Foldable Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Jul 2023 06:17:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/#respond Thu, 27 Jul 2023 06:17:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22594 वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z […]

The post OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z Flip5 लाँच होताच कंपनीनं वनप्लस फोल्डेबल फोनच्या नावाची माहिती दिली आहे.

OnePlus Open येतोय बाजारात

वनप्लसनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे ज्यात ‘We OPEN when others FOLD’ असं लिहिण्यात आलं आहे. हे ट्वीट सॅमसंगनं आपले नवीन फोल्डेबल फोन लाँच केल्यावर करण्यात आलं आहे. हे ट्वीट पाहून अंदाज लावला जात आहे की वनप्लसनं हिंट दिली आहे की त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनचं नाव OnePlus Open असेल.

OnePlus Open कधी येणार (लीक)

कंपनीनं अद्याप फोल्डेबल वनप्लस फोनच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु अलीकडेच आलेल्या एका लीकमध्ये दावा केला गेला होता की हा स्मार्टफोन म्हणजे OnePlus Open 29 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. ह्या दिवशी हा फोन ग्लोबली लाँच होईल जो सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus Open स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • प्रायमरी स्क्रीन : वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 7.8 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 2के रिजोल्यूशन मिळेल. ही स्क्रीन फोन अनफोल्ड केल्यानंतर समोर येईल आणि त्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल.
  • सेकंडरी स्क्रीन : फोन दुमडल्यावर जी स्क्रीन समोर येईल ती 6.3 इंचाची असू शकते. लीकनुसार हा देखील अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या सेकंडरी स्क्रीनवर 32एमपी तर प्रायमरी स्क्रीनवर 20एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48एमपीच्या प्रायमरी कॅमेरा लेन्ससह 48एमपीची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64एमपीची टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच वनप्लस ओपनमध्ये 16जीबी रॅम तसेच 256जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 4,800एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जोडीला 100वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

The post OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/feed/ 0
फोल्डबेल सेगमेंटमध्ये OPPO चे दोन स्मार्टफोन येणार https://www.91mobiles.com/marathi/oppo-will-soon-launch-two-foldable-smartphones-suggest-leaks/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-will-soon-launch-two-foldable-smartphones-suggest-leaks/#respond Mon, 04 Jul 2022 12:31:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11103 Oppo च्या नव्या दोन फोल्डेबल स्मार्टफोनची महत्वाची माहिती समोर आली आहे.

The post फोल्डबेल सेगमेंटमध्ये OPPO चे दोन स्मार्टफोन येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कंपनी सध्या फोल्डेबल स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या सेगमेंटमध्ये जुनी स्मार्टफोन कंपनी असल्यामुळे कंपनीनं फोल्डेबल्ससाठी अनुरूप असं सॉफ्टवेयर तयार केलं आहे. या फोन्सवर उपलब्ध असलेल्या मोठ्या स्क्रीनचा वापर करण्यात हे हँडसेट यशस्वी होत असल्यामुळे अनेकजण सॅमसंगचं कौतुक करत असतात. परंतु आता कदाचित हे बदलू शकतं, OPPO आपले दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन सादर करणार आहे.

OPPO Find N कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. हा फोन फक्त चीनमध्ये सादर करण्यात आला होता, या हँडसेटच्या युजर्सनी स्मार्टफोनच्या डिजाईनची तारीफ केली आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo आता आपल्या दोन नेक्स्ट जेनेरेशन फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे, अशी माहिती प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे. यातील एक क्लॅमशेल फोल्ड डिजाइनसह येईल आणि दुसरा पुस्तकाप्रमाणे फोल्ड होईल.

रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या Galaxy Z Flip लाइनअप प्रमाणे दिसणाऱ्या ओप्पो फोल्डेबलचं कोडनेम Dragonfly आहे. बाजारात हा फोन कोणत्या नावानं येईल, हे मात्र अजून ठरलं नाही. हा क्लॅमशेल डिजाइन असलेला ओप्पो फोन 120Hz रिफ्रेश रेटसह ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. लीक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, ओप्पो आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची जाडी कमी करण्यासाठी नवीन हिंज स्ट्रक्चरचा वापर करू शकते.

OPPO चे आगामी फोल्डेबल फोन्स

OPPO सध्या आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N च्या उत्तराधिकाऱ्यावर काम करत आहे. ओप्पोचा हा फोल्डेबल फोन Oppo Find N 2 नावानं सादर केला जाऊ शकतो. या फोचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ओप्पोच्या आगामी फोल्डेबल फोन जुन्या मॉडेलच्या वजन आणि जाडीच्या तुलनेत खूप ऑप्टिमाइज्ड असेल. ओप्पो दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे. यातील एक क्लॅमशेल फोल्ड डिजाइनसह येईल आणि रेगुलर फोल्डेबल फोनप्रमाणे असेल.

