Infinix Zero 5G Turbo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:56:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 13GB RAM परवडणाऱ्या किंमतीत! Infinix Zero 5G Turbo आणि Zero 5G 2023 भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-turbo-and-infinix-zero-5g-2023-launched-in-india-know-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-turbo-and-infinix-zero-5g-2023-launched-in-india-know-price-specifications-sale-details/#respond Mon, 06 Feb 2023 05:32:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17504 इनफिनिक्सनं पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन युजर्ससाठी दोन नवीन 5जी फोन भारतात आणले आहेत. Infinix Zero 5G Turbo आणि Infinix Zero 5G 2023 ची भारतात एंट्री झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz screen, 50MP camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सारखे फीचर्स मिळतात. परंतु यात प्रोसेसर मात्र वेगवेगळे मिळतात. दोन्ही फोन्समध्ये 8GB फिजिकल रॅम आणि 5GB […]

The post 13GB RAM परवडणाऱ्या किंमतीत! Infinix Zero 5G Turbo आणि Zero 5G 2023 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
  • nfinix Zero 5G 2023 स्मार्टफोन MediaTek Dimensity 920 वर चालतो.
  • Infinix ZERO 5G 2023 Turbo मध्ये MediaTek Dimensity 1080 देण्यात आला आहे.

इनफिनिक्सनं पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन युजर्ससाठी दोन नवीन 5जी फोन भारतात आणले आहेत. Infinix Zero 5G Turbo आणि Infinix Zero 5G 2023 ची भारतात एंट्री झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz screen, 50MP camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सारखे फीचर्स मिळतात. परंतु यात प्रोसेसर मात्र वेगवेगळे मिळतात. दोन्ही फोन्समध्ये 8GB फिजिकल रॅम आणि 5GB वर्चुअल रॅम मिळून एकूण 13GB रॅमची ताकद मिळते. इनफिनिक्स झिरो 5जी 2023 तसेच झिरो 5जी टर्बोची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G Turbo Price

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे तसेच इनफिनिक्स झिरो 5जी टर्बो 19,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाइल फोन Pearly White, Coral Orange आणि Submariner Black कलरमध्ये 11 फेब्रुवारीपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होतील. हे दोन्ही स्मार्टफोन 8जीबी रॅमला सपोर्ट करतात. हे देखील वाचा: ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G Turbo चे specifications

  • 6.78″ FHD+ 120Hz Display
  • 50MP Triple camera
  • 16MP Selfie camera
  • 33W 5,000mAh battery
  • MediaTek Dimensity 920 (Zero 5G 2023)
  • MediaTek Dimensity 1080 (Zero 5G 2023 Turbo)

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 आणि इनफिनिक्स झिरो 5जी टर्बो स्मार्टफोन दोन्ही 2460 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आले आहेत. फोनची स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येते जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन स्क्रीन 500निट्स ब्राइटनेससह आली आहे.

दोन्ही इनफिनिक्स स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी प्रोसेसरसह येतात. झिरो 5जी 2023 मॉडेलमध्ये डिमेनसिटी 920 चिपसेट आहे तर झिरो 5जी टर्बो डिमेनसिटी 1080 वर चालतो. हे दोन्ही स्मार्टफोन 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतात, त्यामुळे इंटरनल 8जीबी रॅम 13जीबी पर्यंत वाढवता येतो. Zero 5G 2023 मध्ये 128जीबी स्टोरेज मिळते तर Zero 5G Turbo 256जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी हे दोन्ही इनफिनिक्स मोबाइल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोन्सच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो. हे देखील वाचा: 7 हजारांच्या येऊ शकतो मोटोरोलाचा सर्वात स्वस्त फोन; Moto E13 च्या भारतीय किंमतीचा खुलासा

Infinix Zero 5G Turbo आणि Infinix Zero 5G 2023 दोन्ही फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतात. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी 33वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. अँड्रॉइड 12, एक्सओएस 12, ब्लूटूथ 5.1, वायफाय6 व 3.5एमएम सारखे फीचर्स या 5जी फोन्समध्ये आहेत.

The post 13GB RAM परवडणाऱ्या किंमतीत! Infinix Zero 5G Turbo आणि Zero 5G 2023 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-5g-turbo-and-infinix-zero-5g-2023-launched-in-india-know-price-specifications-sale-details/feed/ 0