Huawei Mate 20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Nov 2018 14:25:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-product-page-listed-indian-website-might-launch-28-november-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-product-page-listed-indian-website-might-launch-28-november-in-marathi/#respond Mon, 05 Nov 2018 14:25:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2804 किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात.

The post 40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपली मेट सीरीज वाढवत एक साथ चार स्मार्टफोन लॉन्च केले होते. या सीरीज मध्ये हुआवई मेट 20, मेट 20 प्रो, मेट 20एक्स आणि मेट 20 आरएस फोन्सचा समावेश होता. हुआवई मेट 20 सीरीज मध्ये कंपनीचे हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आहेत जे शानदार डिजाईन सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतात. हुआवई ने आधीच घोषणा केली आहे कि इंटरनेशनल मार्केट मध्ये हिट होणारे हे स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहेत. त्यानुसार आज हुआवई मेट 20 प्रो कंपनीच्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

हुआवई इंडिया वर मेट 20 सीरीजचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेज वर कंपनीचा नवीन स्मार्टफोन हुआवई मेट 20 प्रो दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हुआवई इंडियाच्या प्रोडक्ट पेज वर लिस्ट मेट 20 प्रो मध्ये 6जीबी रॅम मेमरी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यावरून स्प्ष्ट होते कि कंपनी भारतात मेट 20 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट आणण्याची तयारी करत आहे. हुआवई इंडिया ने अजूनतरी फोन लॉन्चची तारीख सांगितली नाही पण काही ​मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे कि मेट 20 प्रो 28 नोव्हेंबरला भारतीय बाजारात येईल.

हुआवई मेट 20 प्रो मध्ये ​3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 40—मेगापिक्सल + 20—मेगापिक्सल + 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा लेइका लेंस सह सादर केला आहे जी चांगल्या पिक्चर क्वालिटी साठी ओळखली जाते. त्याचबरोबर हा 3एक्स आॅप्टिकल झूमला सपोर्ट करतो. कॅमेरा सोबत तुम्हाला ओआईएस आणि ईआईएस सपोर्ट ​पण मिळेल. हा फोन 25—मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेर्‍यासह येतो जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा फेस रिकॉग्निशन साठी पण उपयोगी पडतो. शानदार कॅमेरा सोबतच या फोनची दुसरी खासियत आहे याची आॅपरेटिंग सिस्टम.

याचबरोबर फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट आहे जो 10 लेवल डायनेमिक प्रेशर सेंसेटिव आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जवळपास 30 टक्के फास्ट आहे. डिस्प्ले पाहता हुआवई मेट 20 प्रो मध्ये 6.39-इंचाची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे जी 1,440 x 3,120 पिक्सल वाल्या क्वाड एचडी डिस्प्ले सह येते. फोनचा स्क्रीन टू बॉडी ​रेशियो 87 परसेंटचा आहे आणि हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. हुआवई मेट 20 प्रो किरीन 980 चिपसेट वर चालतो जो हुआवई चा नवीन आणि ताकदवान चिपसेट आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,200 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज होते. किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात. हुआवई कधी मेट 20 प्रो भारतात लॉन्च करेल आणि या फोनचे कोणते मॉडेल देशात येतील यासाठी कंपनीच्या आॅफिशियल घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-product-page-listed-indian-website-might-launch-28-november-in-marathi/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला हुआवई मेट 20 https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-launch-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-launch-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 17 Oct 2018 08:11:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2542 हुआवई ने मेट 20 आणि मेट 20 प्रो सादर केले आहेत जे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

The post ट्रिपल रियर कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला हुआवई मेट 20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की कंपनी लवकरच आपली मेट सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हुआवई च्या घोषणेनंतर या फ्लॅगशिप सीरीज च्या नवीन डिवाईस मेट 20 ची वाट जगभरातील टेक प्रेमी बघत होते. काल कंपनीने लंडन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करून एक साथ दोन हाईएंड लॉन्च केले आहेत. हुआवई ने मेट 20 आणि मेट 20 प्रो सादर केले आहेत जे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

हुआवई मेट 20 कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. हा फोन 18.7:9 आस्पेक्ट ​रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये 1,080 x 2,244 ​पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.53-इंचाचा एचडीआर आरजीबीडब्ल्यू डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला एक्स्ट्रा लेयर प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनचे किनारे नॅरो बेजल्स वाले आहेत ज्यामुळे मेट 20 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88 टक्के होतो.

