Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती

Coronavirus मुळे सध्या भारतात भीतीचे वातावरण आहे. रोज देशात कुठे ना कुठे तरी नवीन व्यक्ती या वायरसची शिकार होत आहे आणि अश्या केसेस वाढून 400 च्या पण पार गेल्या आहेत. देशात अनेक शहरे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहेत. भारतात केंद्र सरकार व राज्य सरकारे कोरोना वायरस रोखण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही सांगितले होते कि कशाप्रकारे घर बसल्या सरकार व आरोग्य विभागने जाहीर केलेल्या दिशानिर्देशांची माहिती घेता येते. तर आज आम्ही तुम्हाला आपल्या WhatsApp नंबर वर भारत सरकार व WHO शी कॉन्टेक्ट कशाप्रकारे केला जाऊ शकतो हे सांगणार आहोत आणि यासाठी कोणत्याही वेबसाइटची पण आवश्यकता नाही.

भारत सरकारचा व्हाट्सऍप नंबर

भारत सरकार सध्या वेळावेळी नवीन घोषणा करत आहे. घराघरात COVID-19 म्हणजे Coronavirus विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी सरकारने एक खास व्हाट्सऍप नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. हा नंबर आहे ‘+919013151515‘

इंडियन गर्वमेंटने कोरोना वायरस संबंधित सर्व माहिती देण्यासाठी हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरची सुविधा वापरण्यासाठी हा नंबर आपल्या फोन बुक मध्ये सेव करावा लागेल. फोन मध्ये हा नंबर सेव केल्यानंतर ‘9013151515‘ व्हाट्सऍप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल.

या नंबर वर फक्त एक साधा ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यावर लगेचच तुम्हाला सरकार कडून रिप्लाय येईल. मेसेजच्या माध्यमातून Coronavirus ची लक्षणे, यापासून बचाव करण्याचे उपाय आणि संक्रमण रोखण्याचे उपाय सांगितले जातील . फक्त इतकेच नव्हे तर या नंबर वर चॅट करताना तुम्ही थेट AIIMS च्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकाल.

91मोबाईल्स तुम्हाला सांगू इच्छित आहे कि हि बातमी आणि हा नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जेणेकरून तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना सर्व योग्य आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. आता योग्य माहिती आणि योग्य त्या उपाययोजना Coronavirus पासून वाचवू शकतात.

WHO ने पण प्रसिद्ध केला आहे नंबर

जगभरात पसरलेल्या या महामारीसाठी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ आर्गेनाइजेशनने पण आपला नंबर प्रसिद्ध केला आहे. हा नंबर ‘+41798931892‘ असा आहे. भारत सरकारच्या नंबर प्रमाणे या नंबर वर पण ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे, त्यानंतर डब्ल्यूएचओ कडून उत्तर येईल.

WHO कडून उत्तर म्हणून 8 वेगवेगळे पर्याय दिले जातील जे कोरोना वायरस संबंधित असतील . तुम्ही यातील तो पर्याय निवडू शकता ज्याची तुम्हाला माहिती हवी आहे. या नंबर वर Coronavirus पासून वाचण्याची पद्धत आणि ताज्या बातम्यांसह प्रश्न विचारता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here