Moto E13 ची भारतीय किंमत झाली लीक; फ्लिपकार्टवरून लाँच डेटही समजली

Highlights

  • Moto E13 8 फेब्रुवारीला लाँच केला जाईल.
  • मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • भारतात Moto E13 ची किंमत 7,000 रुपयांच्या आत असू शकते.

Motorola नं अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Moto E13 युरोपियन बाजारात लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो लवकरच जगभरात लाँच केला जाऊ शकतो. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची एंट्री 8 फेब्रुवारीला होणार आहे. 13MP कॅमेरा, 6.5 इंचाचा डिस्प्ले, 2GB रॅम आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या कंपनीच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीची माहिती समोर आली आहे.

Moto E13 Price in India

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या मायक्रोसाइटवरून या स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी झाली आहे, तसेच काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. एका लीकनुसार या स्मार्टफोनची भारतातील किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. टिपस्टर देबायन रॉयनं दावा केला आहे की Moto E13 ची प्रारंभिक किंमत 6499 ते 6,999 रुपयांदरम्यान असू शकते. ही फोनच्या एकमेव 2GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत असू शकते. हे देखील वाचा: 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo चा 5G Phone लाँच; रेडमी-रियलमीची वाट लावणार का Oppo Reno 8T 5G?

युरोपियन बाजारातील Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 2GB + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 269पीपी आयला सपोर्ट करते. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर परिणाम होत नाही. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ सह लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. मोटो ई13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here