हा फोन एंडरॉयड च्या सर्वात नवीन वर्जन एंडरॉयड 9.0 पाई आॅपरेटिंग सिस्टम सह सादर करण्यात आला आहे सोबतच हा हुआवई च्या ईएमयूआई 9.0 वर चालतो. प्रोसेसिंग साठी हा फोन 7एनएम टेक्नोलॉजी वर बनलेल्या हुआवई च्या सर्वात दमदार चिपसेट किरीन 980 सह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे किरीन 980 जगातील सर्वात नवीन हुआवई चिपसेट आहे.

मेट 20 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात तसेच स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट हुआवई मेट 20 ची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकारात कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत लेईकाचा एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हुआवई मेट 20 डुअल सिम सोबतच 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. कंपनी ने हा फोन आईपी 53 रेटिंग सह सादर केला आहे ज्यामुळे हा धूळ व पाणी रोधक आहे. सिक्योरिटी साठी हा फोन 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्नॉलजीला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट सह सुपरचार्ज टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई मेट 20 ग्रीन, मिडनाइट ब्लू, पिंक गोल्ड, ट्वाइलाइट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता मेट 20 चा 4जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 849 यूरो मध्ये लॉन्च झाला आहे. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत भारतीय करंसी नुसार क्रमश: 68,000 रुपये तसेच 72,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला हुआवई मेट 20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-launch-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
4,900एमएएच आणि 7.12-इंच डिस्प्ले सह समोर आला हुआवई चा नवीन फोन https://www.91mobiles.com/marathi/two-new-huawei-phone-listed-on-tenaa-with-4900mah-battery-water-drop-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/two-new-huawei-phone-listed-on-tenaa-with-4900mah-battery-water-drop-display-in-marathi/#respond Fri, 14 Sep 2018 13:42:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2134 टेना वर हुआवई चा आगामी स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे.

The post 4,900एमएएच आणि 7.12-इंच डिस्प्ले सह समोर आला हुआवई चा नवीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी हुआवई ने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन मायमँग 7 सादर केला आहे. हा फोन 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो आणि सध्या फक्त चीनी मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आज हुआवई चा अजून एक स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला आहे. टेना च्या या लिस्टिंग मध्ये हुआवई च्या आगामी फोन च्या लुक व डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण देण्यात आली आहे.

टेना वर हुआवई चा आगामी स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये एक फोन एआरएस-एएल00 मॉडेल नंबर ने लिस्ट झाला आहे तसेच दुसरा वेरिएंट एआरएस-टीएल00 मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. टेना च्या लिस्टिंग मधून हुआवई च्या या नवीन स्मार्टफोन च्या नावाची माहिती मिळाली नाही पण फोन समोर आल्यामुळे एवढे निश्चित झाले आहे की कंपनी लवकरच हा फोन जगासमोर आणेल.

हुआवईचा हा आगामी फोन टेना वर ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह दिसला आहे. एक मॉडेलचा बॅक पॅनल लेदर ने बनला आहे तर दुसरा ग्लास रियर पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा फोन 1080 x 2244 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 7.12-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाईल तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के असेल.

फोन मध्ये 4जीबी रॅम असेल, सोबतच हा फोन 1.95गीगाहर्ट्ज़ क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. टेना नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर केला जाईल. एआरएस-एएल00 मॉडेल नंबर वाल्या वेरिएंट मध्ये 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असेल तर एआरएस-टीएल00 मॉडेल नंबर वाल्या वेरिएंट मध्ये टेना वर फक्त 128जीबी स्टोरेज दाखवण्यात आली आहे.

हुआवई च्या दाखवण्यात आलेल्या फोटो मध्ये फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे जो टेना नुसार 16 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा असेल. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. आता हुआवई कधी आपला हा शानदार स्मार्टफोन आणेल आणि फोनची आॅफिशियल घोषणा करून कधी हा लॉन्च करेल याची वाट बघावी लागेल.

