iPhone 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-holi-offer-effective-price-rs-41900-in-india-discount/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-holi-offer-effective-price-rs-41900-in-india-discount/#respond Thu, 25 Mar 2021 12:56:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10393 ऑफर डिटेल पाहता Apple iPhone 11 विकत घेताना एचडीएफसी बॅंक कार्डचा वापर केल्यावर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. तसेच ईजीईएमआय ऑप्शन निवडल्यास 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

The post 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple कंपनी त्या ब्रँड्सपैकी एक आहे ज्यांचे मोबाईल फोन सेकेंडहॅन्ड झाल्यानंतर पण त्यांची मागणी कायम राहते. नवीन आयफोनच्या चाहत्यांची कमतरता नाही पण जुना आयफोन पण कमी किंमतीत मिळत असतील तरीही ग्राहकांची रांग लागते. अश्याच ऍप्पल फॅन्ससाठी कंपनीने एक खास संधी आणली आहे ज्यात Apple iPhone 11 थेट 13,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. आयफोन 11 कमी किंमतीत आणि जास्त बेनिफिटसह विकत घेण्याची संधी होळी ऑफर अंतगर्त जारी केली गेली आहे जो ऍप्पल आयफोन विकत घेण्याची बेस्ट संधी आहे.

iPhone 11 विकत घेण्याची हि शानदार डिस्काउंट ऑफर ऍप्पल प्रीमियम रिसेलर ईमेजिनद्वारे जारी केला गेला आहे. या होळी स्पेशल ऑफरमध्ये ऍप्पल आयफोन 11 च्या खरेदीवर 13,000 रुपयांचे बेनिफिट मिळत आहेत. या ऑफरमध्ये 54,900 रुपयांची किंमत असलेला Apple iPhone 11 मोबाईल 41,900 रुपयांच्या इफेक्टिव प्राइसवर घेता येईल. कंपनीने हि स्कीम मर्यादित कालावधीसाठी जारी केली आहे ज्यात बॅंक ऑफरचा लाभ 27 मार्चपर्यंत मिळत आहे. हि ऑफर बेनिफिट iPhone 12 mini आणि iPhone 12 वर पण मिळत आहे ज्यांतर्गत या ऍप्पल फोन्सची किंमत क्रमश: 48,900 आणि 65,900 रुपये होते.

ऑफर डिटेल पाहता Apple iPhone 11 विकत घेताना एचडीएफसी बॅंक कार्डचा वापर केल्यावर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. तसेच ईजीईएमआय ऑप्शन निवडल्यास 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. आयफोन 11 विकत घेतल्यास कंपनी ग्राहकांना 8,000 रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट पण देत आहे ज्यात कंपनीच्या ऍक्सेसरीज मोफत दिल्या जातील. जे ग्राहक आयफोन 11 विकत घेताना जुना आयफोन देतील त्यांना 3,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस पण मिळेल. म्हणजे Apple iPhone 11 वर 16,000 रुपये पर्यंतचा फायदा मिळेल.

Apple iPhone 11

या फोन मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 828 x 1792 एचडी+ पिक्सल रेजल्यूशन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण ओलियोफोबिक कोटिंगचा वापर केला गेला आहे. आईओएस 13 ऑपरेटिंग आधारित या फोन मध्ये 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या Apple A13 Bionic चिपसेटचा वापर केला गेला आहे. कंपनीचा दावा आहे कि जुन्या चिपसेटच्या तुलनेत हि खूप अडवांस आहे. आईफोन 11 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे.

कॅमेरा पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. याचा मेन सेंसर 12 एमपी चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच दूसरा सेंसर पण 12 एमपी चा आहे. जो अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.4, अपर्चर सह येतो. सेल्फीसाठी या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी आहे कि यावेळी फ्रंट कॅमेऱ्यात पण स्लोमोशन वीडियो रेकॉर्डिंग सपोर्ट आहे.