त्याचबरोबर OPPO बद्दल बोललं जात आहे की, कंपनी हाय-परफॉर्मन्स फ्लॅगशिप स्मार्टफोनवर देखील काम करत आहे जे 2022 च्या उत्तरार्धात लाँच केले जातील. ओप्पोचे हे आगामी स्मार्टफोन Qualcomm Snapdragon आणि MediaTek Dimensity प्रोसेसरसह बाजारात येतील. कंपनी आपल्या Find आणि Reno सीरिजमध्ये या हँडसेटचा समावेश करू शकते. या प्रीमियम हँडसेटच्या नावाची किंवा फीचर्सची कोणतीही माहिती मिळाली नाही.

The post फोल्डबेल सेगमेंटमध्ये OPPO चे दोन स्मार्टफोन येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-will-soon-launch-two-foldable-smartphones-suggest-leaks/feed/ 0
समोर आला LG चा फोल्डेबल फोन, खेचून मोठा करता येईल डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/lg-patent-an-expanding-foldable-display-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/lg-patent-an-expanding-foldable-display-smartphone/#respond Mon, 18 Nov 2019 12:39:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5800 कंपनी या फोन मध्ये फोल्डेबल नाही तर एक्सपांडेबल डिस्प्लेचा वापर करेल

The post समोर आला LG चा फोल्डेबल फोन, खेचून मोठा करता येईल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या जगभरातील स्मार्टफोन कंपन्या आपला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आणि हुवावेच्या Mate X नंतर नुकताच मोटोरोलाने पण Moto Razr 2019 सह फोल्डेबल स्मार्टफोनच्या मार्केट मध्ये पाऊल टाकले होते. तसेच यावर्षीच्या सुरवातीला LG ने पण आपल्या फोल्डेबल फोन LG G8X ThinQ सादर केला होता. आता असे वाटत आहे कि एलजी आपला दुसरा फोल्डेबल फोन सादर करण्याचा विचार करत आहे.

एलजी आता अजून एक फोल्डेबल फोन सादर करून या सेगमेंटवर पकड मजबूत करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एक नवीन फोल्डिंग स्मार्टफोन कॉन्सेप्ट पेटेंट केला आहे. एलजी ने फाइल केलेला पेटेंट फाटा हा फोन आता पर्यंत समोर आलेल्या फोल्डिंग फोन पेक्षा खूप वेगळा असेल. कंपनी या फोन मध्ये फोल्डेबल नाही तर एक्सपांडेबल डिस्प्लेचा वापर करेल. याचा अर्थ असा कि या फोनचा डिस्प्ले तुम्ही खेचून वाढवू शकता.

फोन दिसायला अगदी सामान्य स्मार्टफोन प्रमाणे असेल. पण गरज पडल्यास यूजर याला खेचून याचा आकार वाढवू शकतात. यामुळे डिस्प्ले अजून रुंद होईल. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो स्मार्टफोनपेक्षा जास्त ई-रीडर सारखा वाटतो. सध्यातरी हा फक्त डेव्हलपमेंट मध्ये आहे. त्यामुळे जास्त बोलणे चुकीचे ठरेल.

आशा आहे कि आगामी काळात एलजीच्या फोल्डेबल फोन बद्दल अजून पण अनेक खुलासे होतील. तसेच या पेटेंट मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पेटेंट मध्ये फक्त फोनची डिजाइन दाखवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे याआधी शाओमी ओप्पो आणि ऍप्पलच्या फोल्डेबल फोनचे पेटेंट समोर आले आहेत. ज्यामुळे अपेक्षा वाढल्यात कि कंपन्या आता फोल्डेबल स्मार्टफोनच्या मार्केट मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि एलजीने वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशन (WIPO) मध्ये मार्च 2018 मध्ये एक स्मार्टफोन डिजाईन पेटेंट साठी अर्ज केला होता आणि 11 मे 2019 ला नोंदवण्यात आला होता. या नवीन डिजाइन मध्ये पेंटा कॅमेरा सेटअप बॅक मध्ये दिसला होता. रियर कॅमेरा सेटअप पैकी तीन वर्टीकल शेप आणि दोन हॉरिजोंटल शेप मध्ये एलईडी फ्लॅश सह होते.

पेटेंट वरून समोर आले होते कि फोन मध्ये स्लिम बेजल फ्रंटला असतील. तसेच या ईयरपीस वर डुअल सेल्फी कॅमेरा असेल. तसेच फोनच्या मागे फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो जो सध्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स मध्ये दिसत नाही.

The post समोर आला LG चा फोल्डेबल फोन, खेचून मोठा करता येईल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-patent-an-expanding-foldable-display-smartphone/feed/ 0