4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने यावर्षीच्या सुरवातीला भारतीय मार्केट मध्ये Oppo A7 चा छोटा वेरिएंट लॉन्च केला होता. हा डिवइस 3जीबी रॅम सह 14,990 रुपयांमध्ये सादर केला होता. तसेच मार्केट मध्ये आधीपासूनच डिवाइसचा 4जीबी रॅम वाला वेरिएंट होता, जो 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्च झाल्यानंतर दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली होती.

पुन्हा एकदा कंपनीने हा डिवाइस मोठ्या वेरिएंट म्हणजे 4जीबी रॅम वेरिएंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 91मोबाईल्सला डिवाइसच्या किंमतीच्या कपातीची माहिती मोबाईल रिटेलर्स द्वारा मिळाली आहे. OPPO A7 चा 4GB + 64GB वेरिएंट ऑफलाइन स्टोर वर 12,990 मध्ये सेल केला जात आहे. फ्लिपकार्ट वर हा डिवाइस 13,990 रुपये आणि अमेझॉन इंडिया वर फोन 12,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे.

OPPO A7 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओपो ए7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली वॉटर ड्रॉप नॉच आहे. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ए7 हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कलरओएस 5.2 वर सादर करण्यात आला आहे तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

ओपो ए7 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ओपो ए7 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओपो ए7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी ओपो ने आपला नवीन फोन 4,230एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला आहे.

ओपो ए7 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here