ऍप्पल आयफोन 11 व्हिडीओ

The post 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-holi-offer-effective-price-rs-41900-in-india-discount/feed/ 0
बॉक्स मधून iPhone काढून ठेवत होते वीट आणि साबण, एक-एक करून चोरले 1 कोटीचे 78 फोन https://www.91mobiles.com/marathi/2-amazon-warehouse-worker-arrested-steal-78-phones-apple-iphone-11-pro-samsung/ https://www.91mobiles.com/marathi/2-amazon-warehouse-worker-arrested-steal-78-phones-apple-iphone-11-pro-samsung/#respond Mon, 21 Dec 2020 13:28:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9387 अनलॉक मध्ये सामाजिक अंतर राखून काम करण्याचा फायदा घेत iPhone 11 व iPhone 11 Pro चोरी करायला यांनी सुरवात केली. मोबाईल काढून ते रिकामा बॉक्स वेयरहाउस मध्ये ठेवत होते. त्यांनी 76 iPhone व 2 Samsung चे मोबाईल चोरले.

The post बॉक्स मधून iPhone काढून ठेवत होते वीट आणि साबण, एक-एक करून चोरले 1 कोटीचे 78 फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेकदा अश्या बातम्या ऐकायला येतात कि नवीन आणि महाग मोबाईल फोन ऑनलाईन शॉपिंग साइट वरून ऑर्डर केला जातो पण बॉक्स मधून साबण, वीट किंवा इतर कचरा निघतो. अश्याप्रकारच्या घटनांमध्ये सर्वात जास्त आलोचना त्या ई-कॉमर्स वेबसाइटची होते जिथून सामान विकत घेतले जाते. यावेळी पुन्हा अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पण या बातमी मध्ये कोणाला महाग स्मार्टफोनच्या बदल्यात साबण मिळाला नाही तर ज्याने आयफोनच्या बॉक्स मधून फोन काढून साबण ठेवला होता त्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. हैराणीची बाब अशी कि इथे एक किंवा दोन फोन नाही तर 1 कोटीच्या मोबाईल फोन्सचा घोटाळा केला गेला आहे.

प्रकरण असे आहे कि अमेझॉन इंडियाचे एक वेयर हाऊस मेवात मध्ये आहे. Apple आणि Samsung सारख्या अनेक मोठ्या कंपन्या इथे आपल्या सामानाचा स्टॉक ठेवतात जेणेकरून कोणीही अमेझॉन वर फोन ऑर्डर केला तर थेट वेयर हाऊस मधून तो डिलिव्हर केला जाईल. या वेयर हाऊस मध्ये मोबाईल कंपन्या नाही तर शॉपिंग साइट्सचे कर्मचारी स्वतःच फोन इत्यादींची पॅंकिंग करतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. या प्रक्रिया मध्ये डिलिव्हरी फास्ट होते आणि खर्चा पण कमी लागतो.

मीडिया रिपोर्टनुसार इथे काम करणाऱ्या अंसार-उल-हक आणि नवाब नावाचे दोन कर्मचारी अनेक महिन्यांपासून वेयर हाऊस मधील महागडे स्मार्टफोन्स चोरत होते. हे लोक iPhone च्या बॉक्स मधून मोबाईल फोन काढून त्यात साबण आणि वीट सारख्या गोष्टी भारत होते आणि त्यानंतर ते पॅक करून पुन्हा स्टॉक मध्ये ठेवत होते. हे दोन्ही कर्मचारी काही दिवसांच्या अंतराळाने एक-एक दोन-दोन मोबाईल फोन लपूनछपून काढत होते आणि कोणाला समजत नव्हते. तुम्हाला ऐकून हैराणी होईल कि काही महिन्यांमध्ये या दोघांनी 78 मोबाईल फोन स्टॉक मधून काढले ज्यांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : देशात सापडले आहेत 33 लाख नकली Xiaomi प्रोडक्ट्स, तुम्ही पण अडकला नाहीत ना या जाळ्यात

