Huawei Nova 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 29 Jul 2019 09:13:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Nova 5i Pro, 8जीबी रॅम सह आहे 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-5i-pro-launched-with-quad-rear-camera-8gb-ram-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-5i-pro-launched-with-quad-rear-camera-8gb-ram-price-specifications/#respond Mon, 29 Jul 2019 09:13:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4915 हा फोन Nova 5i चा अपडेटेड वर्जन आहे जो पंच-होल डिस्प्ले सह पावरफुल स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

The post 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Nova 5i Pro, 8जीबी रॅम सह आहे 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei टेक मंचावर आपल्या नोवा सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन Nova 5, Nova 5i आणि Nova 5 Pro लॉन्च केले आहेत. काही दिवसांपासून बातमी येत होती कि हुआवई हि सीरीज वाढवत यात अजून एक नवीन डिवाईस Nova 5i Pro पण आणेल. त्यानुसार आज हुआवई ने हा नवीन स्मार्टफोन ऑफिशियल करत Nova 5i Pro चीनी बाजारात उतरवला आहे. हा फोन Nova 5i चा अपडेटेड वर्जन आहे जो पंच-होल डिस्प्ले सह पावरफुल स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

लुक व डिजाईन

Nova 5i Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे चौकोनी आकाराच्या सेटअप मध्ये आहेत. या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Nova 5i Pro च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Huawei ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

Huawei Nova 5i Pro 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन वापरत असताना डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी Huawei ने हा फोन TUV Rheinland सर्टिफाइड करून सादर केला आहे. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा एंडरॉयड 9.0 पाई आधारित ईएमयूआई वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या किरीन 810 चिपसेट वर चालेल.

हे देखील वाचा: Vivo Z1 Pro साठी बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध

कंपनीने Huawei Nova 5i Pro दोन वेरिंएट्स मध्ये आला आहे. फोनचा एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये माइक्रोएसडी कार्ड वापरता येतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nova 5i Pro च्या बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो सेंसर आहे.

Huawei Nova 5i Pro मध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन जीपीयू टर्बो 3.0 टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई आणि डुअल सिम सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन यूएसबी टाईपी सी पोर्ट सह 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

किंमत

Huawei Nova 5i Pro चा 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 2199 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे इंडियन करंसीनुसार जवळपास 22,000 रुपये आहेत. तसेच फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 2499 युआन आणि 8जीबी रॅम + 256जीबी मेमरी वेरिएंट 2799 युआन मध्ये आला आहे. या किंमती भारतीय करंसीनुसार क्रमश: 25,000 रुपये आणि 28,000 रुपयांच्या आसपास आहेत. Nova 5i Pro मीडनाईट ब्लॅक, आरोरा आणि एम्लार्ड ग्रीन कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Nova 5i Pro, 8जीबी रॅम सह आहे 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-5i-pro-launched-with-quad-rear-camera-8gb-ram-price-specifications/feed/ 0