Huawei Mate 40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-launched-with-5nm-kirin-9000-chip-specs/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-launched-with-5nm-kirin-9000-chip-specs/#respond Fri, 23 Oct 2020 12:40:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8641 कंपनीने एक साथ तीन नवीन फोन सादर केले आहेत जे Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हुआवईचे हे तिन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात.

The post लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HUAWEI ने काल रात्री टेक मंचावर टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘मेट 40 सीरीज’ सादर केली आहे. कंपनीने एक साथ तीन नवीन फोन सादर केले आहेत जे Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हुआवईचे हे तिन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. पुढे आम्ही हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

डिस्प्ले

Huawei Mate 40 Pro आणि Mate 40 Pro+ दोन्ही स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही फोन 2376 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.76 इंचाच्या फुलएचडी+ फ्लॅक्स ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हि स्क्रीन कर्व्ड एजेज सह येतात जो 88 डिग्री अँगल पर्यंत साईड पॅनलच्या दिशेने वळला आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर काम करतो आहे तसेच लेटेस्ट DCI-P3 HDR टेक्नोलॉजी सह येतो.

प्रोसेसिंग

हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो ईएमयूआई 11 सह चालतो. प्रोेसेसिंगसाठी फोन मध्ये 5नॅनोमीटर फेब्रिकेशन वर अबनलेला हुआवई चा सर्वात पावरफुल चिपसेट किरीन 9000 देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट अँड्रॉइड फोन्ससाठी बनलेला जगातील पहिला 5एनएम चिपसेट आहे जो डुअल मोड 5G (SA/NSA) ला सपोर्ट करतो. प्रोसेसिंग मध्ये या सीपीयू ची परफॉर्मन्स 25 टक्के पर्यंत तसेच एनपीयू ची परफॉर्मन्स 150 टक्क्यांपर्यंत फास्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम माली जी78 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च!

फोटोग्राफी

Huawei Mate 40 Pro+ पेंटा कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. या सेटअप मध्ये एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा Sony IMX700 प्राइमरी सेंसर, एफ/1.8 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर तसेच एक 3डी डेफ्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह एक टीओएफ लेंस देण्यात आली आहे.

Huawei Mate 40 Pro पाहता हा क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या Sony IMX700 प्राइमरी सेंसर सह एफ/1.8 अपर्चर असलेली 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन पण एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर आणि एक टीओएफ लेंसला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : या देशात आहे सर्वात फास्ट 5G स्पीड, क्षणात होईल संपूर्ण मूवी डाउनलोड

बॅटरी

Huawei Mate 40 Pro आणि Mate 40 Pro+ बाजारात 4,400एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केले गेले आहेत ज्या 66वॉट सुपरचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. तसेच वायरलेस पद्धतीने फास्ट चार्ज करण्यासाठी यात 50वॉट हुआवई वायरलेस सुपरचार्ज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हुआवईचे हे दोन्ही स्मार्टफोन रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे कि -5 डिग्री तापमानात पण फोन चार्जिंग विना सहज चालेल.

बेस्ट फीचर्स

हुआवई चे हे दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात. हे आईपी68 रेटेड स्मार्टफोन आहेत जे 5G सोबतच डुअल 4जी वोएलटीई वर चालतात. हे दोन्ही फोन हुआवई मोबाईल सर्विस वर चालतात म्हणजे यात गूगल प्ले स्टोर मिळणार नाही. Mate 40 Pro चे डायमेंशन 162.9×74.5×9.1एमएम आणि वजन 212ग्राम आहे. तसेच Mate 40 Pro+ चे डायमेंशन 162.9×74.5×8.8एमएम आणि वजन 230ग्राम आहे.

वेरिएंट्स व किंमत

HUAWEI Mate 40 Pro मार्केट मध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,199 म्हणजे 1,04,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच HUAWEI Mate 40 Pro+ कंपनीने 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,399 अर्थात् भारतीय करंसीनुसार 1,21,900 रुपयांच्या आसपास आहे.

