Jio-Airtel च्या आधी येतंय Vodafone idea चं 5जी! कंपनीनं थेट ग्राहकांना पाठवला मेसेज

5G सर्व्हिसची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. 5G Spectrum च्या लिलावांनंतर Jio, Airtel आणि Vodafone Idea चे युजर्स अधिकृतपणे 5G Service कधी सुरु होईल, याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत कोणत्याही कंपनीनं 5G Launch ची अचूक तारीख मात्र सांगितली नाही. दरम्यान Vodafone Idea नं आपल्या जुन्या ग्राहकांना 5G Launch लाँचबद्दल एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ही बातमी महत्वाची असण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत Reliance Jio आणि Airtel कडून ग्राहकांना 5G लाँचबद्दल कोणताही मेसेज मिळाला नाही. चला जाणून घेऊया की Vi ग्राहकांना 5जी लाँचबद्दल कंपनीकडून कोणता SMS मिळाला आहे.

Vodafone Idea लवकरच लाँच करणार 5G

वोडाफोन आयडियाच्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “खुशखबर!! विआय नेटवर्क 5जीवर अपग्रेड केलं जात आहे! तुमचा अनुभव आता चांगला होईल, लवकरच तुम्ही आमच्या विआय नेटवर्कसह दिल्ली-एनसीआरमध्ये चांगली कव्हरेज आणि सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेऊ शकाल.” हे देखील वाचा: त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

हा मेसेज 91मोबाइल्सच्या एका टीम मेंबरला मिळाला आहे, ज्याचा स्क्रीनशॉट आम्ही वर दाखवला आहे. परंतु, कंपनीद्वारे पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये लाँच डेटची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर वोडाफोन आयडियाची 5G सर्व्हिस येईल, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

5G लाँच डेट

विआयनं भारतात मिळालेल्या ट्रायल स्पेक्ट्रमचा वापर करून आपल्या 5जी नेटवर्कच्या टेस्टिंगसाठी नोकिया आणि एरिक्सनसह भागेदारी केली आहे. तसेच, काही जुन्या रिपोर्ट्सनुसार 5G सेवा 29 सप्टेंबर, 2022 ला लाँच केली जाईल. 29 सप्टेंबरला इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2022 चं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यानिमित्ताने भारतात 5G सेवा देखील जारी केली जाईल. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की Vi 5G देखील वर्षाच्या अखेरपर्यंत अनेक शहरांमध्ये लाइव्ह केलं जाईल. हे देखील वाचा: Airtel आणि Vi पैकी कोणाचा 60 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे सर्वात बेस्ट, जाणून घ्या

Vi 5G Plan असू शकतात महाग

काही दिवसांपूर्वी विआयएलचे व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्कर यांनी गुंतवणूकदारांच्या कॉलमध्ये म्हटलं की कंपनीनं अलीकडेच झालेल्या 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे 5जी सेवेसाठी डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क ठेवलं पाहिजे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवांसाठी यावर्षीच्या अखेरपर्यंत वाढ केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here