Galaxy A31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-in-india-rs-1000-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-in-india-rs-1000-amazon-india/#respond Tue, 15 Sep 2020 09:12:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8150 Samsung Galaxy A31 ची किंमत आधी 20,999 रुपये होती.

The post 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A31 ची किंमत भारतात पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर आता कंपनीने फोनची किंमत पुन्हा 1,000 रुपयांनी कमी केली आहे. Samsung अनेक दिवसांपासून आपल्या फोन्सच्या किंमत कमी करून ग्राहकांना सरप्राइज करत आहे. अलीकडेच गॅलेक्सी ए51 आणि ए71 च्या किंमतीत कपात करण्यात आली होती.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए31 ची किंमत आधी 20,999 रुपये होती. आता नवीन किंमत 19,999 रुपये आहे. हि किंमत 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. फोन अमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या साइट वर नवीन किंमतीत उपलब्ध आहे. ग्राहक हा फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश ब्लू आणि प्रिज्मक्रश व्हाइट कलर ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकतात.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

हे देखील वाचा: Samsung या महिन्यात लॉन्च करेल कॅमेरा सेंट्रिक Galaxy F सीरीज, किंमत असेल 15,000 च्या आसपास

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए31 वीडियो

The post 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-price-cut-in-india-rs-1000-amazon-india/feed/ 0
5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/#respond Tue, 24 Mar 2020 14:32:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6885 Samsung Galaxy A31 कंपनीने ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून सादर केला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्याच आठवड्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A41 लॉन्च केला होता. हा डिवाईस सध्या जापान मध्ये ऑफिशियल केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल. गॅलेक्सी ए41 च्या लॉन्च नंतर आज सॅमसंगने आपल्या या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन Samsung Galaxy A31 पण टेक मंचावर सादर केला आहे. कंपनीने आता या फोनची किंमत सांगितली नाही, पण गॅलेक्सी ए31 येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A31 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी नॅरो बेजल्स असलेला आहे तर खालच्या बाजूला थोडी रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या उजवीकडे चौकोनी आकाराचा आहे.

या रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा लेंस देण्यात आल्या आहेत जो L-शेप मध्ये आहे. चौकोनी आकारात सेंसर्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तर खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. Galaxy A31 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. त्याचप्रमाणे फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो. कंपनीने फोनच्या चिपसेटची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि बाजारात हा फोन मीडियाटेक हीलियो पी65 सह लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 कंपनीने ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून सादर केला आहे. वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A31 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-officially-launched-quad-rear-20mp-selfie-camera-5000mah-battery-feature-specifications-price-sale/feed/ 0