4,900एमएएच आणि 7.12-इंच डिस्प्ले सह समोर आला हुआवई चा नवीन फोन

टेक कपंनी हुआवई ने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन मायमँग 7 सादर केला आहे. हा फोन 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो आणि सध्या फक्त चीनी मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आज हुआवई चा अजून एक स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला आहे. टेना च्या या लिस्टिंग मध्ये हुआवई च्या आगामी फोन च्या लुक व डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण देण्यात आली आहे.

टेना वर हुआवई चा आगामी स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये एक फोन एआरएस-एएल00 मॉडेल नंबर ने लिस्ट झाला आहे तसेच दुसरा वेरिएंट एआरएस-टीएल00 मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. टेना च्या लिस्टिंग मधून हुआवई च्या या नवीन स्मार्टफोन च्या नावाची माहिती मिळाली नाही पण फोन समोर आल्यामुळे एवढे निश्चित झाले आहे की कंपनी लवकरच हा फोन जगासमोर आणेल.

हुआवईचा हा आगामी फोन टेना वर ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह दिसला आहे. एक मॉडेलचा बॅक पॅनल लेदर ने बनला आहे तर दुसरा ग्लास रियर पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा फोन 1080 x 2244 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 7.12-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाईल तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के असेल.

फोन मध्ये 4जीबी रॅम असेल, सोबतच हा फोन 1.95गीगाहर्ट्ज़ क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. टेना नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर केला जाईल. एआरएस-एएल00 मॉडेल नंबर वाल्या वेरिएंट मध्ये 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असेल तर एआरएस-टीएल00 मॉडेल नंबर वाल्या वेरिएंट मध्ये टेना वर फक्त 128जीबी स्टोरेज दाखवण्यात आली आहे.

हुआवई च्या दाखवण्यात आलेल्या फोटो मध्ये फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे जो टेना नुसार 16 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा असेल. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. आता हुआवई कधी आपला हा शानदार स्मार्टफोन आणेल आणि फोनची आॅफिशियल घोषणा करून कधी हा लॉन्च करेल याची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here