लॉन्च झाला देशातील पहिला ब्लूटूथ-डाइलर फीचर असलेला फोन, किंमत फक्त 1,099 रुपये

खुपच कमी किमतीत मोबाईल फोन लॉन्च करणारी टेक कंपनी डीटेल बाजारात सर्वात स्वस्त मोबाईल फोन बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. मागच्या महिन्यात डीटेल ने भारतीय बाजारात डी1 टॉकी नावाचा फोन लॉन्च केला होता. तर आज कंपनी ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. डीटेल ने डी1 डिजायर फोन भारतीय बाजारात आणला आहे ज्याची किंमत फक्त 1,099 रुपये ठेवण्यात आली आहे. डीटेल च्या इतर मोबाईल फोन्स प्रमाणे हा फोन पण आॅनलाईन शॉपिंग साइट बी2बी अड्डा वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

डीटेल डी1 डिजायर भारतातील पहिला असा फोन आहे ज्यात ब्लूटूथ-डाइलर फीचर आहे. हा फोन ब्लूटूथ ने स्मार्टफोन शी कनेक्ट करता येतो. या फोन च्या स्मार्ट फीचर मुळे स्मार्टफोन वर येणारे कॉल, मेसेज एक्सेस करण्या बरोबरच मीडिया फाईल्स पण वापरता येतात. त्याचबरोबर ​डीटेल डी1 डिजायर मध्ये टॉकिंग फीचर पण देण्यात आला आहे. या फोन ची अजून एक मोठी खासियत फोन मधील लाईव एफएम अलार्म आहे. कोणत्याही ठरलेल्या वेळी एफएम रेडियो ऐकण्यासाठी आधीच अॅलार्म लावता येतो आणि त्यामुळे एफएम वेळ आल्यावर आपोआप आॅन आणि आॅफ होतो.

डीटेल डी1 डिजायर मध्ये 2.8-इंचाचा डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह डिजीटल कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोन मध्ये आॅडियो व वीडियो प्लेयर पण आहे. फोन ची स्टोरेज कार्ड ने 16जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन आॅटो कॉल रिकॉर्डर सह वायरलेस एफएम ची सुविधा पण देतो. फोन मध्ये 3.5एमएम चा आॅडिया जॅक पण देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये गेम्स पण देण्यात आले आहेत.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी पावर सेविंग मोड सह 1,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी किंवा पिन पोर्ट दोन्ही प्रकारे चार्ज केली जाऊ शकते. कंपनी ने डी1 डिजायर मध्ये ब्लूटूथ व जीपीआरएस वेब ब्राउजिंग सोबत पॅनिक बटन पण दिले आहे. डीटेल डी1 डिजायर 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. हा शानदार फीचर फोन 1,099 रुपयांच्या किंमतीत बी2बी अड्डा वरून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here