The post 4,900एमएएच आणि 7.12-इंच डिस्प्ले सह समोर आला हुआवई चा नवीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/two-new-huawei-phone-listed-on-tenaa-with-4900mah-battery-water-drop-display-in-marathi/feed/ 0
हुआवई ने लॉन्च केला 4 कॅमेरे असलेला फोन, 6जीबी रॅम सह चालतो लेटेस्ट एंडरॉयड वर https://www.91mobiles.com/marathi/huawei-maimang-7-launched-with-4-camera-sensor-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-maimang-7-launched-with-4-camera-sensor-price-specifications-in-marathi/#respond Wed, 12 Sep 2018 12:03:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2061 चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post हुआवई ने लॉन्च केला 4 कॅमेरे असलेला फोन, 6जीबी रॅम सह चालतो लेटेस्ट एंडरॉयड वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई वर संपूर्ण टेक बाजाराची नजर आहे. कंपनी ने जेव्हापासून ऑक्टोबर 16 ला हुआवई मेट 20 सीरीज सादर करण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून स्मार्टफोन यूजर्स चे लक्ष हुआवई वर आहे. चर्चा अशी आहे की मेट 20 आणि मेट 20 प्रो च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल तसेच मेट 20 लाइट च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर दोन-दोन कॅमेरा सेंसर असतील. मेट 20 सीरीज च्या आधी आपल्या फॅन्सना भेट देत हुआवई ने नवीन स्मार्टफोन मायमँग 7 आॅफिशियल केला आहे आणि हा फोन पण 4 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो.

हुआवई ने मायमँग 7 पण नवीन ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह किरीन 710 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला आहे तसेच ग्राफिक्स साठी हा माली-जी51 जीपीयू ला सपोर्ट करतो. मायमँग 7 मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत.

हुआवई मायमँग 7 डुअल सिम ला सपोर्ट करतो तसेच दोन्ही सिम वर 4जी वोएलटीई वापरता येईल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 3750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हुआवई मायमँग 7 ची किंमत 2399 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 25,300 रुपये आहे.

The post हुआवई ने लॉन्च केला 4 कॅमेरे असलेला फोन, 6जीबी रॅम सह चालतो लेटेस्ट एंडरॉयड वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-maimang-7-launched-with-4-camera-sensor-price-specifications-in-marathi/feed/ 0
16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-mate-20-pro-mate-20-lite-launching-on-16-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-mate-20-pro-mate-20-lite-launching-on-16-october-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 07:21:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1918 हुआवई आपली मेट सीरीज एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड पाई सह सादर करू शकते तसेच प्रोसेसिंग साठी यात हुआवई चा लेटेस्ट चिपसेट किरीन 980 देण्यात येईल.

The post 16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी 6जीबी रॅम आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह हुआवई च्या मेट स्मार्टफोन सीरीज चा आगामी स्मार्टफोन मेट 20 लाइट समोर आला होता. हा फोन समोर आल्यानंतर वाटले होते की कंपनी आईएफए 2018 च्या मंचावरून आपली आगामी स्मार्टफोन सीरीज सादर करेल आणि या सीरीज मध्ये मेट 20, मेट 20 लाइट आणि मेट 20 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पण झाले उलटेच, हुआवई ने आईएफए 2018 च्या प्लॅटफॉर्म वरून मेट 20 सीरीज लॉन्च न करता फक्त याची लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. हुआवई येत्या 16 ऑक्टोबरला मेट 20 सीरीज जगासमोर ठेवेल.

हुआवई ने घोषणा केली आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करेल आणि या ईवेंट मधून मेट 20 सीरीज समोर येईल. पण कंपनी ने लॉन्च डेट सोबत या सीरीज मध्ये कोण कोणते फोन असतील याची माहिती दिली नाही. परंतु आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हुआवई मेट सीरीज मध्ये मेट 20, मेट 20 लाइट आणि मेट 20 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल.

लीक्स नुसार हुआवई मेट 20 6.28-इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो तर मेट 20 प्रो मध्ये कर्व्ड ​डिस्प्ले सोबत रेगुलर नॉच ​दिली जाऊ शकते. तसेच मेट 20 लाइट 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशी पण चर्चा आहे की मेट 20 आणि मेट 20 प्रो च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच मेट 20 लाइट च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर दोन-दोन कॅमेरा सेंसर असतील.

हुआवई मेट 20 आणि मेट 20 प्रो मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल तसेच लीक्स नुसार तिन्ही मॉडेल्स च्या एका वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात येईल तसेच इंटरनल स्टोरेज 128जीबी ची असेल. हुआवई आपली मेट सीरीज एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड पाई सह सादर करू शकते तसेच प्रोसेसिंग साठी यात हुआवई चा लेटेस्ट चिपसेट किरीन 980 देण्यात येईल.

The post 16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-mate-20-pro-mate-20-lite-launching-on-16-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0