Honor 20 Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Apr 2021 13:26:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Huawei Nova 8 Pro आणि Honor Play 20 स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-pro-4g-and-honor-play-20-launched-check-price-specifications-and-other-details/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-pro-4g-and-honor-play-20-launched-check-price-specifications-and-other-details/#respond Mon, 26 Apr 2021 13:26:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10705 Honor ने एंट्री लेवल स्मार्टफोन Honor Play 20 को मार्केटमध्ये सादर केला आहे तर हुवावेने Huawei Nova 8 Pro स्मार्टफोनचा 4G वेरिएंट लॉन्च केला आहे.

The post Huawei Nova 8 Pro आणि Honor Play 20 स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei आणि सब-ब्रँड Honor ने होम मार्केट चीनमध्ये दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Honor ने एंट्री लेवल स्मार्टफोन Honor Play 20 को मार्केटमध्ये सादर केला आहे तर हुवावेने Huawei Nova 8 Pro स्मार्टफोनचा 4G वेरिएंट लॉन्च केला आहे. Honor चा लेटेस्ट स्मार्टफोन Unisoc Tiger T610 चिपसेटसह लॉन्च केला गेला आहे. तसेच हुवावे ने Huawei Nova 8 Pro स्मार्टफोनचा 4G वेरिएंट Kirin 985 चिपसेटसह सादर केला आहे. इथे आम्ही तुम्हाला हुवावे आणि ऑनरच्या दोन्ही स्मार्टफोनबाबत संपूर्ण माहिती देत आहोत. (Huawei Nova 8 Pro 4G and Honor Play 20 launched check price specifications and other details)

Honor Play 20 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर

Honor Play 20 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन HD+ 720 x 1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वाटर ड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. ऑनरच्या या फोनमध्ये 12bn Unisoc Tiger T610 चिपसेट आहे, ज्यात 2 x Cortex A75 कोर आणि 6 x Cortex A55 कोर देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU देण्यात आला आहे.

Honor Play 20 स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये स्टोरेजसाठी microSD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. ऑनरचा हा फोन Android 10 OS वर आधारित Magic UI 4.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आला आहे.

कॅमेरा मॉड्यूल पाहता या फोनच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे, सोबत 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Huawei Nova 8 Pro 4G स्पेसिफिकेशन्स

Huawei Nova 8 Pro 4G स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन FullHD+ 2676 x 1236 पिक्सल आहे. त्याचबरोबर या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हुवावेचा हा स्मार्टफोन कंपनीच्या Kirin 985 चिपसेटसह 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Nova 8 Pro 4G स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा वाइड आणि 32MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : मोफत मजा ठरू शकते सजा, हे मेसेज चुकूनही उघडू नका

Nova 8 Pro 4G स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलवर कंपनीने फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. या फोनमध्ये कंपनीने 4000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 66W फास्ट चार्ज सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे कि या फोनची बॅटरी फक्त 35 मिनिटांत फुल चार्ज होते.

किंमत

Honor Play 20 स्मार्टफोन तीन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 4 GB RAM + 128 GB स्टोरेजसह 899 युआन (करीब 10,300 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. फोनचा दुसरा वेरिएंट 6 GB RAM + 128 GB स्टोरेजसह 1099 युआन (करीब 12,600 रुपये) आणि तिसरा वेरिएंट 8 GB RAM + 128 GB स्टोरेजसह 1,399 युआन (करीब 16,100रुपये) सह सादर केला गेला आहे. ऑनरचा हा स्मार्टफोन मॅजिक नाइट ब्लॅक, आइसलँड व्हाइट, ऑरोरा ब्लू आणि टाइटेनियम सिल्वर कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. Huawei Nova 8 Pro 4G स्मार्टफोनची किंमत कंपनीने सांगितलेली नाही.

The post Huawei Nova 8 Pro आणि Honor Play 20 स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-pro-4g-and-honor-play-20-launched-check-price-specifications-and-other-details/feed/ 0