The post लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-launched-with-5nm-kirin-9000-chip-specs/feed/ 0
Huawei Mate 40 Pro ताकदवान प्रोसेसर आणि 8GB रॅम सह झाला लिस्ट, 22 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-specifications-on-geekbench-set-to-debut-on-october-22/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-specifications-on-geekbench-set-to-debut-on-october-22/#respond Tue, 13 Oct 2020 14:49:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8502 सीरीज मध्ये Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ लॉन्च केला जाऊ शकतात, जे आतापर्यंत अनेक सर्टिफिकेशन साइट वर दिसले आहेत.

The post Huawei Mate 40 Pro ताकदवान प्रोसेसर आणि 8GB रॅम सह झाला लिस्ट, 22 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei Mate 40 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच असे समजले होते कि 22 ऑक्टोबरला हुवावेची नवीन सीरीज सादर केली जाईल. हुवावे कंज्यूमर बिजनेस सीईओ आणि हुवावे एग्जिक्यूटिव डायरेक्टर Richard Yu ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लॉन्च डेट सांगितली होती. या सीरीज मध्ये Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ लॉन्च केला जाऊ शकतात, जे आतापर्यंत अनेक सर्टिफिकेशन साइट वर दिसले आहेत. प्रो मॉडेलच्या लीक रेंडर्स मध्ये समजले होते कि हा फोन डुअल-पंच सेल्फी कॅमेरा आणि क्वाड कॅमेरा सेटअप सह येईल. तसेच आता Huawei Mate 40 Pro गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे, तिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

गीकबेंच वर हुवावे मेट 40 प्रो मॉडेल नंबर NOH-NX9 सह स्पॉट केला गेला आहे. तसेच या मॉडेल नंबर सह फोनला काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया टेलिकॉमच्या TÜV SÜD वर सर्टिफिकेशन मिळाले होते.

Huawei Mate 40 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Geekbench लिस्टिंग नुसार Mate 40 Pro नव्या Kirin 9000 चिपसेट वर सादर केला जाईल. लिस्टिंग मध्ये चिपसेटच्या नावाचा उल्लेख नाही. पण लिस्टिंग मध्ये सोर्स कोड वर Mali-G78 दिसले आहे जो 5nm प्रोसेस सह लिस्ट आहे. Kirin 9000 कंपनीचा पहिला 5nm SoC असेल जो ब्लिट-इन 5G मोडेम सह येऊ शकतो. बेंचमार्किंग साइट वर समोर आले आहे कि फोन मध्ये 8GB रॅम असेल. आशा आहे कि फोन कमी रॅम मध्ये पण येऊ शकतो.

Huawei Mate 40 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला जाऊ शकतो. यात हुवावेची ऍपगॅलरी ऍपस्टोर मिळेल. फोनला बेंचमार्किंग साइट वर सिंगल-कोर मध्ये 1020 आणि मल्टी कोर मध्ये 3710 स्कोर मिळाला आहे जे फ्लॅगशिप लेवल आहेत.

Huawei Mate 40 Pro च्या किंमतीसाठी आणि फुल स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला 22 ऑक्टोबर पर्यंतची वाट बघावी लागेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीकनुसार या फोन मध्ये मागे वर्तुळाकार क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यात एक 108MP सेन्सर असेल. तसेच Mate 40 सीरीज 66W फास्ट चार्जिंग सह सादर केला जाऊ शकतो.

ऑगस्ट मध्ये MIIT सर्टिफिकेशन वर हुवावे मेट 40 सीरीजच्या तीन मॉडेलची माहिती आली होती. माहितीमसूर पहिला फोन vanilla Huawei Mate 40 ज्याचे कोडनेम Ocean होते आणि मॉडेल नंबर OCE-AN00, दुसरा फोन Huawei Mate 40 Pro असू शकतो, ज्याचे कोडनेम Noah आणि मॉडेल नंबर NOH-AN00 होता. तिसरा व सीरीजचा प्रीमियम फोन कथितरित्या Mate 40 Pro+ असू शकतो, ज्याचा मॉडेल नंबर NOP-AN00 होता.

The post Huawei Mate 40 Pro ताकदवान प्रोसेसर आणि 8GB रॅम सह झाला लिस्ट, 22 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-specifications-on-geekbench-set-to-debut-on-october-22/feed/ 0