Digital Wallet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 30 Oct 2018 13:13:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/#respond Tue, 30 Oct 2018 13:13:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2686 आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

The post आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही आॅफिस किंवा कॉलेज मध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मेसेज आला कि पेटीएम मध्ये थोडे पैसे ट्रांसफर कर. पेटीएम मध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही पण कधी तरी असा मेसेज पाठवला असेलच. दूरवरून आॅनलाईन पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोप्पा आणि वेगवान मार्ग बनला आहे. विशेषतः शहरांमध्ये पेटीएम तसेच मोबिक्विक, भीम ऍप व फोनपे सारखे डिजीटल वॉलेट दैनंदिन जीवनाचे भाग झाले आहेत. पण आता पैश्यांच्या देवाणघेवाणीवर निर्बंध येणार आहेत. आता पेटीएम व अन्य डिजीटल वॉलेट वरून एका दिवसात फक्त 10 वेळाच पैसे पाठवता व मिळवता येतील.

डिजीटल वॉलेट वरील देवाणघेवाणीवर नजर ठेवणारा विभाग नॅशनल पेमेंट कॉरपरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने आॅनलाईन ट्रांजेक्शनची दैनिक मर्यादा ठरवली आहे. जे डिजीटल वॉलेट यूपीआई च्या माध्यमातून आॅनलाईन ​ट्रांजेक्शन करतात ते सर्व ऍप एनपीसीआई च्या या मर्यादेत वापरता येतील. या ऍप्स मध्ये असणाऱ्या पेटीएम व भीम सारखे डिजीटल वॉलेट वापरणाऱ्या यूजर्स वर याचा परिणाम होईल. आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

पेटीएम किंवा अन्य वॉलेट वरून जर तुम्ही दुकानदाराला पेमेंट करत असाल तर हि 10 ट्राजेक्शन लिमिट लागू असणार नाही. पण जर एखाद्या मित्राला पैसे ट्रांसफर करत असाल तर मात्र तुम्ही एका दिवसात 10 पेक्षा जास्त ट्रांजेक्शन करू शकणार नाही. एका दिवसात 10 ट्रांजेक्शन सोबतच जास्तीत जास्त 1,00,000 रुपये ट्रांसफर करता येतील. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात यूपीआई च्या माध्यमातून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये हजारो कोटींची वाढ झाली आहे.

एनपीसीआई च्या रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये यूपीआई मधून देशात जवळपास 30 कोटी ट्रांजेक्शन झाले होते. तर यावर्षी ऑगस्ट पर्यंत या ट्रांजेक्शन्सची संख्या 54,000 कोटींवर गेली आहे. ​रिपोर्ट नुसार फक्त जुलै महिन्यात यूपीआई ट्रांजेक्शनची संख्या जवळपास 23.56 कोटी होती जी एका महिन्यात ऑगस्ट पर्यंत 31.2 कोटींवर पोचली. म्हणजे एका महिन्यात यूपीई मधून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये 32 टक्क्यांची वृद्धि झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आरबीआई ने देशात डिजिटल देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन गाइडलाइंस जारी केल्या आहेत. ज्या अंर्तगत एका वॉलेट मधून दुसऱ्या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेट मधील पैसे मोबिक्विक किंवा फोनपे वॉलेट मध्ये पण ट्रांसफर करू शकाल. आरबीआई ने नवीन निर्देश जारी करून सांगितले कि डिजिटल वॉलेट कंपन्या सरकार समर्थित पेमेंट नेटवर्क चा वापर करू शकतात. लवकरच देशात वेगवेगळ्या मोबाईल वॉलेट्स मध्ये पैसे ट्रांसफर करता येतील.

The post आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/feed/ 0
आता पेटीएमच्या पैश्यांनी होईल मोबिक्विकचा रिचार्ज, वेगवेगळे डिजीटल वॉलेट मध्ये करता येईल पैश्यांची देवाण घेवाण https://www.91mobiles.com/marathi/rbi-guidelines-to-transaction-between-different-digital-mobile-wallet-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/rbi-guidelines-to-transaction-between-different-digital-mobile-wallet-in-india-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 14:38:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2569 आरबीआई ने देशात डिजिटल देवाण घेवाण वाढावण्यासाठी नवीन गाइडलाइंस आणल्या आहेत, ज्या अंर्तगत एका वॉलेट वरून दुसर्‍या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील.

The post आता पेटीएमच्या पैश्यांनी होईल मोबिक्विकचा रिचार्ज, वेगवेगळे डिजीटल वॉलेट मध्ये करता येईल पैश्यांची देवाण घेवाण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
डिजीटल इंडिया सोबतच देशात डिजीटल वॉलेट चा वापर वाढला आहे. देशात पेटीएम, मोबिक्विक व फोनपे सारखे अनेक डिजीटल वॉलेट आहेत ज्यांचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आॅनलाईन ट्रांजेक्शन किंवा शॉपिंग करताना हे डिजीटल वॉलेट खूप कमी येतात. कोपर्‍यावरचे दुकान ते इंटरनेट वरील अॅप पर्यंत सर्वच या डिजीटल वॉलेट चा वापर करतात. या डिजीटल वॉलेटचा वापर मजेदार व सुविधाजनक आहे पण जर दोघांकडे एकच वॉलेट नसेल तर यूजर्सना अडचण येते. पण लवकरच ही अडचण दूर होणार आहे आणि एका वॉलेट मधून दुसर्‍या वॉलेट मध्ये पण पैसे ट्रांसफर करता येतील.

