लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत

HUAWEI ने काल रात्री टेक मंचावर टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘मेट 40 सीरीज’ सादर केली आहे. कंपनीने एक साथ तीन नवीन फोन सादर केले आहेत जे Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हुआवईचे हे तिन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. पुढे आम्ही हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

डिस्प्ले

Huawei Mate 40 Pro आणि Mate 40 Pro+ दोन्ही स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही फोन 2376 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.76 इंचाच्या फुलएचडी+ फ्लॅक्स ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हि स्क्रीन कर्व्ड एजेज सह येतात जो 88 डिग्री अँगल पर्यंत साईड पॅनलच्या दिशेने वळला आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर काम करतो आहे तसेच लेटेस्ट DCI-P3 HDR टेक्नोलॉजी सह येतो.

प्रोसेसिंग

हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो ईएमयूआई 11 सह चालतो. प्रोेसेसिंगसाठी फोन मध्ये 5नॅनोमीटर फेब्रिकेशन वर अबनलेला हुआवई चा सर्वात पावरफुल चिपसेट किरीन 9000 देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट अँड्रॉइड फोन्ससाठी बनलेला जगातील पहिला 5एनएम चिपसेट आहे जो डुअल मोड 5G (SA/NSA) ला सपोर्ट करतो. प्रोसेसिंग मध्ये या सीपीयू ची परफॉर्मन्स 25 टक्के पर्यंत तसेच एनपीयू ची परफॉर्मन्स 150 टक्क्यांपर्यंत फास्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम माली जी78 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च!

फोटोग्राफी

Huawei Mate 40 Pro+ पेंटा कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. या सेटअप मध्ये एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा Sony IMX700 प्राइमरी सेंसर, एफ/1.8 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर तसेच एक 3डी डेफ्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह एक टीओएफ लेंस देण्यात आली आहे.

Huawei Mate 40 Pro पाहता हा क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या Sony IMX700 प्राइमरी सेंसर सह एफ/1.8 अपर्चर असलेली 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन पण एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर आणि एक टीओएफ लेंसला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : या देशात आहे सर्वात फास्ट 5G स्पीड, क्षणात होईल संपूर्ण मूवी डाउनलोड

बॅटरी

Huawei Mate 40 Pro आणि Mate 40 Pro+ बाजारात 4,400एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केले गेले आहेत ज्या 66वॉट सुपरचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. तसेच वायरलेस पद्धतीने फास्ट चार्ज करण्यासाठी यात 50वॉट हुआवई वायरलेस सुपरचार्ज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हुआवईचे हे दोन्ही स्मार्टफोन रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे कि -5 डिग्री तापमानात पण फोन चार्जिंग विना सहज चालेल.

बेस्ट फीचर्स

हुआवई चे हे दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात. हे आईपी68 रेटेड स्मार्टफोन आहेत जे 5G सोबतच डुअल 4जी वोएलटीई वर चालतात. हे दोन्ही फोन हुआवई मोबाईल सर्विस वर चालतात म्हणजे यात गूगल प्ले स्टोर मिळणार नाही. Mate 40 Pro चे डायमेंशन 162.9×74.5×9.1एमएम आणि वजन 212ग्राम आहे. तसेच Mate 40 Pro+ चे डायमेंशन 162.9×74.5×8.8एमएम आणि वजन 230ग्राम आहे.

वेरिएंट्स व किंमत

HUAWEI Mate 40 Pro मार्केट मध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,199 म्हणजे 1,04,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच HUAWEI Mate 40 Pro+ कंपनीने 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,399 अर्थात् भारतीय करंसीनुसार 1,21,900 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here