अमेझॉन वेयर हाऊसच्या अधिकाऱ्यांना जेव्हा सतत फोनच्या बॉक्स मध्ये मोबाईलच्या जागी दुसऱ्या गोष्टी मिळण्याच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा त्यांनी तपास केला. या तपासानंतर समजले कि अनेक मोबाईल फोन्सचे रिटेल बॉक्स खाली आहेत आणि त्यात स्मार्टफोन नाहीतच. जेव्हा हिशोब करण्यात आला तेव्हा समजले कि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाईल फोन गायब आहेत. पोलिसांनी तपासाला सुरवात केली तेव्हा दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली ज्यांनी काही दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती. चौकशी केल्यावर दोन्ही आरोपींनी कबूल केले कि त्यांनीच अमेझॉनला कोटींचा साबण.. माफ करा.. चुना लावला आहे.

क्राइम ब्रांचने दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्याकडून 38 मोबाईल फोन जप्त केले आहेत ज्यांची किंमत 50 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. तसेच इतर मोबाईल फोन्सची दोन्ही तरुणांनी विल्हेवाट लावली आहे. या 78 मोबाईल फोन्स मध्ये 76 Apple आणि 2 Samsung चे फोन असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पोलिसांना या घोटाळ्यात अजून लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. तपास अजून सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाने फक्त ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना नव्हे तर सेलर आणि स्वतः अमेझॉन वाल्यांना पण धक्का दिला आहे.

पोलिसांचे विधान :

सहायक पोलीस आयुक्तांच्यानुसार दोन्ही आरोपी सप्टेंबर 2018 पासून अमेझॉन वेयरहाउस (जमालपुर) मध्ये नोकरी करत होते. अनलॉक मध्ये सामाजिक अंतर राखून काम करण्याचा फायदा घेत iPhone 11 व iPhone 11 Pro चोरी करायला यांनी सुरवात केली. मोबाईल काढून ते रिकामा बॉक्स वेयरहाउस मध्ये ठेवत होते. त्यांनी 76 iPhone व 2 Samsung चे मोबाईल चोरले. चोरीचे मोबाईल विकण्यासाठी त्यांचे दोन साथीदार त्यांना मदत करत होते, ज्यांच्याकडे 40 मोबाईल विकण्यासाठी देण्यात आले होते. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी कामावर जाणे बंद केले होते.

The post बॉक्स मधून iPhone काढून ठेवत होते वीट आणि साबण, एक-एक करून चोरले 1 कोटीचे 78 फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/2-amazon-warehouse-worker-arrested-steal-78-phones-apple-iphone-11-pro-samsung/feed/ 0
Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-iphone-xr-se-2020-price-cut-in-india-after-12-series-launch/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-iphone-xr-se-2020-price-cut-in-india-after-12-series-launch/#respond Wed, 14 Oct 2020 14:16:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8518 प्राइस कट नंतर बाजारात उपलब्ध असलेले Apple iPhones कमी किंमतीत विकत घेता येतील.

The post Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने खूप प्रतीक्षेनंतर काल रात्री आपली ‘आयफोन 12’ सीरीज सादर केली आहे. कंपनीने एक साथ 4 नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत जे Apple iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हे चारही फोन्स 5G ला सपोर्ट करतात. ऍप्पलने आयफोन 12 सीरीज भारतात ऑफिशियल केली आहे आणि प्राइस व सेल डेटची घोषणा पण झाली आहे. नेहमीपरामें यावेळी पण नवीन iPhone सीरीज येताच ऍप्पलने आपल्या जुन्यात आयफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. या प्राइस कट नंतर बाजारात उपलब्ध असलेले Apple iPhones कमी किंमतीत विकत घेता येतील.

