Covid Vaccine - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Dec 2022 13:08:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग https://www.91mobiles.com/marathi/nasal-vaccine-incovacc-booster-dose-how-to-book-online/ https://www.91mobiles.com/marathi/nasal-vaccine-incovacc-booster-dose-how-to-book-online/#respond Mon, 26 Dec 2022 13:08:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16362 कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे भारत सरकारनं नव्यानं COVID-19 विरोधात नेजल वॅक्सीन Incovacc देण्याची घोषणा केली आहे. ही COVID वॅक्सीन जगातील पहिला नीडलेस लस आहे आणि नाकावाटे दिली जाईल. भारत बायोटेकनं विकसित कोरोनाची ही लस 18 वर्षांवरील सर्वांना देता येईल. इंट्रानेजल वॅक्सीन बूस्टर डोसचे काम करेल आणि सध्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होईल. […]

The post COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे भारत सरकारनं नव्यानं COVID-19 विरोधात नेजल वॅक्सीन Incovacc देण्याची घोषणा केली आहे. ही COVID वॅक्सीन जगातील पहिला नीडलेस लस आहे आणि नाकावाटे दिली जाईल. भारत बायोटेकनं विकसित कोरोनाची ही लस 18 वर्षांवरील सर्वांना देता येईल. इंट्रानेजल वॅक्सीन बूस्टर डोसचे काम करेल आणि सध्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होईल. वॅक्सीन स्लॉट सरकारच्या वॅक्सीन पोर्टल कोविनच्या माध्यमातून ऑनलाइन बुक करता येईल. हे तेच पोर्टल आहे जिथे कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनचे डोस बुक करण्यात आले होते.

नेजल वॅक्सीन ऑनलाईन कसं बुक करायचं

नेजल वॅक्सीन ऑनलाइन बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या डिवाइसवर CoWIN पोर्टल ओपन करा. कोविड पोर्टल लिंक https://www.cowin.gov.in

  • आता तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरनं लॉगइन करा.
  • इथे तुम्हाला शेड्यूल ऑप्शन शोधावा लागेल.
  • त्यानंतर पिनकोड किंवा जिल्ह्याचं नाव टाकून खाजगी वॅक्सीनेशन सेंटर शोधा.
  • तुमच्या जवळच्या वॅक्सीनेशन सेंटरची निवड करा.
  • त्यानंतर नेजल वॅक्सीन बूस्टर शॉटसाठी वेळ निवडा.
  • त्यानंतर वॅक्सीनेशन स्लॉट बुक करा.
  • कोविन (Cowin) पोर्टलवर गेल्या शुक्रवारपासून नेजल वॅक्सीनसाठी ऑनलाइन बुकिंग सुरु झाली आहे.

COVID-19 चं नेजल वॅक्सीन कोणासाठी आहे?

वर सांगितल्याप्रमाणे देशातील सर्व नागरिक ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे ते इनकोवॅक – नेजल कोविड वॅक्सीन घेऊ शकतात. NDTV च्या रिपोर्टनुसार, हा एक हेटरोलोजस बूस्टर वॅक्सीन डोज आहे. म्हणजे हे ज्यांनी वॅक्सीन कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनचे दोन डोस घेतलेत, ते देखील घेऊ शकतात. हे देखील वाचा: Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

तसेच Times of India च्या रिपोर्टनुसार, नेजल वॅक्सीन नाकावाटे दोन वेळ दिलं जाईल. तसेच, पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान चार आठवड्याचं अंतर असलं पाहिजे. म्हणजे एकूण 8 थेंब (0.5 मिली), प्रत्येक नासिकेत चार, प्रति डोस दिले जातील. नेजल वॅक्सीन 2-8 डिग्री सेल्सियसवर स्टेबल राहते.

नेजल वॅक्सीनची किंमत किती?

Incovacc च्या नेजल वॅक्सीनच्या भारतीय किंमतीची माहिती अद्याप उपलब्ध नाही. लसीच्या किंमतीची माहिती मिळताच अपडेट केली जाईल.

