Realme ने जेव्हापासून घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘नारजो’ घेऊन येणार आहे, तेव्हापासून स्मार्टफोन यूजर आणि रियलमी फॅन्स या सीरीजची आतुरतेने वाट बघत आहेत. कंपनीने आधीच सांगितले आहे कि या सीरीज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन येतील. हे दोन्ही स्मार्टफोन उद्या म्हणजे 26 मार्चला भारतात लॉन्च केले जाणार होते. पण आता देशात पसरलेल्या Coronavirus मुळे रियलमीने नारजो सीरीजचा लॉन्च रद्द केला आहे.
Realme इंडिया हेड माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून अशी घोषणा केली आहे कि कंपनी तात्पुरते Realme Narzo 10 आणि Narzo 10A चा लॉन्च रद्द करत आहे. माधव सेठ म्हणाले कि कोरोना वायरसमुळे फक्त नारजो सीरीज नाही तर काही काळासाठी Realme आपल्या ब्रँड अंतर्गत सर्व स्मार्टफोन आणि प्रोडक्ट्सची निर्मिती थांबवत आहे. विशेष म्हणजे काल Vivo ने पण घोषणा केली आहे कि सध्या काही दिवस कंपनी भारतात आपला कोणताही प्रोडक्ट निर्माण करणार नाही आणि फोन बनवण्यासाठी लागणाऱ्या संसाधनाचा वापर कंपनी भारत सरकारच्या मदतीसाठी करेल.
With respect to the announcement made by our Honourable Prime Minister yesterday, we have decided to suspend all upcoming launches including #realmeNarzo series.
Time for us to focus on our family & ourselves. Stay at home, stay safe & cooperate with local authorities. pic.twitter.com/4FmdanvgHL
— Madhav @home (@MadhavSheth1) March 25, 2020
Realme Narzo 10
आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच यात मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर कॅमेरे मिळतील. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा मिळेल. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. याव्यतिरिक्त फोन मध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5000 एमएएच बॅटरी मिळेल.
Realme Narzo 10 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन अलीकडेच म्यानमार मध्ये लॉन्च झालेल्या Realme 6i चा रिब्रँडेड वर्जन असेल. असे समजले कि फोन मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले 89.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि वॉटर ड्रॉप नॉच सेल्फी कॅमेरा सह येईल. हँडसेट मध्ये “A क्लास प्रोसेसर असेल जो पहिल्यांदाच भारतात येईल. या प्रोसेसर बद्दल बोलले जात आहे कि हा फोन मीडियाटेक गेमिंग सेंट्रिक हीलियो जी80 चिपसेट असेल. अजूनतरी रियलमी नारजो 10 च्या रॅम व स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. अशा आहे Realme 6i प्रमाणे यात 3GB आणि 4GB रॅम आणि 64GB व 128GB स्टोरेज दिली जाईल.
फोटोग्राफीसाठी रियलमी नारजो 10 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. हा कॅमेरा सॅमसंग GM1 किंवा नवीन GM2 सेंसर सह येईल. तसेच यात 8MP 119-डिग्री अल्ट्रा वाइड सेंसर, 2MP 4cm मॅक्रो लेंस आणि 2MP B&W डेप्थ सेंसर f/2.4 अपर्चर सह असेल. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा f/2.0 अपर्चर सह मिळू शकतो.
Realme Narzo 10 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. तसेच हँडसेट एंडरॉयड 10-बेस्ड रियलमी यूआई वर चालेल. फोन मध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सिक्योरिटीसाठी असेल. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये डुअल सिम 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5, जीपीएस/ ग्लोनास/ Beidou, यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम हेडफोन जॅक आणि एफएम रेडियो दिला जाईल.
Realme Narzo 10A
Realme Narzo 10A बद्दल बोलले जात आहे कि हा Realme Narzo 10 चा छोटा वर्जन असेल. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल. सध्या फोनच्या कॅमेरा रिजोल्यूशनची माहिती मिळाली नाही. पण फोन मध्ये 6.5-इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G80 चिपसेट असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.















