फोल्डबेल सेगमेंटमध्ये OPPO चे दोन स्मार्टफोन येणार

सॅमसंग कंपनी सध्या फोल्डेबल स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या सेगमेंटमध्ये जुनी स्मार्टफोन कंपनी असल्यामुळे कंपनीनं फोल्डेबल्ससाठी अनुरूप असं सॉफ्टवेयर तयार केलं आहे. या फोन्सवर उपलब्ध असलेल्या मोठ्या स्क्रीनचा वापर करण्यात हे हँडसेट यशस्वी होत असल्यामुळे अनेकजण सॅमसंगचं कौतुक करत असतात. परंतु आता कदाचित हे बदलू शकतं, OPPO आपले दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन सादर करणार आहे.

OPPO Find N कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. हा फोन फक्त चीनमध्ये सादर करण्यात आला होता, या हँडसेटच्या युजर्सनी स्मार्टफोनच्या डिजाईनची तारीफ केली आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo आता आपल्या दोन नेक्स्ट जेनेरेशन फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे, अशी माहिती प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे. यातील एक क्लॅमशेल फोल्ड डिजाइनसह येईल आणि दुसरा पुस्तकाप्रमाणे फोल्ड होईल.

रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या Galaxy Z Flip लाइनअप प्रमाणे दिसणाऱ्या ओप्पो फोल्डेबलचं कोडनेम Dragonfly आहे. बाजारात हा फोन कोणत्या नावानं येईल, हे मात्र अजून ठरलं नाही. हा क्लॅमशेल डिजाइन असलेला ओप्पो फोन 120Hz रिफ्रेश रेटसह ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. लीक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, ओप्पो आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची जाडी कमी करण्यासाठी नवीन हिंज स्ट्रक्चरचा वापर करू शकते.

OPPO चे आगामी फोल्डेबल फोन्स

OPPO सध्या आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N च्या उत्तराधिकाऱ्यावर काम करत आहे. ओप्पोचा हा फोल्डेबल फोन Oppo Find N 2 नावानं सादर केला जाऊ शकतो. या फोचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ओप्पोच्या आगामी फोल्डेबल फोन जुन्या मॉडेलच्या वजन आणि जाडीच्या तुलनेत खूप ऑप्टिमाइज्ड असेल. ओप्पो दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे. यातील एक क्लॅमशेल फोल्ड डिजाइनसह येईल आणि रेगुलर फोल्डेबल फोनप्रमाणे असेल.

त्याचबरोबर OPPO बद्दल बोललं जात आहे की, कंपनी हाय-परफॉर्मन्स फ्लॅगशिप स्मार्टफोनवर देखील काम करत आहे जे 2022 च्या उत्तरार्धात लाँच केले जातील. ओप्पोचे हे आगामी स्मार्टफोन Qualcomm Snapdragon आणि MediaTek Dimensity प्रोसेसरसह बाजारात येतील. कंपनी आपल्या Find आणि Reno सीरिजमध्ये या हँडसेटचा समावेश करू शकते. या प्रीमियम हँडसेटच्या नावाची किंवा फीचर्सची कोणतीही माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here