नेजल वॅक्सीनचे फायदे?

भारत बायोटेकनुसार, इनकोवॅक नेजल वॅक्सीनचे अनेक फायदे आहेत, जे पुढे सांगण्यात आले आहेत.

  • ही लस त्या लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते कारण ही वॅक्सीन नीडल फ्री आहे आणि नाकावाटे दिली जाते.
  • ही वॅक्सीन नाकावाटे दिली जाईल आणि कोरोना विरोधात चांगली इम्यून सिस्टम विकसित करण्यास मदत करेल.
  • तसेच सुईमुळे होणाऱ्या संक्रमणाचा धोका टळेल.
  • ही वॅक्सीन सोप्या पद्धतीने दिल्यामुळे जास्त कुशल कर्मचाऱ्यांची गरज नाही.

Incovacc नेजल वॅक्सीन ट्रायल, साइड इफॅक्ट, अप्रूवल आणि खूप काही

Incovacc नेजल वॅक्सीनची फेज 3 ट्रायल 3000 लोकांमध्ये झाली आहे ज्यामुळे चार आठवड्यात लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली झाल्याचे दिसून आले. साइड इफॅक्ट पाहता या वॅक्सीनमुळे काही लोकांना डोकेदुखी, ताप, नाक वाहने आणि शिंका, असा त्रास दिसून आला. तसेच काही लोकांना अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन देखील झाल्या आहेत. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

कंपनीनुसार, पहिली लस घेतल्यामुळे ज्या लोकांना गंभीर अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन किंवा जोरदार ताप आला होता त्यांनी नेजल वॅक्सीनचा बूस्टर डोस टाळावा. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं नेजल वॅक्सीनला नोव्हेंबरमध्ये मंजूरी दिली होती. परंतु ही वॅक्सीन फक्त आपातकालीन वापरासाठी उपलब्ध आहे. भारत बायोटेकनं दावा केला आहे की इनकोवॅक वॅक्सीनेशन नंतर कोविड-19 संक्रमणाचा धोका अत्यंत कमी होतो.

The post COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nasal-vaccine-incovacc-booster-dose-how-to-book-online/feed/ 0
COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी https://www.91mobiles.com/marathi/above-18-years-will-get-covid-19-vaccine-from-1st-may-know-how-to-register-cowin-aarogya-setu/ https://www.91mobiles.com/marathi/above-18-years-will-get-covid-19-vaccine-from-1st-may-know-how-to-register-cowin-aarogya-setu/#respond Wed, 28 Apr 2021 13:13:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10738 तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाची नोंदणी करायची असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला Co-WIN अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. तसेच Co-WIN वेबसाइट cowin.gov.in वर पण नोंदणी करता येईल.

The post COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जर तुमचे 18 ते 44 दरम्यान असेल आणि तुम्हाला लस घ्यायची असेल तर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल जी आज म्हणजे बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरु होईल. लक्षात असू द्या कि 18 ते 45 वर्षांच्या लोकांना नोंदणी न करता लस घेता येणार नाही. याआधी देशात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लस दिली जात होती. पण आता कोरोना 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना जाळ्यात ओढत आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. आता तुम्ही विचार करत असाल कि कधी, कुठे आणि किती रुपये देऊन तुम्ही लस घेऊ शकता. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढे दिली आहेत. (Above 18 years will get covid-19 vaccine from 1st May know how to register cowin aarogya setu)

Vaccine ची किंमत किती असेल?

सध्या खाजगी कोविड-19 लसीकरणात कोरोना लसीची किंमत 250 रुपये आहे. पण, 1 मेपासून हि व्यवस्था संपेल आणि खाजगी हॉस्पिटल थेट लस बनवणाऱ्या कंपन्यांकडून लस विकत घेतील. खाजगी दवाखान्यांना कोविशील्डची एक लस 600 रुपयांना मिळेल, तर कोव्हॅक्सिनच्या लसीची किंमत 1200 रुपये प्रति डोस असेल. तर राज्य सरकारला कोविशील्डचा एक डोस 400 रुपयांमध्ये मिळेल तर कोव्हॅक्सिनचा एक डोस 600 रुपयांमध्ये मिळेल. सर्व सरकारी संचालित कोविड -19 सेंटरवर आधीप्रमाणे लस मोफत मिळेल.

