Infinix बाबत गेल्या आठवड्यातच बातमी आली होती कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करत आहे जो ‘Xclub’ वर व्हिडीओच्या माध्यमातून टीज केला गेला होता. आज इनफिनिक्सने आपल्या या आगामी मोबाईल फोनचे नाव आणि लॉन्च डेट पण सांगितली आहे. कंपनीने सांगितले आहे कि हा डिवायस Infinix Smart 5 नावाने भारतीय बाजारात येईल जो येत्या 11 फेब्रुवारीला मार्केट मध्ये लॉन्च होईल. इनफिनिक्सचा हा फोन 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Infinix Smart 5 येत्या 11 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीने सांगितले आहे कि हा मोबाईल फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल ज्याचे प्रोडक्ट पेज 7 फेब्रुवारीपासून लाईव होईल. इनफिनिक्स स्मार्ट 5 बद्दल कंपनीने अशी माहिती पण दिली आहे कि हा फोन Morandi Green, 6 degree Purple, Aegean Blue आणि Obsidian Black कलर मध्ये विकला जाईल. हा फोन 6,000एमएएच बॅटरीसह 6.82 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल.
Infinix Smart 5
इनफिनिक्स स्मार्ट 5 गेल्या वर्षी नायजेरिया मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता इनफिनिक्स स्मार्ट 5 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यात 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.6 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. नायजेरिया मध्ये हा फोन अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन वर लॉन्च झाला होता जो आक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम वर चालतो.
Infinix Smart 5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह इतर दोन 2 मेगापिक्सलच्या लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्ट 5 स्मार्टफोन 4जी वोएलटीई आणि डुअल सिमला सपोर्ट करतो, त्याचबरोबर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च
इनफिनिक्स स्मार्ट 5 बद्दल अधिकृतपणे सांगण्यात आले आहे कि भारतात हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केला जाईल. आशा आहे कि फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पण Infinix Smart 5 च्या आंतरराष्ट्रीय मॉडेल सारखे असतील. तसेच भारतीय बाजारात फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्ससह पण येऊ शकतो ज्याची बेस किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 11 फेब्रुवारीची वाट बघावी लागेल.















