेल.

The post Realme Narzo 10 आणि Narzo 10A आता नाही होणार भारतात लॉन्च, Coronavirusमुळे ब्रँडच्या सर्व लॉन्च स्थगित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने जेव्हापासून घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘नारजो’ घेऊन येणार आहे, तेव्हापासून स्मार्टफोन यूजर आणि रियलमी फॅन्स या सीरीजची आतुरतेने वाट बघत आहेत. कंपनीने आधीच सांगितले आहे कि या सीरीज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन येतील. हे दोन्ही स्मार्टफोन उद्या म्हणजे 26 मार्चला भारतात लॉन्च केले जाणार होते. पण आता देशात पसरलेल्या Coronavirus मुळे रियलमीने नारजो सीरीजचा लॉन्च रद्द केला आहे.

Realme इंडिया हेड माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून अशी घोषणा केली आहे कि कंपनी तात्पुरते Realme Narzo 10 आणि Narzo 10A चा लॉन्च रद्द करत आहे. माधव सेठ म्हणाले कि कोरोना वायरसमुळे फक्त नारजो सीरीज नाही तर काही काळासाठी Realme आपल्या ब्रँड अंतर्गत सर्व स्मार्टफोन आणि प्रोडक्ट्सची निर्मिती थांबवत आहे. विशेष म्हणजे काल Vivo ने पण घोषणा केली आहे कि सध्या काही दिवस कंपनी भारतात आपला कोणताही प्रोडक्ट निर्माण करणार नाही आणि फोन बनवण्यासाठी लागणाऱ्या संसाधनाचा वापर कंपनी भारत सरकारच्या मदतीसाठी करेल.

Realme Narzo 10

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच यात मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर कॅमेरे मिळतील. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा मिळेल. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. याव्यतिरिक्त फोन मध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5000 एमएएच बॅटरी मिळेल.

Realme Narzo 10 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन अलीकडेच म्यानमार मध्ये लॉन्च झालेल्या Realme 6i चा रिब्रँडेड वर्जन असेल. असे समजले कि फोन मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले 89.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि वॉटर ड्रॉप नॉच सेल्फी कॅमेरा सह येईल. हँडसेट मध्ये “A क्लास प्रोसेसर असेल जो पहिल्यांदाच भारतात येईल. या प्रोसेसर बद्दल बोलले जात आहे कि हा फोन मीडियाटेक गेमिंग सेंट्रिक हीलियो जी80 चिपसेट असेल. अजूनतरी रियलमी नारजो 10 च्या रॅम व स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. अशा आहे Realme 6i प्रमाणे यात 3GB आणि 4GB रॅम आणि 64GB व 128GB स्टोरेज दिली जाईल.

फोटोग्राफीसाठी रियलमी नारजो 10 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. हा कॅमेरा सॅमसंग GM1 किंवा नवीन GM2 सेंसर सह येईल. तसेच यात 8MP 119-डिग्री अल्ट्रा वाइड सेंसर, 2MP 4cm मॅक्रो लेंस आणि 2MP B&W डेप्थ सेंसर f/2.4 अपर्चर सह असेल. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा f/2.0 अपर्चर सह मिळू शकतो.

Realme Narzo 10 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. तसेच हँडसेट एंडरॉयड 10-बेस्ड रियलमी यूआई वर चालेल. फोन मध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सिक्योरिटीसाठी असेल. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये डुअल सिम 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5, जीपीएस/ ग्लोनास/ Beidou, यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम हेडफोन जॅक आणि एफएम रेडियो दिला जाईल.

Realme Narzo 10A

Realme Narzo 10A बद्दल बोलले जात आहे कि हा Realme Narzo 10 चा छोटा वर्जन असेल. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल. सध्या फोनच्या कॅमेरा रिजोल्यूशनची माहिती मिळाली नाही. पण फोन मध्ये 6.5-इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G80 चिपसेट असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

The post Realme Narzo 10 आणि Narzo 10A आता नाही होणार भारतात लॉन्च, Coronavirusमुळे ब्रँडच्या सर्व लॉन्च स्थगित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-series-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/feed/ 0
Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/#respond Tue, 24 Mar 2020 13:32:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6879 नवीन मोबाईल्सच्या ऐवजी कंपनी एन95 म्हणजे सर्जिकल व मेडिकल मास्क बनवेल. हे मास्क देशातील आपत्कालीन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जातील.