Apple iPhone 11

सर्वप्रथम ऍप्पल आयफोन 11 सीरीज पाहता भारतात Apple iPhone 11 तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 128 जीबी स्टोरेज आणि तिसऱ्या वेरिएंट मध्ये 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ऍप्पलने या आयफोनच्या किंमतीत जवळपास 15,000 रुपयांची मोठी कपात केली आहे.

iPhone 11 चा 64 जीबी स्टोरेज मॉडेल आतापर्यंत 68,300 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण प्राइस कट नंतर या मॉडेलची किंमत कमी होऊन 54,900 रुपये झाली आहे. तसेच Apple iPhone 11 ची किंमत 73,600 रुपये होती लेककिंमत कमी झाल्यानंतर या मॉडेलची किंमत 59,900 रुपये झाली आहे. 256 जीबी स्टोरेज असलेला iPhone 11 बाजारात 84,100 रुपयांमध्ये विकला जात होता, लपरंतु किंमतीत कपातीनंतर या मॉडेलची प्राइस 69,900 रुपये झाली आहे.

Apple iPhone SE 2020

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या ऍप्पल आयफोन एसई 2020 ची किंमत पण कंपनीने कमी केली आहे. विशेष म्हणजे हा आयफोन आधीच ऍप्पलच्या सर्वात स्वस्त मोबाईल फोन्स पैकी एक होता, आता कंपनीने 3,500 रुपयांच्या आसपास किंमत कमी करून हा iPhone अजून अफॉर्डेबल बनवला आहे. हा फोन तीन मॉडेल्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

iPhone SE 2020 चा बेस मॉडेल 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या मॉडेलची किंमत 42,500 होती जी किंमतीत कपात झाल्यामुळे कमी होऊन 39,900 रुपये झाली आहे. तसेच आयफोन एसई 2020 चा दुसरा मॉडेल 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मॉडेल 47,800 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता पण आता प्राइस कटनंतर हा 44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 256 जीबी स्टोरेज असलेल्या Apple iPhone SE 2020 ची किंमत पण 58,300 रुपयांवरून 54,900 रुपये करण्यात आली आहे.

Apple iPhone XR

iPhone 12 सीरीज लॉन्च केल्यानंतर ऍप्पलने गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या iPhone XR च्या किंमतीत पण कपात केली आहे. आयफोन एक्सआर चा 64 जीबी स्टोरेज मॉडेल आधी 52,500 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण प्राइस कट नंतर या मॉडेलची किंमत 47,900 रुपये झाली आहे. तसेच Apple iPhone XR के 128 जीबी मेमरी मॉडेलची किंमत आधी 57,800 रुपये होती, आता या फोनची किंमत कमी होऊन 52,900 रुपये झाली आहे.

The post Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-iphone-xr-se-2020-price-cut-in-india-after-12-series-launch/feed/ 0
Apple iPhone 11 विकत घेण्याची सुवर्णसंधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही हा फोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-discount-on-amazon-prime-day-sale/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-discount-on-amazon-prime-day-sale/#respond Fri, 07 Aug 2020 09:46:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7753 Apple iPhone 11 वर 8 हजार रुपयांपेक्षा पण जास्त सूट मिळत आहे तसेच हा फोन आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

The post Apple iPhone 11 विकत घेण्याची सुवर्णसंधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple चे आईफोन प्रीमियम कॅटेगरी मध्ये येतात. आईफोन्सच्या महाग किंमतीमुळे लोक यांना स्टेटस सिंबल पण समजतात. ऍप्पलचे लेटेस्ट मोबाईल फोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे आहेत. यातील आईफोन 11 सर्वात छोटा मॉडेल आहे जो किंमतीच्या बाबतीत पण इतर दोन मॉडेल्स पेक्षा स्वस्त आहे. आईफोन लवर्ससाठी हा फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी आली आहे. Apple iPhone 11 वर 8 हजार रुपयांपेक्षा पण जास्त सूट मिळत आहे तसेच हा फोन आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Apple iPhone 11 अमेझॉन प्राइम डे 2020 सेल मध्ये जबरदस्त डिस्काउंट सह विकला जात आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट आतापर्यंत 68,300 रुपयांपर्यंत विकला जात होता. पण अमेझॉन वर चालू सेल मध्ये या फोनवर 8,400 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंट नंतर आईफोन 11 59,900 रुपयांपर्यंत विकत घेता येईल. हा डिस्काउंट फोनच्या सर्व कलर वेरिएंट Purple, Green, RED, Yellow, Black आणि White वर लागू आहे.

