HuaweiHuawei Mate 40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-5g-launched-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-5g-launched-specs-price-sale/#respond Fri, 23 Oct 2020 12:59:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8645 Huawei Mate 40 यूरोपीयन मार्केट मध्ये 899 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 78,400 रुपयांच्या आसपास आहे.

The post 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HUAWEI ने टेक मार्केट मध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘मेट 40 सीरीज’ सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन नवीन स्मार्टफोन Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ लॉन्च केले आहेत. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेली हि सीरीज सर्वात आधी यूरोप मध्ये सादर झाली आहे जी येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये पण येईल. हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस च्या माहिती साठी (इथे क्लिक करा). सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन हुआवई मेट 40 ची माहिती पुढे दिली आहे.

Huawei Mate 40

हुआवई मेट 40 स्मार्टफोन कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे 2376 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालते. तसेच हुआवईने आपल्या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच लेटेस्ट DCI-P3 HDR टेक्नोलॉजी दिली आहे.

Huawei Mate 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो ईएमयूआई 11 सह चालतो. प्रोेसेसिंगसाठी या फोन मध्ये हुआवईचा पावरफुल चिपसेट किरीन 9000ई देण्यात आला आहे जो सीपीयू आणि एनपीयू ची परफॉर्मन्स को बूस्ट करतो. ग्राफिक्ससाठी फोन एआरएम माली जी78 जीपीयूला सपोर्ट करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे ज्या सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च!

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हुआवई मेट 40 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस आणि 8 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेजर सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे.

Huawei Mate 40 डुअल मोड 5जी सोबतच 4जी वोएलटीईला पण सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. हा फोन आईपी53 रेटेड आहे जी याला धूळ आणि पाण्यापासून वाचवते. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई मेट 40 मध्ये 40वॉट सुपरचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Huawei Mate 40 यूरोपीयन मार्केट मध्ये 899 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 78,400 रुपयांच्या आसपास आहे. तसेच सीरीजचे इतर मॉडेल्स पाहता HUAWEI Mate 40 Pro मार्केट मध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,199 म्हणजे 1,04,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच HUAWEI Mate 40 Pro+ कंपनीने 12 जीबी रॅम सह 256 जीबी की इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,399 अर्थात् इंडियन करंसीनुसार 1,21,900 रुपयांच्या आसपास आहे.

The post 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-5g-launched-specs-price-sale/feed/ 0