The post Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo येत्या 26 मार्चला भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo V19 लॉन्च करणार होती. हा फोन 20 मार्च पासून देशात प्री-बुकिंगसाठी पण उपलब्ध झाला आहे. पण गेल्या आठवड्यात वीवोने फोन लॉन्च डेट मध्ये बदल करत सांगितले होते कि कंपनी कोरोना वायरसमुळे Vivo V19 एप्रिल मध्ये लॉन्च करेल. या घोषणेनंतर वीवो वी19 ची लॉन्च डेट 3 एप्रिल केली होती. आता Coronavirus च्या वाढत्या प्रभावामुळे वीवोने अजून एक नवीन घोषणा केली आहे कि कंपनी सध्या Vivo V19 चा लॉन्च रद्द करत आहे. म्हणजे Vivo V19 आता भारतात लॉन्च केला जाणार नाही.

Vivo ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून घोषणा केली आहे कि कंपनी Vivo V19 स्मार्टफोनच्या लॉन्चला स्थगिती देत आहे. हा फोन आता भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे कि फक्त Vivo V19 नाही तर सध्या काही काळ वीवो भारतात आपल्या कोणत्याही प्रोडक्टची निर्मिती करणार नाही. वीवो फोन बनवणाऱ्या संसाधनांचा कंपनी भारत सरकारच्या मदतीसाठी वापर करेल आणि नवीन मोबाईल्सच्या ऐवजी कंपनी एन95 म्हणजे सर्जिकल व मेडिकल मास्क बनवेल. हे मास्क देशातील आपत्कालीन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जातील.

Vivo V19

Vivo V19 ग्लास डिजाइन सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 6.44-इंचाचा FHD+ डुअल व्यू आईव्यू E3 सुपर एमोलेड डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेश्यो आणि 409ppi असेल. V19 मॉडेल भारतात 2.3GHz ऑक्ट-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC सह सादर केला जाईल. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह येईल. हँडसेट मध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट असेल, ज्यात दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

यात मागे एल-शेप क्वाड कॅमेरा सेटअप असेल. याबाबतीत Vivo V19 चा इंडियन वेरिएंट आणि इंडोशनेशियन वेरिएंट एक सारखे असतील. फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP ची सुपर वाइड अँगल लेंस, 2MP मॅक्रो लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर असेल. तसेच फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा असेल, ज्यात 32MP चा मेन सेंसर आणि 8MP ची वाइड-अँगल लेंस असेल.

 

फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि दोन कलर ऑप्शन: Mystic Silver आणि Piano Black मध्ये येईल. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह दिली जाईल. फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालेल. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट असेल. कंपनी ऑफिशियलने माहिती दिली आहे कि Vivo V19 भारतात 25000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. तसेच आम्हाला दुसऱ्या सोर्सने माहिती दिली आहे कि फोन 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

भारत सरकारचा व्हाट्सऍप नंबर

भारत सरकार सध्या वेळावेळी नवीन घोषणा करत आहे. घराघरात COVID-19 म्हणजे Coronavirus विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी सरकारने एक खास व्हाट्सऍप नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. हा नंबर आहे ‘+919013151515‘

इंडियन गर्वमेंटने कोरोना वायरस संबंधित सर्व माहिती देण्यासाठी हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरची सुविधा वापरण्यासाठी हा नंबर आपल्या फोन बुक मध्ये सेव करावा लागेल. फोन मध्ये हा नंबर सेव केल्यानंतर ‘9013151515‘ व्हाट्सऍप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल.

या नंबर वर फक्त एक साधा ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यावर लगेचच तुम्हाला सरकार कडून रिप्लाय येईल. मेसेजच्या माध्यमातून Coronavirus ची लक्षणे, यापासून बचाव करण्याचे उपाय आणि संक्रमण रोखण्याचे उपाय सांगितले जातील . फक्त इतकेच नव्हे तर या नंबर वर चॅट करताना तुम्ही थेट AIIMS च्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकाल.

91मोबाईल्स तुम्हाला सांगू इच्छित आहे कि हि बातमी आणि हा नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जेणेकरून तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना सर्व योग्य आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. आता योग्य माहिती आणि योग्य त्या उपाययोजना Coronavirus पासून वाचवू शकतात.