विशेष म्हणजे हि किंमत Apple iPhone 11 ची भारतातील आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. त्यामुळे ज्या यूजरना हा फोन घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आईफोन 11 विकत घेण्याची सर्वोत्तम संधी आहे. अमेझॉन प्राइम डे मध्ये हा फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण विकला जात आहे. तसेच एचडीएफसी आणि आईसीआईसी बँकेच्या कार्डधारकांना अतिरिक्त सूट पण प्राप्त मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत iPhone 11 च्या खरेदीवर 11,200 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.

Apple iPhone 11

या फोन मध्ये तुम्हाला 6.1 इंचाची नॉच स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 828 x 1792 एचडी+ पिक्सल रेजल्यूशन सह सादर केला आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन स्क्रॅचप्रूफ आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण ओलियोफोबिक कोटिंगचा वापर केला गेला आहे. आईओएस 13 ऑपरेटिंग आधारित या फोन मध्ये 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या Apple A13 Bionic चिपसेटचा वापर केला गेला आहे. कंपनीचा दावा आहे कि जुन्या चिपसेटच्या तुलनेत हि खूप अडवांस आहे. आईफोन 11 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे.

कॅमेरा पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. याचा मेन सेंसर 12 एमपी चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच दूसरा सेंसर पण 12 एमपी चा आहे. जो अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.4, अपर्चर सह येतो. सेल्फीसाठी या फोन मध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी आहे कि यावेळी फ्रंट कॅमेऱ्यात पण स्लोमोशन वीडियो रेकॉर्डिंग सपोर्ट आहे.

ऍप्पल आईफोन 11 वीडियो

The post Apple iPhone 11 विकत घेण्याची सुवर्णसंधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-discount-on-amazon-prime-day-sale/feed/ 0
विना चार्जर चार्ज होईल आगामी आयफोन 11 आणि सोबत असतील अनेक दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-come-with-wireless-charging/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-come-with-wireless-charging/#respond Mon, 25 Mar 2019 10:42:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3916 ऍप्पल या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विस लॉन्च करू शकते

The post विना चार्जर चार्ज होईल आगामी आयफोन 11 आणि सोबत असतील अनेक दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पल यावर्षी आपला नेक्स्ट जनरेशन आयफोन लॉन्च करेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कंपनी आपला नवीन आयफोन सप्टेंबर मध्ये जगासमोर आणण्यासाठी इवेंटचे आयोजन करेल. परंतु, लॉन्चच्या आधी नेहमीप्रमाणे नवीन आयफोन संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. रिपोर्टनुसार आयफोन 11 मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग सपॉर्ट दिला जाईल.

एका रिपोर्टनुसार यावर्षी सादर केल्या जाणाऱ्या आयफोन 11 मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर दिला जाईल. हा काही नवीन फीचर नाही. याआधी अनेक कंपन्यांनी अशाप्रकारचा फीचर आपल्या फोन मध्ये दिला आहे. मार्केट मध्ये रिवर्स चार्जिंग सह हुआवई मेट 20 आधीपासूनच उपलब्द आहे. याचा अर्थ असा कि तुम्ही तुमच्या फोनने दुसरा फोन वायरलेस चार्ज करू शकता. जर हा रिपोर्ट खरा ठरला तर येत्या काळात तुम्ही रिवर्स चार्जिंग फीचरचा वापर करून आपले आयफोनने इतर ऍप्पल डिवाइस चार्ज करू शकाल. रिपोर्टनुसार कंपनी यात 18वॉट फास्ट चार्जरचा वापर करेल.

तसेच कंपनी आयफोन एसई2 बद्दल पण चर्चा आहे कि कंपनी हा लॉन्च करू शकते. कंपनी ने साल 2016 मध्ये आपला सेकेंड जेनरेशन स्मार्टफोन आयफोन एसई लॉन्च केला होता. बोलले जात आहे कि आगामी आयफोन एसई2 मध्ये गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या आयफोन 10एस आणि 10आर प्रमाणे नॉच असेल. याबद्दल ऍप्पल कडून पक्की माहिती मिळाली नाही.

