Detel - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Nov 2018 18:52:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली जगातील सर्वात स्वस्त टीवी, भारतीय कंपनीने केली कमाल https://www.91mobiles.com/marathi/world-most-economical-tv-detel-19-inch-lcd-tv-launched-in-india-price-rs-3999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/world-most-economical-tv-detel-19-inch-lcd-tv-launched-in-india-price-rs-3999-in-marathi/#respond Tue, 27 Nov 2018 13:01:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2993 डीटेल ने हा स्वस्त एलसीडी ​टेलीविजन ‘हर घर टीवी’ मोहिमे अंतर्गत लॉन्च केला आहे. हा टीवी लॉन्च करण्यामागचा कंपनीचा उद्देश देशातील ग्रामीण व मागासलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांपर्यंत टेलीविजनची सुविधा पोहोचवणे आहे.

The post फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली जगातील सर्वात स्वस्त टीवी, भारतीय कंपनीने केली कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी इंडियन मोबाईल कांग्रेस 2017 मध्ये टेक ब्रँड डीटेल ने जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन म्हणून डीटेल डी1 फीचर फोन सादर केला होता. हा फोन फक्त 299 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता, ज्यामुळे भारतीय बाजारासह संपूर्ण जग अचंबित झाले होते. याच कंपनी ने आज पुन्हा एक नवीन कारनामा केला आहे. मोबाईल बाजारात नाव केल्यानंतर डीटेल ने आज भारतीय टेलीविजन बाजारात नवीन पाउल आहे. डीटेल ने आज जगातील सर्वात स्वस्त टेलीविजन भारतात लॉन्च केला आहे आणि या टीवीची किंमत आहे फक्त 3,999 रुपये.

डीटेल ने 19-इंच डी1 टीवी लॉन्च केला आहे. या टीवीला कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त टीवी म्हटले आहे. डीटेल द्वारा लॉन्च या टेलीविजनची किंमत फक्त 3,999 ठेवण्यात आली आहे. ऐकायला हे जरा विचित्र वाटेल पण हे सत्य आहे कि डीटेलचा हा टीवी एखाद्या सध्या मोबाईल फोन पेक्षा पण स्वस्त आहे. डीटेल ने हा स्वस्त एलसीडी ​टेलीविजन ‘हर घर टीवी’ मोहिमे अंतर्गत लॉन्च केला आहे. हा टीवी लॉन्च करण्यामागचा कंपनीचा उद्देश देशातील ग्रामीण व मागासलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांपर्यंत टेलीविजनची सुविधा पोहोचवणे आहे.

Detel TV

जगातील सर्वात स्वस्त टेलीविजन बद्दल बोलायचे तर यात 19-इंच म्हणजे 48.3 सेंटीमीटरचा एलसीडी एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1366 x 768 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. या टीवी मध्ये ए प्लस ग्रेड पॅनल देण्यात आला आहे पिक्चर क्वॉलिटी चांगली देतो. या टीवीची ब्राइटनेस 200 एनआईटीएस पेक्षा जास्त आहे आणि कन्ट्रास्ट रेशियो 3,00,000:1 इतका आहे. डीटेल ने आपल्या या ​टीवी मध्ये कनेक्टिविटी साठी एक एचडीएमआई आणि एक यूएसबी पोर्ट पण दिला आहे.

डीटेल टीवीसाजूक डिस्प्लेच्या बाजूला बेजल्स आहेत जे टीवीची स्क्रीन सु​रक्षित ठेवतात. तसेच दोन्ही साईड पॅनेल्स वर दोन स्पीकर पण आहेत. कंपनी ने टीवी मध्ये 12 वॉट चे स्पीकर दिले आहेत जे स्मूथ आणि स्पष्ट आॅडियो क्वॉलिटीचा दावा करतात. डीटेल ने या टीवीची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे तसेच डीटेल 19-इंच डी1 टीवी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बी2बी अड्डा डॉट कॉम वर सेल साठी उपलब्ध होईल. कंपनीच्या टीवी च्या खरेदीवर 1 वर्षाची आॅनसाईट वारंटी पण मिळत आहे.

