Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

Aadhaar Card Mobile Number Update: भारतात आधार कार्ड (Aadhaar card) एक आवश्यक डॉक्यूमेंट आहे, ज्याचा वापर सरकारी कामांसाठी आणि ओळखपत्र म्हणून केला जातो. सध्या अनेक सुविधा ऑनलाइन आल्या आहेत, ज्यासाठी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP ची गरज पडते. त्यामुळे तुमच्या आधार कार्डवर तोच मोबाइल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जो तुमच्याकडे चालू आहे. जर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट झाला असेल तर तुम्ही अनेक सेवा वापरू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला आधार कार्डवरील मोबाइल नंबर अपडेट करण्याची पद्धत सांगणार आहोत.

आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर कसा बदलायचा

जर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट झाला तसे किंवा तुमच्याकडे तो नंबर नसेल तर तुम्ही UIDAI च्या डेटाबेसमध्ये तुमचा नवा नंबर अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल. आधार कार्डवरील फोन नंबर चेंज करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1: तुमच्या जवळच्या आधार इनरोलमेंट सेंटरवर जा.
स्टेप 2: आधार अपडेट/करेक्शन फॉर्म भरा.
स्टेप 3: आधार कार्ड इग्जेक्यटिव्हला को फॉर्म द्या आणि बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशननं तुमचा नंबर अपडेट केला जाईल.
स्टेप 4: आधार कार्डवर फोन नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फी द्यावी लागेल.
स्टेप 5: तुम्हाला आधार कार्ड सेंटरवरून एक एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. यात तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमची अपडेट रिक्वेस्ट चेक करू शकता.

आधार अपॉइंटमेंट अशी करा बुक

आधार कार्डवर मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या आधार सेंटरवर जावं लागेल. आधार सेंटरवर जाण्याआधी तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मोबाइल नंबर चेंज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI चं वेब पोर्टल ओपन करा.
स्टेप 2: तुमचं शहर/लोकेशन सिलेक्ट करून प्रोसीड बटनवर क्लिक करा.
स्टेप 3: तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकू शकता.
स्टेप 4 : आता तुम्हाला मोबाइल नंबर वर OTP येईल. तो सबमिट करा आणि तुमचे आधार डिटेल्स टाका. तिथे तुम्हाला तुमची पर्सनल इंफॉर्मेंश टाकावी लागेल तसेच अपॉइंटमेंटची वेळ आणि तारखा निवडावी लागेल.

ऑनलाइन आधार मोबाइल नबंर कसा व्हेरिफाय करायचा

आधार कार्डवर लिंक मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्याच्या अनेक पद्धती आहेत. इथे तुम्ही URN वरून इमेल किंवा मोबाइल नंबर व्हेरिफाय करू शकता.

1. URN किंवा अपडेट रिक्वेस्ट नंबरच्या माध्यमातून

आधार सेंटरवरून मिळालेल्या एक्नॉलेजमेंट स्लिपमधील URN नंबर वरून तुम्ही अपडेट स्टेटस चेक करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीनं शोध घ्यावा लागेल.

आधार कार्ड सेल्फ सर्व्हिस पोर्टवर तुम्ही My Aadhaar ऑप्शनमध्ये जाऊन ‘Check Aadhaar Status’ चेक करू शकता.

तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि यूआरएन नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून ‘Check Status’ वर क्लिक करा.

2. व्हेरिफाय इमेल/ मोबाइल नंबर ऑप्शन

आधार कार्ड अपडेट स्टेटस चेक करण्याचा दुसरा ऑप्शन व्हेरिफाय इमेल/ मोबाइल नंबर आहे.

Aadhaar च्या ऑफिशियल वेबसाइटवर आधार सर्व्हिस (Aadhaar Services) ऑप्शनमध्ये माय आधार (My Aadhaar) सेक्शनवर जा.

इथे तुमचा 12 डिजिट आधार नंबर, मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड सबमिट करा.

आता तुम्हाला मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल आणि ओटीपी सबमिट करा तसेच व्हेरिफाय इमेल / मोबाइल नंबर बटनवर क्लिक करा.

जर तुमचा नंबर व्हेरिफाय झाला असे तर तुम्हाला वेबसाइटवर मेसेज दिसेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here