‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली

Highlights

  • OnePlus 11 5G स्मार्टफोन भारतात 7 फेब्रुवारीला लाँच होईल.
  • वनप्लसच्या या फोनची प्री-ऑर्डर लाँचच्या दिवशीच सुरु होईल.
  • हा स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये आधीच आला आहे.

OnePlus नं अखेरीस OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. चीनमध्ये 4 जानेवारीला आलेला हा स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात 7 फेब्रुवारीला लाँच होईल. कोरोनाच्या साथीनंतर वनप्लसचा हा पहिला ऑफलाइन इव्हेंट असेल. या इव्हेंटमध्ये वनप्लस फॅन्सना सहभागी व्हायचे असल्यास तिकिटे Paytm Insider वर उपलब्ध आहेत. OnePlus 11 पहिला फोन असेल ज्याला कंपनी चार वर्ष अँड्रॉइड अपडेट देणार आहे.

OnePlus 11 ची प्री-बुकिंग

OnePlus 11 5G स्मार्टफोनची प्री-ऑर्डर लाँचच्या दिवशीच सुरु होईल. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वरील एका टीजर पोस्टरवरून समजलं आहे की वनप्लसचा हा फोन 7 फेब्रुवारीलाच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. वनप्लसचा हा फोन चीनमध्ये आधी आल्यामुळे सर्व स्पेसिफिकेशन जगजाहीर झाले आहेत.

OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येते. OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

OnePlus 11 ची भारतातील किंमत

लीक रिपोर्ट्स OnePlus 11 स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. वनप्लसच्या या फोनचा 16GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट भारतात 61,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. तर फोनचा बेस व्हेरिएंट 8GB RAM रॅमसह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here