चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो ने आता आपला नवीन स्मार्टफोन Vivo Z1 Pro ओपन सेल मध्ये उपलब्ध केला आहे. लॉन्च नंतर हा फोन कंपनी फ्लिपकार्ट आणि वीवो इंडिया ई-स्टोर वर फ्लॅश सेल द्वारे उपलब्ध करून देत होती.
याचा अर्थ असा कि Vivo Z1 Pro ग्राहक आता कधीही विकत घेऊ शकतात आणि त्यांना फ्लॅश सेलची वाट बघावी लागणार नाही. विशेष म्हणजे वीवो झेड1 प्रो याच महिन्यात भारतीय बाजारात 14,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला होता.
किंमत
फोनच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंटची किंमत 14,990 रुपये, 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 16,990 रुपये आणि 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या वेरियंटची किंमत 17,990 रुपये आहे. डिवाइस मिरर ब्लॅक, सॉनिक ब्लू आणि सॉनिक ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो.
स्पेसिफिकेशन्स
Vivo Z1 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन SD712 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज व 6जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्रफी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा आहे जो AI फेस ब्यूटी फीचर सह येतो. त्याचबरोबर फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मागे एक 16एमपी एफ/1.78 प्राइमरी कॅमेरा व 8एमपी एफ/2.2 सेकंडरी शूटर सह 2एमपी एफ/2.4 चा तिसरा सेंसर आहे.
फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येते. तसेच कंपनीने हा फोन खासकरून तरुणांसाठी डिजाइन केला आहे आणि हा मल्टी-टास्किंग फीचर्स सह येतो. त्याचबरोबर शानदार गेमिंग एक्सपीरियंस साठी फोन मध्ये गेम टर्बो आणि कूलिंग टर्बो फीचर देण्यात आला आहे. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.
वीवो झेड1 प्रो वीडियो