जगातील सर्वात स्वस्त टीवी च्या सविस्तर माहितीसाठी तसेच विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली जगातील सर्वात स्वस्त टीवी, भारतीय कंपनीने केली कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/world-most-economical-tv-detel-19-inch-lcd-tv-launched-in-india-price-rs-3999-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला देशातील पहिला ब्लूटूथ-डाइलर फीचर असलेला फोन, किंमत फक्त 1,099 रुपये https://www.91mobiles.com/marathi/detel-d1-dezire-first-bluetooth-dialler-feature-phone-launched-in-india-feature-specification-price-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/detel-d1-dezire-first-bluetooth-dialler-feature-phone-launched-in-india-feature-specification-price-in-hindi/#respond Tue, 15 May 2018 06:25:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=452 खुपच कमी किमतीत मोबाईल फोन लॉन्च करणारी टेक कंपनी डीटेल बाजारात सर्वात स्वस्त मोबाईल फोन बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. मागच्या महिन्यात डीटेल ने भारतीय बाजारात डी1 टॉकी नावाचा फोन लॉन्च केला होता. तर आज कंपनी ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. डीटेल ने डी1 डिजायर फोन भारतीय बाजारात आणला आहे ज्याची किंमत […]

The post लॉन्च झाला देशातील पहिला ब्लूटूथ-डाइलर फीचर असलेला फोन, किंमत फक्त 1,099 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
खुपच कमी किमतीत मोबाईल फोन लॉन्च करणारी टेक कंपनी डीटेल बाजारात सर्वात स्वस्त मोबाईल फोन बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. मागच्या महिन्यात डीटेल ने भारतीय बाजारात डी1 टॉकी नावाचा फोन लॉन्च केला होता. तर आज कंपनी ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. डीटेल ने डी1 डिजायर फोन भारतीय बाजारात आणला आहे ज्याची किंमत फक्त 1,099 रुपये ठेवण्यात आली आहे. डीटेल च्या इतर मोबाईल फोन्स प्रमाणे हा फोन पण आॅनलाईन शॉपिंग साइट बी2बी अड्डा वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

डीटेल डी1 डिजायर भारतातील पहिला असा फोन आहे ज्यात ब्लूटूथ-डाइलर फीचर आहे. हा फोन ब्लूटूथ ने स्मार्टफोन शी कनेक्ट करता येतो. या फोन च्या स्मार्ट फीचर मुळे स्मार्टफोन वर येणारे कॉल, मेसेज एक्सेस करण्या बरोबरच मीडिया फाईल्स पण वापरता येतात. त्याचबरोबर ​डीटेल डी1 डिजायर मध्ये टॉकिंग फीचर पण देण्यात आला आहे. या फोन ची अजून एक मोठी खासियत फोन मधील लाईव एफएम अलार्म आहे. कोणत्याही ठरलेल्या वेळी एफएम रेडियो ऐकण्यासाठी आधीच अॅलार्म लावता येतो आणि त्यामुळे एफएम वेळ आल्यावर आपोआप आॅन आणि आॅफ होतो.

डीटेल डी1 डिजायर मध्ये 2.8-इंचाचा डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह डिजीटल कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोन मध्ये आॅडियो व वीडियो प्लेयर पण आहे. फोन ची स्टोरेज कार्ड ने 16जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन आॅटो कॉल रिकॉर्डर सह वायरलेस एफएम ची सुविधा पण देतो. फोन मध्ये 3.5एमएम चा आॅडिया जॅक पण देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये गेम्स पण देण्यात आले आहेत.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी पावर सेविंग मोड सह 1,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी किंवा पिन पोर्ट दोन्ही प्रकारे चार्ज केली जाऊ शकते. कंपनी ने डी1 डिजायर मध्ये ब्लूटूथ व जीपीआरएस वेब ब्राउजिंग सोबत पॅनिक बटन पण दिले आहे. डीटेल डी1 डिजायर 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. हा शानदार फीचर फोन 1,099 रुपयांच्या किंमतीत बी2बी अड्डा वरून विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला देशातील पहिला ब्लूटूथ-डाइलर फीचर असलेला फोन, किंमत फक्त 1,099 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/detel-d1-dezire-first-bluetooth-dialler-feature-phone-launched-in-india-feature-specification-price-in-hindi/feed/ 0