जर तुमच्याकडे पेटीएम आणि तुमचा मित्र मोबिक्विक वापरत असेल तर तुम्ही त्याला पैसे देऊ शकणार नाही किंवा मिळवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या दुकानदाराला डिजीटल पेमेंट करायचे असेल तर तुमच्याकडे तो डिजीटल वॉलेट किंवा अॅप असावा लागतो जो दुकानदार वापरत आहे. पण भारतीय रिजर्व बँक म्हणजे आरबीआई आता ही अडचण दूर करणार आहे. लवकरच देशात वेगवेगळ्या मोबाईल वॉलेट्स मध्ये पैसे ट्रांसफर करता येतील.

आरबीआई ने देशात डिजिटल देवाण घेवाण वाढावण्यासाठी नवीन गाइडलाइंस आणल्या आहेत, ज्या अंर्तगत एका वॉलेट वरून दुसर्‍या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेट मधील पैसे मोबिक्विक किंवा फोनपे वॉलेट मध्ये पण ट्रांसफर करू शकाल. आरबीआई ने नवीन दिशानिर्देश जाहिर करून सांगितले आहे की डिजिटल वॉलेट कंपन्या सरकार समर्थित पेमेंट नेटवर्कचा वापर करू शकतात.

रिपोर्ट नुसार आरबीआई ने नवीन गाइडलाइन्स जाहिर करताना सांगितले की गेल्या वर्षीच्या रोडमॅप नुसार, सर्व केवाईसी चे पालन करणारे प्रीपेड पेमेंट इंस्‍ट्रूमेंट्स (पीपीआई) मध्ये एकमेकांत देवाणघेवाण प्रक्रिया तीन टप्प्यात लागू केली गेली पाहिजे. यात पहिला टप्पा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआई च्या माध्यमातून (इंटरऑपरेबिलिटी) मनी ट्रांसफर करण्याचा आहे. तर आरबीआई ने सांगितलेल्या दुसर्‍या टप्प्यात यूपीआई च्या माध्यमातून वॉलेट आणि बँक अकाउंट मध्ये देवाणघेवाण करणे तर तिसर्‍या टप्प्यात कार्ड नेटवर्कच्या माध्यमातून कार्ड स्वरुपात जारी प्रीपेड पेमेंट इंस्‍ट्रूमेंट्स मध्ये इंटरऑपरेबिलिटी म्हणजे मनी ट्रांसफर करता येईल.

इंटरऑपरेबिलिटी एक टेक्नॉलजीकल प्लॅटफॉर्म आहे जो एका पेमेंट सिस्टमला दुसर्‍या पेमेंट सिस्ट‍मशी जोडतो. म्हणजे इंटरऑपरेबिलिटी च्या माध्यमातून एक डिजीटल वॉलेट मधून दुसर्‍या डिजीटल वॉलेट मध्ये ट्रांजेक्शन करता येतील. रिजर्व बँक आॅफ इंडिया ने सर्व टप्प्यात इंटरऑपरेबिलिटी चांगल्या प्रकारे लागू व्हावी यासाठी संयुक्त गाइडलाइंस जाहिर केल्या आहेत. आरबीआई ने फक्त निर्देश दिले आहेत त्यामुळे सारं काही डिजीटल वॉलेट कंपन्यांवर अवलंबून आहे की त्या दुसर्‍या कपंनीच्या डिजीटल वॉलेटशी जोडल्या जाऊ इच्छित आहेत की नाही.

भारतात पेटीएम, मोबिक्विक, फोनपे, फ्रीचार्ज, आॅक्सिजन, पे यू मनी व सिटरस सारख्या वॉलेट चा वापर जास्त केला जातो. इतकेच नव्हे तर देशातील मोठया टेलीकॉम कंपन्यांनी पण जियोमनी, वोडाफोन एम-पैसा व एयरटेल मनी सारखे डिजीटल वॉलेट सादर केले आहेत. जर डिजीटल वॉलेट कंपन्यांनी आरबीआई गाइडलाइन्स लागू केल्या तर देशात फक्त डिजीटल ट्रांजेक्शन्स वाढणार नाहीत तर सामान्य लोकांचे जीवन पण सोप्पे होईल.

The post आता पेटीएमच्या पैश्यांनी होईल मोबिक्विकचा रिचार्ज, वेगवेगळे डिजीटल वॉलेट मध्ये करता येईल पैश्यांची देवाण घेवाण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/rbi-guidelines-to-transaction-between-different-digital-mobile-wallet-in-india-in-marathi/feed/ 0