Samsung या महिन्यात लॉन्च करेल कॅमेरा सेंट्रिक Galaxy F सीरीज, किंमत असेल 15,000 च्या आसपास

साउथ कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग या महिन्याच्या शेवटपर्यंत एक नवीन सीरीज सादर करू शकते. Galaxy F नावाच्या या नवीन सीरीजच्या माध्यमातून कंपनी भारतात मिड-रेंज सेंगमेंट मध्ये नवीन फोन्स सादर करेल. 91मोबाईल्सला इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि गॅलेक्सी एफ सीरीजच्या स्मार्टफोन्सची किंमत 15,000 रुपयांपासून 20,000 रुपयांच्या आत असेल आणि या सीरीजचे फोन्स कॅमेरा-सेंट्रिक असतील. तसेच गॅलेक्सी एफ लाइनअप मध्ये पहिला फोन या महिन्याच्या शेवटी लॉन्च केला जाईल जो ऑनलाइन विकला जाईल. कंपनी आपली गॅलेक्सी एफ सीरीज सुरवातीला ऑनलाइन बाजारात आणेल, जी नंतर ऑफलाइन आणण्याचा विचार केला जाऊ शकतो. असेच कंपनीने गॅलेक्सी एम सीरीज सह केले होते.

15,000 ते 20,000 रुपयांमध्ये सॅमसंगकडे M सीरीजचे फोन्स आहेत. त्यामुळे नवीन सीरीज आल्यानंतर कंपनी गॅलेक्सी एम सीरीज कशाप्रकारे वेगळी करते हे बघावे लागेल. आम्हाला एवढेच माहित आहे कि नवीन सीरीज कॅमेरा सेंट्रिक असेल त्यामुळे तुम्ही आशा करू शकता गॅलेक्सी एम च्या तुलनेत या नवीन सीरीजचे फोन्स चांगले फोटोज घेऊ शकतील.

विशेष म्हणजे सॅमसंग यावर्षी खूप वेगाने आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे.गेल्या काही आठवड्यांत कंपनीने अनेक नवीन डिवाइसेस- गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा, नोट 20, गॅलेक्सी Z फोल्ड 2, गॅलेक्सी Z फ्लिप 5G आणि गॅलेक्सी वॉच 3 सोबत काही टॅब्लेट्स पण लॉन्च केले आहेत. आता सॅमसंग 23 सप्टेंबरला पुन्हा एकदा गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटचे आयोजन करणार आहे. Galaxy Unpacked for Everyone नावाच्या या इवेंट मध्ये कंपनी गॅलेक्सी एस 20 फॅन एडिशन सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 7000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M51 लॉन्च, चीनी ब्रँड्सची करेल सुट्टी

Samsung ने याच महिन्यात Galaxy A42 5G जर्मनी मध्ये ऑफिशियल केला होता. सॅमसंगने प्रेस रिलीजच्या माध्यमातून गॅलेक्सी ए42 स्मार्टफोनच्या किंमतीसोबतच याच्या कलर वेरिएंट्सची पण घोषणा केली होती. सॅमसंगने सांगितले आहे कि गॅलेक्सी ए42 5जी यूरोपियन बाजारात नोव्हेंबर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि याची किंमत 369 यूरो म्हणजे 32,000 रुपयांच्या आसपास असेल. जर्मनी मध्ये हा फोन सध्या एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे आणि हा Black, White आणि Gray कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here