गेल्या वर्षी इंडियन मोबाईल कांग्रेस 2017 मध्ये टेक ब्रँड डीटेल ने जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन म्हणून डीटेल डी1 फीचर फोन सादर केला होता. हा फोन फक्त 299 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता, ज्यामुळे भारतीय बाजारासह संपूर्ण जग अचंबित झाले होते. याच कंपनी ने आज पुन्हा एक नवीन कारनामा केला आहे. मोबाईल बाजारात नाव केल्यानंतर डीटेल ने आज भारतीय टेलीविजन बाजारात नवीन पाउल आहे. डीटेल ने आज जगातील सर्वात स्वस्त टेलीविजन भारतात लॉन्च केला आहे आणि या टीवीची किंमत आहे फक्त 3,999 रुपये.
डीटेल ने 19-इंच डी1 टीवी लॉन्च केला आहे. या टीवीला कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त टीवी म्हटले आहे. डीटेल द्वारा लॉन्च या टेलीविजनची किंमत फक्त 3,999 ठेवण्यात आली आहे. ऐकायला हे जरा विचित्र वाटेल पण हे सत्य आहे कि डीटेलचा हा टीवी एखाद्या सध्या मोबाईल फोन पेक्षा पण स्वस्त आहे. डीटेल ने हा स्वस्त एलसीडी टेलीविजन ‘हर घर टीवी’ मोहिमे अंतर्गत लॉन्च केला आहे. हा टीवी लॉन्च करण्यामागचा कंपनीचा उद्देश देशातील ग्रामीण व मागासलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांपर्यंत टेलीविजनची सुविधा पोहोचवणे आहे.

जगातील सर्वात स्वस्त टेलीविजन बद्दल बोलायचे तर यात 19-इंच म्हणजे 48.3 सेंटीमीटरचा एलसीडी एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1366 x 768 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. या टीवी मध्ये ए प्लस ग्रेड पॅनल देण्यात आला आहे पिक्चर क्वॉलिटी चांगली देतो. या टीवीची ब्राइटनेस 200 एनआईटीएस पेक्षा जास्त आहे आणि कन्ट्रास्ट रेशियो 3,00,000:1 इतका आहे. डीटेल ने आपल्या या टीवी मध्ये कनेक्टिविटी साठी एक एचडीएमआई आणि एक यूएसबी पोर्ट पण दिला आहे.
डीटेल टीवीसाजूक डिस्प्लेच्या बाजूला बेजल्स आहेत जे टीवीची स्क्रीन सुरक्षित ठेवतात. तसेच दोन्ही साईड पॅनेल्स वर दोन स्पीकर पण आहेत. कंपनी ने टीवी मध्ये 12 वॉट चे स्पीकर दिले आहेत जे स्मूथ आणि स्पष्ट आॅडियो क्वॉलिटीचा दावा करतात. डीटेल ने या टीवीची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे तसेच डीटेल 19-इंच डी1 टीवी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बी2बी अड्डा डॉट कॉम वर सेल साठी उपलब्ध होईल. कंपनीच्या टीवी च्या खरेदीवर 1 वर्षाची आॅनसाईट वारंटी पण मिळत आहे.
जगातील सर्वात स्वस्त टीवी च्या सविस्तर माहितीसाठी तसेच विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)













