Infinix ने गेल्या महिन्यात भारतात आपल्या ‘हॉट 10’ सीरीज अंतगर्त Infinix Hot 10 लॉन्च केला होता जो फक्त 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सीरीजचा अजून एक फोन Infinix Hot 10 Lite नायजेरिया व इतर देशांमध्ये आणला आहे. आता बातमी येत आहे कि इनफिनिक्स कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे जो Infinix Hot 10 Play नावाने सादर केला जाईल.
Infinix Hot 10 Play अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे. तिथे हा फोन Infinix X688C मॉडेल नंबर सह सर्टिफाइड झाला आहे. बोलले जात आहे कि हॉट 10 प्ले सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. लिस्टिंगनुसार Infinix Hot 10 Play 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाईल आणि फोटोग्राफीसाठी पण फोनच्या बॅक पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर दिले जातील. तसेच हा फोन 10वॉट चार्जर सह बाजारात येणार असल्याचे एफसीसी वर समोर आले आहे.
Infinix Hot 10
इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे तसेच या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे.
हे देखील वाचा : लॉन्च झाला नोकियाचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन Nokia C1 Plus, बघा याचे शानदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. नवीन वेरिएंटच्या एंट्री नंतर हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर विकत घेता येईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआय लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हि बॅटरी पावर मॅरॅथॉन टेक्नोलॉजी सह येते जी बॅटरी लाइफला 25 टक्के पर्यंत वाढवते. फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
इनफिनिक्स हॉट 10 व्हिडीओ
