विशेष म्हणजे ऍप्पल आज म्हणजे 25 मार्च 2019 ला स्टीव जॉब्स थियेटर मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंटची टॅगलाइन इट्स शो टाइम अशी आहे. इवेंट बद्दल आधीपासूनच चर्चा आहे कि ऍप्पल या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विस लॉन्च करू शकते. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार ऍप्पल इवेंट मध्ये दोन प्रकारची वीडियो स्ट्रीमिंग सर्विस सुरु करेल ज्यात एक टीवी सब्सक्रिप्शन आणि दुसरी वीडियो सर्विस असेल. ऍप्पल ने अनेक प्रोडक्शन हाउस आणि प्रोड्यूसरशी वीडियो कंटेंट साठी हात मिळवणी पण केली आहे.

आज होणाऱ्या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विसच्या लॉन्चिंगची चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे कंपनी ने मीडिया इनवाइट मध्ये इट्स शो टाइम टॅगलाइन वापरली होती. इवेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सुरु होईल.

सोर्स

The post विना चार्जर चार्ज होईल आगामी आयफोन 11 आणि सोबत असतील अनेक दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-come-with-wireless-charging/feed/ 0
पुन्हा येत आहे अॅप्पल सर्वांना टक्कर द्यायला, आयफोन 11 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-listed-on-geekbench-with-ios-12-4gb-ram-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-listed-on-geekbench-with-ios-12-4gb-ram-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 02 Jul 2018 07:32:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1118 गीकबेंच वर आयफोन 11 ला सिंगल-कोर मध्ये 4673 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 10912 स्कोर देण्यात आला आहे.

The post पुन्हा येत आहे अॅप्पल सर्वांना टक्कर द्यायला, आयफोन 11 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या आठवड्यात अॅप्पल बद्दल बातमी आली होती ज्यात कंपनी च्या आगामी आयफोन ची रेंडर ईमेज शेयर करण्यात आली होती. अॅप्पल बद्दल सांगण्यात आले होते की कंपनी यावर्षी एक साथ तिन नवीन आयफोन सादर करेल आणि तिन्ही फोन आयफोन 10 सारखा नॉच डिस्प्ले वाले असतील. आज अॅप्पल चा नवीन आयफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे तिथे ‘आयफोन 11’ नावाने नवीन डिवाईस लिस्ट करण्यात आला आहे.

अॅप्पल आयफोन 11 ची ही लिस्टिंग 27 जून ची आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चा मॉडल नंबर आयफोन 11,2 असा लिहिण्यात आला आहे. गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये दाखविण्यात आलेला फोन अॅप्पल द्वारा लॉन्च केल्या जाणार्‍या 3 आयफोंस मधील एक आहे. लिस्टिंग मध्ये फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. ज्यानुसार हा आयफोन अॅप्पल च्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम आईओएस 12.0 वर चालेल.

आयफोन 11,2 नाव असलेल्या या फोन मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ​लिस्टिंग मधून समजले आहे की हा फोन 2.49गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या 6-कोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच नुसार नवीन आयफोन मध्ये डी321एपी मदरबोर्ड मिळू शकतो. गीकबेंच वर आयफोन 11 ला सिंगल-कोर मध्ये 4673 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 10912 स्कोर देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे अॅप्पल बद्दल बोलले जात आहे की सप्टेंबर मध्ये कंपनी तिन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस नॉच डिस्प्ले वाले असतील. दोन ​आयफोन ओएलईडी डिस्प्ले सह येतील ज्यात 6.5-इंच आणि 5.8-इंचाची स्क्रीन मिळू शकते. तर एक 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह येऊ शकतो.

The post पुन्हा येत आहे अॅप्पल सर्वांना टक्कर द्यायला, आयफोन 11 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-listed-on-geekbench-with-ios-12-4gb-ram-feature-specifications-in-marathi/feed/ 0