Data Leak - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 29 Aug 2022 08:44:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vi युजर्स लक्ष द्या… तुमच्या कॉल्स ऐकतंय कोणीतरी! कधी, कोणाशी, किती बोलल्याची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-post-paid-user-data-leak-20-million-vi-call-record-and-contact-details-goes-public/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-post-paid-user-data-leak-20-million-vi-call-record-and-contact-details-goes-public/#respond Mon, 29 Aug 2022 08:44:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12570 Vodafone Idea Data Leak: Vi युजर्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबर सुरक्षा संशोधक कंपनी सायबरएक्स9 नं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की इंडियन टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाच्या जवळपास 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. या विआय युजर्सचे कॉल डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत आणि हे Vodafone Idea कंपनीच्या सिस्टममधील त्रुटींमुळे झालं आहे. रिपोर्टनुसार हे […]

The post Vi युजर्स लक्ष द्या… तुमच्या कॉल्स ऐकतंय कोणीतरी! कधी, कोणाशी, किती बोलल्याची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone Idea Data Leak: Vi युजर्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबर सुरक्षा संशोधक कंपनी सायबरएक्स9 नं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की इंडियन टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाच्या जवळपास 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. या विआय युजर्सचे कॉल डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत आणि हे Vodafone Idea कंपनीच्या सिस्टममधील त्रुटींमुळे झालं आहे. रिपोर्टनुसार हे सर्व युजर्स Vi Postpaid ग्राहक आहेत.

Vodafone Idea युजर्ससाठी ही वाईट बातमी आहे. विआय पोस्टपेड नंबर वापरणाऱ्या लोकांचे कॉल डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत. यात ते कधी, कोणाशी आणि कितीवेळ बोलले याची माहिती आहे. फक्त इतकेच नव्हे तर सायबरएक्स9 च्या दाव्यानुसार पुढील सर्व डिटेल्स देखील कंपनीच्या चुकीमुळे सार्वजनिक झाले आहेत. हे देखील वाचा: Jio-Airtel च्या आधी येतंय Vodafone idea चं 5जी! कंपनीनं थेट ग्राहकांना पाठवला मेसेज

Vodafone Idea Post Paid User Data Leak

  • कॉल केल्याची वेळ
  • कॉलचा कालावधी
  • कॉल करण्याचं ठिकाण
  • ग्राहकाचे नाव
  • ग्राहकाचा संपूर्ण पत्ता
  • एसएमएस डिटेल्स
  • कॉन्टेक्ट नंबर ज्यावर मेसेज पाठवण्यात आले

विआय युजर्सचा डेटा कसा लीक

सायबरएक्स9 च्या रिपोर्टनुसार कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या त्रुटींमुळे विआय पोस्टपेड युजर्सचा डेटा लीक झाला आहे. या डेटा लीकचा प्रमुख मार्ग पोस्टपेड बिलिंग सिस्टम असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार कमीत कमी दोन वर्ष जुना डेटा या लीकमध्ये आहे तसेच हा हॅकर्सनी हा डेटा चोरला असावा आणि याचा गैरवापर देखील करत असावेत. सायबरएक्स9 चे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर हिमांशु पाठक यांनी म्हटलं आहे की, त्यांनी याची वोडाफोन आयडियाला माहिती दिली आहे. हे देखील वाचा: त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

Vodafone Idea कडून आलेलं उत्तर

वोडाफोन आयडियानं त्यांच्या डेटा लीक झाल्याची बातमी नाकारली आहे. कंपनीनं आपली बाजू स्पष्ट करत सांगितलं आहे की त्यांच्या बिलिंग सिस्टममधील त्रुटींची माहिती मिळताच त्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या. तसेच ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. Vi नुसार कंपनीकडे मजबूत आयटी डिपार्टमेंट आहे आणि त्यांची टीम नियमित तपासणी करत आपली सुरक्षा अजून मजबूत करत आहे.

The post Vi युजर्स लक्ष द्या… तुमच्या कॉल्स ऐकतंय कोणीतरी! कधी, कोणाशी, किती बोलल्याची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-post-paid-user-data-leak-20-million-vi-call-record-and-contact-details-goes-public/feed/ 0