Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही

samsung Galaxy M42 5G

Samsung ने आज अनेक दिवसांच्या बातम्यानंतर आपला नवीन फोन Galaxy M42 5G भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने आज एका वर्चुअल इवेंटचे आयोजन करून हा डिवाइस अधिकृतपणे मार्केटमध्ये सादर केला आहे. कंपनीने हा फोन सध्या फक्त भारतीय बाजारात सादर केला आहे, ज्याचे फोटो आणि काही स्पेसिफिकेशन्स सॅमसंगने आधीच ऑफिशियल केले होते. फीचर्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए42 5G फोनचा रिब्रँडेड वर्जन आहे. (Samsung Galaxy M42 5G launch in India 5000mah battery)

डीसेंट लुक

सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी कंपनीने Infinity-U नॉच डिस्प्ले डिजाइनवर सादर केला आहे. फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या स्क्रीनवर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. तर, मागे डावीकडे चौकोनी क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. एकंदरीत फोनचा लुक खूप डिसेंट म्हणता येईल.

शानदार फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M42 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो अपर्चर F1.8 सह येतो. तसेच फोनमध्ये अपर्चर F2.2 सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, F2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. मागील कॅमेऱ्यात फीचर्स म्हणून OIS, रियर कॅमेरा झूम आणि डिजिटल झूम 10x पर्यंत आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M42 5G चा प्रोसेसर आणि रॅम

Samsung Galaxy M42 5G कंपनीने Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसरवर सादर केला गेला आहे. हा प्रोसेसर आपल्या 5G क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक फोन या प्रोसेसरसह आले आहेत. कंपनीचा दावा आहे कि साधारण काम करताना हा सहज मल्टीटास्किंग करू शकतो. तसेच गेमिंगसाठी यात गेम बूस्टर आणि फ्रेम बूस्टर सारखे ऑप्शन आहेत जे तुम्हाला चांगला अनुभव देतील. हा फोन दोन मेमरी वेरियंटमध्ये येतो. कंपनीने हा 6 GB रॅम आणि 8 GB RAM मध्ये सादर केला आहे आणि दोन्हीमध्ये तुम्हाला 128 GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 1 TB ची एक्सपांडेबल मेमरी मिळेल.

Samsung Galaxy M42 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी भारतीय बाजारात 6GB + 128GB मॉडेल 21,999 रुपये आणि 8GB + 128 GB मॉडेल 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन अमेझॉन इंडिया आणि काही निवडक ऑफलाइन स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. खास बाब अशी म्हणता येईल कि हा मेमध्ये अमेझॉन सेलमध्ये 19,999 रुपये आणि 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Prism Dot Black आणि Prism Dot Gray colours सह दोन रंगात उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here