वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च!

OnePlus 8 सीरीजचा शेवटचा अपग्रेड वनप्लस 8टी लॉन्च झाल्यानंतर पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे OnePlus 9 बद्दल रिपोर्ट्स येण्यास सुरवात झाली आहे. बातमी अशी आहे कि पुढल्या वर्षी कंपनी ठरलेले वेळेच्या आधी OnePlus चा नेक्स्ट जेनेरेशन फ्लॅगशिप फोन लॉन्च करू शकते म्हणजे मार्च मध्ये फोन येऊ शकतो. यावर्षी OnePlus 8 सीरीज एप्रिल मध्ये सादर केला गेला होता. आता पर्यंत OnePlus ने फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे कि OnePlus 9 Lemonade कोडनेम देण्यात आले आहे.

टेक वेबसाइट Android Central ने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने माहिती देत सांगितले आहे कि OnePlus 9 मार्चच्या मध्यापर्यंत सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी मिड मार्च मध्ये एका इवेंटचे आयोजन करू शकते. पण अजून स्पष्ट झाले नाही कि इवेंट वर्चुअल असे कि नाही. दुसरीकडे वनप्लस कडून नवीन फोन बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

OnePlus ने OnePlus 8 सीरीज एप्रिल मध्ये लॉन्च केली होती. तर सहा महिन्यानंतर वनप्लस 8टी या सीरीज मध्ये सादर केला गेला. आशा आहे कि OnePlus 9 मध्ये OnePlus 8T मधील 65 वॉट फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले पॅनल सारखे काही फीचर्स दिले जाऊ शकतात. OnePlus 9 बाबत सध्या जास्त माहिती समोर आली नाही, पण पुढल्या काही दिवसांत याबाबत अजून लीक्स समोर येऊ शकतात.

वर सांगितल्याप्रमाणे एका टिप्सटरने माहिती दिली होती कि वनप्लस 9 चे कोडनेम ‘Lemonade’ असेल. गेल्या महिन्यात असे सांगण्यात आले होते फोनचे कोडनेम lemonade, lemonadep, lemonadept आणि lemonadev असू शकते. आशा आहे कि फोन चार वेरिएंट मध्ये येऊ शकतो.

हे देखील वाचा : OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत

अलीकडेच आलेल्या OnePlus 8T बद्दल बोलायचे तर यात 6.55-इंचाचा 120 हर्ट्ज फ्लयूड ऐमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. तसेच फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC प्रोसेसर सह येतो, या फोन मध्ये 16MP के सेल्फी कॅमेऱ्यासह 48MP सोनी IMX586 सेंसर, 16MP अल्ट्रा वाइड अँगल, 5MP मॅक्रो लेंस आणि 2MP मोनोक्रोम लेंस असलेला क्वॉड कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here