The post Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/feed/ 0
Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-covid-19-update-news-awareness-on-whatsapp-by-indian-govt-9013151515-free-service-who/ https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-covid-19-update-news-awareness-on-whatsapp-by-indian-govt-9013151515-free-service-who/#respond Mon, 23 Mar 2020 14:40:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6870 हा नंबर ‘+41798931892‘ असा आहे. भारत सरकारच्या नंबर प्रमाणे या नंबर वर पण ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे, त्यानंतर डब्ल्यूएचओ कडून उत्तर येईल.

The post Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus मुळे सध्या भारतात भीतीचे वातावरण आहे. रोज देशात कुठे ना कुठे तरी नवीन व्यक्ती या वायरसची शिकार होत आहे आणि अश्या केसेस वाढून 400 च्या पण पार गेल्या आहेत. देशात अनेक शहरे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहेत. भारतात केंद्र सरकार व राज्य सरकारे कोरोना वायरस रोखण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही सांगितले होते कि कशाप्रकारे घर बसल्या सरकार व आरोग्य विभागने जाहीर केलेल्या दिशानिर्देशांची माहिती घेता येते. तर आज आम्ही तुम्हाला आपल्या WhatsApp नंबर वर भारत सरकार व WHO शी कॉन्टेक्ट कशाप्रकारे केला जाऊ शकतो हे सांगणार आहोत आणि यासाठी कोणत्याही वेबसाइटची पण आवश्यकता नाही.

भारत सरकारचा व्हाट्सऍप नंबर

भारत सरकार सध्या वेळावेळी नवीन घोषणा करत आहे. घराघरात COVID-19 म्हणजे Coronavirus विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी सरकारने एक खास व्हाट्सऍप नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. हा नंबर आहे ‘+919013151515‘

इंडियन गर्वमेंटने कोरोना वायरस संबंधित सर्व माहिती देण्यासाठी हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरची सुविधा वापरण्यासाठी हा नंबर आपल्या फोन बुक मध्ये सेव करावा लागेल. फोन मध्ये हा नंबर सेव केल्यानंतर ‘9013151515‘ व्हाट्सऍप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल.

या नंबर वर फक्त एक साधा ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यावर लगेचच तुम्हाला सरकार कडून रिप्लाय येईल. मेसेजच्या माध्यमातून Coronavirus ची लक्षणे, यापासून बचाव करण्याचे उपाय आणि संक्रमण रोखण्याचे उपाय सांगितले जातील . फक्त इतकेच नव्हे तर या नंबर वर चॅट करताना तुम्ही थेट AIIMS च्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकाल.

91मोबाईल्स तुम्हाला सांगू इच्छित आहे कि हि बातमी आणि हा नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जेणेकरून तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना सर्व योग्य आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. आता योग्य माहिती आणि योग्य त्या उपाययोजना Coronavirus पासून वाचवू शकतात.

WHO ने पण प्रसिद्ध केला आहे नंबर

जगभरात पसरलेल्या या महामारीसाठी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ आर्गेनाइजेशनने पण आपला नंबर प्रसिद्ध केला आहे. हा नंबर ‘+41798931892‘ असा आहे. भारत सरकारच्या नंबर प्रमाणे या नंबर वर पण ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे, त्यानंतर डब्ल्यूएचओ कडून उत्तर येईल.

WHO कडून उत्तर म्हणून 8 वेगवेगळे पर्याय दिले जातील जे कोरोना वायरस संबंधित असतील . तुम्ही यातील तो पर्याय निवडू शकता ज्याची तुम्हाला माहिती हवी आहे. या नंबर वर Coronavirus पासून वाचण्याची पद्धत आणि ताज्या बातम्यांसह प्रश्न विचारता येतील.

