OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा

वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z Flip5 लाँच होताच कंपनीनं वनप्लस फोल्डेबल फोनच्या नावाची माहिती दिली आहे.

OnePlus Open येतोय बाजारात

वनप्लसनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे ज्यात ‘We OPEN when others FOLD’ असं लिहिण्यात आलं आहे. हे ट्वीट सॅमसंगनं आपले नवीन फोल्डेबल फोन लाँच केल्यावर करण्यात आलं आहे. हे ट्वीट पाहून अंदाज लावला जात आहे की वनप्लसनं हिंट दिली आहे की त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनचं नाव OnePlus Open असेल.

OnePlus Open कधी येणार (लीक)

कंपनीनं अद्याप फोल्डेबल वनप्लस फोनच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु अलीकडेच आलेल्या एका लीकमध्ये दावा केला गेला होता की हा स्मार्टफोन म्हणजे OnePlus Open 29 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. ह्या दिवशी हा फोन ग्लोबली लाँच होईल जो सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus Open स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • प्रायमरी स्क्रीन : वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 7.8 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 2के रिजोल्यूशन मिळेल. ही स्क्रीन फोन अनफोल्ड केल्यानंतर समोर येईल आणि त्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल.
  • सेकंडरी स्क्रीन : फोन दुमडल्यावर जी स्क्रीन समोर येईल ती 6.3 इंचाची असू शकते. लीकनुसार हा देखील अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या सेकंडरी स्क्रीनवर 32एमपी तर प्रायमरी स्क्रीनवर 20एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48एमपीच्या प्रायमरी कॅमेरा लेन्ससह 48एमपीची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64एमपीची टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच वनप्लस ओपनमध्ये 16जीबी रॅम तसेच 256जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 4,800एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जोडीला 100वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here