WhatsApp वर सध्या एक मेसेज वेगाने वायरल होत आहे, ज्यात Amazon Prime video आणि Netflix सारख्या व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्सवर फ्री अॅक्सेसचा दावा केला जात आहे. पण या मेसेजपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे कारण फ्रीची मजा तुमच्यासाठी सजा बानू शकते. अशाप्रकारच्या लिंक नकली आहेत ज्या वेगाने व्हाट्सअॅपवर वायरल होत आहेत. तर, काही लोक कोणताही विचार न करता या लिंकवर क्लिक पण करतात आणि हा मेसेज पुढे इतरांना पाठवून देतात. लक्षात असू द्या कि अश्याप्रकारच्या मेसेजमधील लिंक तुमच्या बॅंकिंग डिटेलसह अनेक डेटा चोरू शकतात. फक्त लिंकवर क्लिक करताच तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर येता आणि आणि तुमच्या लक्षात येईस्तोवर उशीर झालेला असतो. अश्या केसेस बघून अश्याप्रकरच्या लिंकपासून सावधान राहण्यासाठी Delhi Police Cybercrime ने अलर्ट जारी केला आहे. (Delhi Police warns do not open Amazon Netflix free links on Whatsapp)
अलर्ट काय आहे
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम यूनिटने ट्वीटमध्ये इंटरनेट युजर्सना म्हटले आहे कि त्यांनी अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये आणि त्याचबरोबर या व्हाट्सअॅपवर एकमेकांशी शेयर पण करू नये. यात सांगण्यात आले आहे कि अश्या लिंक अनेक नकली मेसेजसह पाठवण्यात येतात त्यामुळे त्यांना ब्लॉक केले पाहिजे.
कई व्हाट्सऐप यूजर्स के पास नीचे दिए गए संदेश प्राप्त हो रहे हैं।
????
इन संदेशों में ऐसे URL/लिंक हैं जिन्हें एंटीवायरस इंजन मालवेयर/वायरस बता रहे हैं। इन लिंक को ब्लॉक कर दिया गया है।चेतावनी ⚠️
? कभी भी ऐसे लिंक पर क्लिक न करें।
? कभी भी इन्हें आगे फॉरवर्ड ना करें। pic.twitter.com/UmeDpwUgvY— DCP Cybercrime (@DCP_CCC_Delhi) April 19, 2021
DCP सायबर क्राइमच्या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे कि ‘अश्या मेसेजमध्ये URL किंवा लिंक असते, जी अनेक अँटीवायरस इंजनद्वारे फसवणूक असल्याचे सांगण्यात आले आहे. लिंक ब्लॉक करण्यात आली आहे. सावधान रहा आणि अश्या लिंकवर कधीही क्लिक करू नका आणि असा मेसेज पुढे पाठवू नका.’
वायरल मेसेजची ओळख
* ट्विटर पोस्टमध्ये अश्या अनेक मेसेजचे स्क्रीनशॉट पण शेयर केले गेले आहेत जे युजर्सना व्हाट्सअॅपवर आले आहेत. या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे कि 60 दिवसांसाठी म्हणजे दोन महिन्यांसाठी Amazon Premium मोफत मिळत आहे.
* जर अश्या प्रकारचे मेसेज लक्ष देऊन वाचले तर या नकली मेसेजची ओळख सहज पटू शकते. कारण यात Amazon Prime च्या ऐवजी Amazon Premium लिहिण्यात आले आहे.
* शेयर केल्या गेलेल्या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे कि युजर्सच्या क्रेडिट कार्डची माहिती, पासवर्ड, फोटो आणि मेसेज सारखी खाजगी माहिती चोरी करण्याच्या प्रयत्नात असे मेसेज पाठवले जात आहेत.
मोफतची हाव पडू शकते महागात
ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या केसेस पाहता युजर्सना हा सल्ला दिला जात आहे कि या फ्री ऑफर देणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये आणि असा मेसेज आल्यावर सावध रहा. अश्या मेसेजची माहिती त्वरित पोलीस आणि सायबर क्राइमला द्यावी.