Covid Vaccine

या राज्यांतील सरकारी दवाखान्यात मोफत मिळेल लस

  • Assam
  • Andhra Pradesh
  • Bihar
  • Chattisgarh
  • Delhi
  • Goa
  • Gujarat
  • Haryana
  • Himachal Pradesh
  • Jharkhand
  • Karnataka
  • Kerela
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Odisha
  • Punjab
  • Rajasthan
  • Sikkim
  • Tamil Nadu
  • Telangana
  • Uttar Pradesh
  • West Bengal

Corona Vaccine साठी अश्याप्रकारे करता येईल नोंदणी

नोंदणी करण्याच्या आधीप्रमाणेच तीन पद्धती असतील. तुम्ही आधीपासून आपल्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी नोंदणी करू शकता. तसेच ऑन द स्‍पॉट जाऊन नोंदणी करण्याचा पण पर्याय आहे. तिसऱ्या ऑप्शन स्वतःहून लसीसाठी तुमच्याशी संपर्क साधला जाईल. पुढे तिन्ही ऑप्शनबाबत माहिती तुम्हाला देत आहोत.

हे देखील वाचा : Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोन Dimensity 1200, आणि 67W फास्ट चार्जसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स

अश्याप्रकारे करा नोंदणी

जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाची नोंदणी करायची असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला Co-WIN अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. तसेच Co-WIN वेबसाइट cowin.gov.in वर पण नोंदणी करता येईल.

सोप्पी आहे संपूर्ण प्रक्रिया

  1. सर्वप्रथम अ‍ॅप या वेबसाइटवर जा.
  2. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर एक OTP येईल.
  3. OTP टाकल्यानंतर तुमचे अकाउंट तयार होईल, त्यानंतर नाव, वय, लिंग अशी माहिती द्या आणि एक ओळखपत्र अपलोड करा.
  4. जर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या वयाचा पुरावा द्यावा लागेल.
  5. त्यानंतर लसीकरण केंद्र आणि तारीख निवडा.
  6. एक मोबाईल नंबरच्या माध्यमातून 4 अपॉइंटमेंट्स घेता येतील.

ऑन-साइट रजिस्‍ट्रेशन

जर तुम्ही सेल्फ-रजिस्टर करू शकत नसाल तर जवळच्या कोविड लस केंद्रावर जाऊ शकता. तिथे तुम्ही नोंदणी करू शकता.

फेसिलेटेड रजिस्‍ट्रेशन

हि पद्धत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सरकारसाठी आहे. टारगेट ग्रुपसाठी लसीकरणाची तारीख ठरवली जाईल. आरोग्य अधिकारी आपल्या परीने सर्व टारगेट ग्रुपना केंद्रापर्यंत घेऊन येण्याचे प्रयत्न करतील.

हे देखील वाचा : Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही

लसीसाठी हवेत हे डॉक्‍युमेंट्स

कोणत्याही पद्धतीने नोंदणी करा, लसीकरणाच्या आधी तुम्हाला ओळखपत्र दाखवावे लागेल. सरकारने 12 प्रकारची ओळखपत्रे लसीकरणासाठी ठरवली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत:

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्राइविंग लाइसेंस
  • पॅन कार्ड
  • हेल्‍थ इंश्‍योरेंस स्‍मार्ट कार्ड
  • पेंशन डॉक्यूमेंट
  • बॅंक/पोस्‍ट ऑफिस पासबुक

The post COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/above-18-years-will-get-covid-19-vaccine-from-1st-may-know-how-to-register-cowin-aarogya-setu/feed/ 0