40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन

हुआवई ने गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपली मेट सीरीज वाढवत एक साथ चार स्मार्टफोन लॉन्च केले होते. या सीरीज मध्ये हुआवई मेट 20, मेट 20 प्रो, मेट 20एक्स आणि मेट 20 आरएस फोन्सचा समावेश होता. हुआवई मेट 20 सीरीज मध्ये कंपनीचे हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आहेत जे शानदार डिजाईन सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतात. हुआवई ने आधीच घोषणा केली आहे कि इंटरनेशनल मार्केट मध्ये हिट होणारे हे स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहेत. त्यानुसार आज हुआवई मेट 20 प्रो कंपनीच्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

हुआवई इंडिया वर मेट 20 सीरीजचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेज वर कंपनीचा नवीन स्मार्टफोन हुआवई मेट 20 प्रो दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हुआवई इंडियाच्या प्रोडक्ट पेज वर लिस्ट मेट 20 प्रो मध्ये 6जीबी रॅम मेमरी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यावरून स्प्ष्ट होते कि कंपनी भारतात मेट 20 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट आणण्याची तयारी करत आहे. हुआवई इंडिया ने अजूनतरी फोन लॉन्चची तारीख सांगितली नाही पण काही ​मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे कि मेट 20 प्रो 28 नोव्हेंबरला भारतीय बाजारात येईल.

हुआवई मेट 20 प्रो मध्ये ​3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 40—मेगापिक्सल + 20—मेगापिक्सल + 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा लेइका लेंस सह सादर केला आहे जी चांगल्या पिक्चर क्वालिटी साठी ओळखली जाते. त्याचबरोबर हा 3एक्स आॅप्टिकल झूमला सपोर्ट करतो. कॅमेरा सोबत तुम्हाला ओआईएस आणि ईआईएस सपोर्ट ​पण मिळेल. हा फोन 25—मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेर्‍यासह येतो जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा फेस रिकॉग्निशन साठी पण उपयोगी पडतो. शानदार कॅमेरा सोबतच या फोनची दुसरी खासियत आहे याची आॅपरेटिंग सिस्टम.

याचबरोबर फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट आहे जो 10 लेवल डायनेमिक प्रेशर सेंसेटिव आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जवळपास 30 टक्के फास्ट आहे. डिस्प्ले पाहता हुआवई मेट 20 प्रो मध्ये 6.39-इंचाची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे जी 1,440 x 3,120 पिक्सल वाल्या क्वाड एचडी डिस्प्ले सह येते. फोनचा स्क्रीन टू बॉडी ​रेशियो 87 परसेंटचा आहे आणि हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. हुआवई मेट 20 प्रो किरीन 980 चिपसेट वर चालतो जो हुआवई चा नवीन आणि ताकदवान चिपसेट आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,200 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज होते. किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात. हुआवई कधी मेट 20 प्रो भारतात लॉन्च करेल आणि या फोनचे कोणते मॉडेल देशात येतील यासाठी कंपनीच्या आॅफिशियल घोषणेची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here