Infinix Smart 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Feb 2021 13:30:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 7,199 रुपयांमध्ये झाला लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-launched-in-india-at-price-rs-7199-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-launched-in-india-at-price-rs-7199-specs-sale-offer/#respond Thu, 11 Feb 2021 13:30:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10008 इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक चिपसेटला सपोर्ट करतो जो 18 फेब्रुवारीपासून शाॅपिंग साइट फ्लिपकार्टवर विकत घेता येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 7,199 रुपयांमध्ये झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Infinix Smart 5 लाॅन्च केला आहे. आपल्या बाकीच्या डिवायसेजप्रमाणे इनफिनिक्सने स्मार्ट 5 पण लो बजेट मध्ये सादर केला आहे जो फक्त 7,199 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. शानदार लुक सोबतच इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक चिपसेटला सपोर्ट करतो जो 18 फेब्रुवारीपासून शाॅपिंग साइट फ्लिपकार्टवर विकत घेता येईल.

Infinix Smart 5

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता इनफिनिक्स स्मार्ट 5 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 440निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 काॅन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते जी 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. इनफिनिक्सने आपला फोन 90.6 स्क्रीन-टू-बाॅडी रेशियोवर लाॅन्च केला आहे.

हा फोन अँड्रॉइड 10 ‘गो’ एडिशनवर लॉन्च झाला आहे जो एक्सओएस 7 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात इनफिनिक्स स्मार्ट 5 स्मार्टफोन 2 जीबी रॅमवर लाॅन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा : Motorola ने लाॅन्च केला लो बजेट Moto E6i, अँड्रॉइड गो सह कमी रॅम मध्ये पण मिळेल स्मूद प्रोसेसिंग

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स स्मार्ट 5 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर क्वाॅड एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला देण्यात आला आहे त्याचबरोबर एक डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Smart 5 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या इनफिनिक्स फोन मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इंफिनिक्स स्मार्ट 5 व्हिडीओ

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 7,199 रुपयांमध्ये झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-launched-in-india-at-price-rs-7199-specs-sale-offer/feed/ 0
6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-india-launch-date-11-february-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-india-launch-date-11-february-with-6000mah-battery/#respond Tue, 02 Feb 2021 13:32:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9856 Infinix Smart 5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह इतर दोन 2 मेगापिक्सलच्या लेंस देण्यात आल्या आहेत.

The post 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix बाबत गेल्या आठवड्यातच बातमी आली होती कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करत आहे जो ‘Xclub’ वर व्हिडीओच्या माध्यमातून टीज केला गेला होता. आज इनफिनिक्सने आपल्या या आगामी मोबाईल फोनचे नाव आणि लॉन्च डेट पण सांगितली आहे. कंपनीने सांगितले आहे कि हा डिवायस Infinix Smart 5 नावाने भारतीय बाजारात येईल जो येत्या 11 फेब्रुवारीला मार्केट मध्ये लॉन्च होईल. इनफिनिक्सचा हा फोन 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Smart 5 येत्या 11 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीने सांगितले आहे कि हा मोबाईल फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल ज्याचे प्रोडक्ट पेज 7 फेब्रुवारीपासून लाईव होईल. इनफिनिक्स स्मार्ट 5 बद्दल कंपनीने अशी माहिती पण दिली आहे कि हा फोन Morandi Green, 6 degree Purple, Aegean Blue आणि Obsidian Black कलर मध्ये विकला जाईल. हा फोन 6,000एमएएच बॅटरीसह 6.82 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल.

Infinix Smart 5

इनफिनिक्स स्मार्ट 5 गेल्या वर्षी नायजेरिया मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता इनफिनिक्स स्मार्ट 5 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यात 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.6 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. नायजेरिया मध्ये हा फोन अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन वर लॉन्च झाला होता जो आक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम वर चालतो.

Infinix Smart 5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह इतर दोन 2 मेगापिक्सलच्या लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्ट 5 स्मार्टफोन 4जी वोएलटीई आणि डुअल सिमला सपोर्ट करतो, त्याचबरोबर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च

इनफिनिक्स स्मार्ट 5 बद्दल अधिकृतपणे सांगण्यात आले आहे कि भारतात हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केला जाईल. आशा आहे कि फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पण Infinix Smart 5 च्या आंतरराष्ट्रीय मॉडेल सारखे असतील. तसेच भारतीय बाजारात फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्ससह पण येऊ शकतो ज्याची बेस किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 11 फेब्रुवारीची वाट बघावी लागेल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-india-launch-date-11-february-with-6000mah-battery/feed/ 0
Infinix घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन, 6000एमएएच बॅटरीसह होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-to-launch-in-india-with-6000mah-battery-video-teaser-out/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-to-launch-in-india-with-6000mah-battery-video-teaser-out/#respond Mon, 01 Feb 2021 12:30:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9825 Infinix Smart 5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह इतर दोन 2 मेगापिक्सलच्या लेंस देण्यात आल्या आहेत.

The post Infinix घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन, 6000एमएएच बॅटरीसह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चे नाव त्या ब्रँड्स मध्ये येते जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येतात. आपले हे वैशिष्ट्ये कायम ठेवत इनफिनिक्स कंपनीने आता भारतात अजून एक नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. इनफिनिक्सने आपला हा आगामी स्मार्टफोन Xclub वर एक व्हिडीओच्या माध्यमातून टीज केला आहे. व्हिडीओ मध्ये ‘5’ नंबर हाईलाईट केला गेला आहे, त्यामुळे अंदाज लावला जात आहे कि हा स्मार्टफोन Infinix Smart 5 नावाने भारतीय बाजारात येईल.

Infinix Smart 5 च्या नावाबद्दल कंपनीने आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. पण व्हिडीओ मध्ये ‘5’ नंबर टीज केल्यामुळे बोलले जात आहे कि गेल्या वर्षी इंटरनॅशनल मार्केट मध्ये लॉन्च झालेला इनफिनिक्स स्मार्ट 5 मोबाईल फोन आता भारतीय बाजारात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. आशा आहे कि फेब्रुवारी सुरु होताच कंपनी Infinix Smart 5 आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टीज करेल आणि पुन्हा लवकरच हा फोन भारतीय बाजारात येईल.

Infinix Smart 5

इनफिनिक्स स्मार्ट 5 गेल्या वर्षी नायजेरिया मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता इनफिनिक्स स्मार्ट 5 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यात 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.6 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. नायजेरिया मध्ये हा फोन अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन वर लॉन्च झाला होता जो आक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम वर चालतो.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च

Infinix Smart 5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह इतर दोन 2 मेगापिक्सलच्या लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्ट 5 स्मार्टफोन 4जी वोएलटीई आणि डुअल सिमला सपोर्ट करतो, त्याचबरोबर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

इनफिनिक्स स्मार्ट 5 बद्दल सांगण्यात आले आहे कि भारतात हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केला जाऊ शकतो जो लो बजेट सेग्मेंट मध्ये येईल. Infinix Smart 5 कधी भारतात लॉन्च केला जाईल हि माहिती मिळताच वाचकांना कळवली जाईल. आशा आहे आहे कि इनफिनिक्स स्मार्ट 5 शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Infinix घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन, 6000एमएएच बॅटरीसह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-5-to-launch-in-india-with-6000mah-battery-video-teaser-out/feed/ 0