The post Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-covid-19-update-news-awareness-on-whatsapp-by-indian-govt-9013151515-free-service-who/feed/ 0
अश्याप्रकारे मिळवा Coronavirus चे लाईव अपडेट, मिळेल हेल्पलाईन नंबर पासून नवीन घोषणा आणि इतर माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-live-status-new-announcement-in-india-on-coronavirus-updates-covid-19-outbreak/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-live-status-new-announcement-in-india-on-coronavirus-updates-covid-19-outbreak/#respond Wed, 18 Mar 2020 12:08:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6823 सर्वात आधी सांगू इच्छितो कि Coronavirus भारतात वेगाने पसरत आहे. आज हि संख्या वाढून 148 वर पोहचली आहे आणि यातील 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

The post अश्याप्रकारे मिळवा Coronavirus चे लाईव अपडेट, मिळेल हेल्पलाईन नंबर पासून नवीन घोषणा आणि इतर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Corona चे नाव आज देशातील सर्वांच्या जिभेवर आहे. चीन मध्ये सुरु झालेल्या या रोगाने आज भारतासहित जगाला पण विळखा घातला आहे. COVID-19 म्हणजे कोरोना वायरसची भीती जगात वेगाने वाढत आहे आणि भारत यातून वाचला नाही. रोज देशात कुठे ना कुठे तरी नवीन व्यक्ति या वायरसच्या जाळ्यात अडकत आहे. भारत सरकारने कोरोना वायरस रोखण्यासाठी अनेक उपाय केले आहेत आणि सतत लोकांना आरोग्य विभागाकडून चेतावनी दिली जात आहे, पण तरीही Coronavirus चा प्रकोप कमी होताना दिसत नाही.

Corona सारख्या घातक आजाराला रोखण्यासाठी व संपवण्यासाठी प्रत्येकाला वयक्तिक स्थरावर आरोग्य विभागाने दिलेला दिशानिर्देशनांचे पालन करावे लागेल. पुढे आम्ही फक्त अश्या गोष्टींची माहिती दिली आहे ज्यातून फक्त तुम्ही तुमच्या मोबाईल वर एक क्लिक करताच कोरोना वायरसने संक्रमित होणाऱ्या लोकांचे लाईव अपडेट मिळवू शकला असे नाही तर सोबतच या वायरस पासून वाचण्याचे उपाय आणि कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं दिशानिर्देश पण वाचू शकाल.

1.

सर्वात आधी सांगू इच्छितो कि Coronavirus भारतात वेगाने पसरत आहे. आज हि संख्या वाढून 148 वर पोहचली आहे आणि यातील 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंताजनक बाबा अशी आहे कि देशात आतापर्यंत फक्त 13 लोक या वायरसला मात देऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. तसेच संक्रमित लोकांची संख्या किती वाढेल याबाबत काही बोलता येणार नाही. जर तुम्हाला पण कोरोना वायरसचे गांभीर्य माहिती असेल तर तुम्हाला हा वायरस रोखण्याच्या उपायांची माहिती असायला हवी.

भारत सरकार कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी तसेच संक्रमण नियंत्रित करण्याची चेतावनी आणि माहिती देत आहे. Coronavirus पासून कसे वाचायचे हे जर तुम्हाला जाऊन घ्यायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा साथीचा रोग रोखण्यासाठी जगाची मदत करू शकता.

(इथे क्लिक करा)

2.

Coronavirus चे गांभीर्य समजून राज्य सरकारे पण आपल्या स्थरावर पाऊले उचलत आहेत. वेगवेगळ्या राज्यांत शाळा व कॉलेज बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेस व कंपन्यांना घरातून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिनेमा हॉल वर बंद करण्यात आले आहेत आणि नाईट लाईफ वर बॅन आहे. मुंबई फिल्म सिटी पासून अनेक मोठी धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. काही राज्यांत टूरिज्म वर बॅन लावण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पासून राज्य सरकारे रोज नवीन घोषणा करत आहेत. या सर्व घोषणा मिळवण्यासाठी (इथे क्लिक करा)

3.

चीन मध्ये सुरु होऊन Coronavirus जगात पसरला आहे. लाखो लोक या भयंकर वायरसने संक्रमित झाले आहेत तर हजारांनी प्राण गमावले आहेत. बातमी लिहिण्याआधी जगात कोरोना संक्रमणाची 1,98,517 प्रकरणे समोर आले आहेत ज्यातील 7,988 लोक दगावले आहेत. सर्व देश आपापल्या पद्धतीने याचा सामना करत आहेत. जागतील कोणत्या देशात काय स्थिती आहे आणि कोणत्या देशात कोरोनाचे किती रिगन आढळले हे जाऊन घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post अश्याप्रकारे मिळवा Coronavirus चे लाईव अपडेट, मिळेल हेल्पलाईन नंबर पासून नवीन घोषणा आणि इतर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-live-status-new-announcement-in-india-on-coronavirus-updates-covid-19-outbreak/feed/ 0