आता पेटीएमच्या पैश्यांनी होईल मोबिक्विकचा रिचार्ज, वेगवेगळे डिजीटल वॉलेट मध्ये करता येईल पैश्यांची देवाण घेवाण

डिजीटल इंडिया सोबतच देशात डिजीटल वॉलेट चा वापर वाढला आहे. देशात पेटीएम, मोबिक्विक व फोनपे सारखे अनेक डिजीटल वॉलेट आहेत ज्यांचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आॅनलाईन ट्रांजेक्शन किंवा शॉपिंग करताना हे डिजीटल वॉलेट खूप कमी येतात. कोपर्‍यावरचे दुकान ते इंटरनेट वरील अॅप पर्यंत सर्वच या डिजीटल वॉलेट चा वापर करतात. या डिजीटल वॉलेटचा वापर मजेदार व सुविधाजनक आहे पण जर दोघांकडे एकच वॉलेट नसेल तर यूजर्सना अडचण येते. पण लवकरच ही अडचण दूर होणार आहे आणि एका वॉलेट मधून दुसर्‍या वॉलेट मध्ये पण पैसे ट्रांसफर करता येतील.

जर तुमच्याकडे पेटीएम आणि तुमचा मित्र मोबिक्विक वापरत असेल तर तुम्ही त्याला पैसे देऊ शकणार नाही किंवा मिळवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या दुकानदाराला डिजीटल पेमेंट करायचे असेल तर तुमच्याकडे तो डिजीटल वॉलेट किंवा अॅप असावा लागतो जो दुकानदार वापरत आहे. पण भारतीय रिजर्व बँक म्हणजे आरबीआई आता ही अडचण दूर करणार आहे. लवकरच देशात वेगवेगळ्या मोबाईल वॉलेट्स मध्ये पैसे ट्रांसफर करता येतील.

आरबीआई ने देशात डिजिटल देवाण घेवाण वाढावण्यासाठी नवीन गाइडलाइंस आणल्या आहेत, ज्या अंर्तगत एका वॉलेट वरून दुसर्‍या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेट मधील पैसे मोबिक्विक किंवा फोनपे वॉलेट मध्ये पण ट्रांसफर करू शकाल. आरबीआई ने नवीन दिशानिर्देश जाहिर करून सांगितले आहे की डिजिटल वॉलेट कंपन्या सरकार समर्थित पेमेंट नेटवर्कचा वापर करू शकतात.

रिपोर्ट नुसार आरबीआई ने नवीन गाइडलाइन्स जाहिर करताना सांगितले की गेल्या वर्षीच्या रोडमॅप नुसार, सर्व केवाईसी चे पालन करणारे प्रीपेड पेमेंट इंस्‍ट्रूमेंट्स (पीपीआई) मध्ये एकमेकांत देवाणघेवाण प्रक्रिया तीन टप्प्यात लागू केली गेली पाहिजे. यात पहिला टप्पा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआई च्या माध्यमातून (इंटरऑपरेबिलिटी) मनी ट्रांसफर करण्याचा आहे. तर आरबीआई ने सांगितलेल्या दुसर्‍या टप्प्यात यूपीआई च्या माध्यमातून वॉलेट आणि बँक अकाउंट मध्ये देवाणघेवाण करणे तर तिसर्‍या टप्प्यात कार्ड नेटवर्कच्या माध्यमातून कार्ड स्वरुपात जारी प्रीपेड पेमेंट इंस्‍ट्रूमेंट्स मध्ये इंटरऑपरेबिलिटी म्हणजे मनी ट्रांसफर करता येईल.

इंटरऑपरेबिलिटी एक टेक्नॉलजीकल प्लॅटफॉर्म आहे जो एका पेमेंट सिस्टमला दुसर्‍या पेमेंट सिस्ट‍मशी जोडतो. म्हणजे इंटरऑपरेबिलिटी च्या माध्यमातून एक डिजीटल वॉलेट मधून दुसर्‍या डिजीटल वॉलेट मध्ये ट्रांजेक्शन करता येतील. रिजर्व बँक आॅफ इंडिया ने सर्व टप्प्यात इंटरऑपरेबिलिटी चांगल्या प्रकारे लागू व्हावी यासाठी संयुक्त गाइडलाइंस जाहिर केल्या आहेत. आरबीआई ने फक्त निर्देश दिले आहेत त्यामुळे सारं काही डिजीटल वॉलेट कंपन्यांवर अवलंबून आहे की त्या दुसर्‍या कपंनीच्या डिजीटल वॉलेटशी जोडल्या जाऊ इच्छित आहेत की नाही.

भारतात पेटीएम, मोबिक्विक, फोनपे, फ्रीचार्ज, आॅक्सिजन, पे यू मनी व सिटरस सारख्या वॉलेट चा वापर जास्त केला जातो. इतकेच नव्हे तर देशातील मोठया टेलीकॉम कंपन्यांनी पण जियोमनी, वोडाफोन एम-पैसा व एयरटेल मनी सारखे डिजीटल वॉलेट सादर केले आहेत. जर डिजीटल वॉलेट कंपन्यांनी आरबीआई गाइडलाइन्स लागू केल्या तर देशात फक्त डिजीटल ट्रांजेक्शन्स वाढणार नाहीत तर सामान्य लोकांचे जीवन पण सोप्पे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here