टेक विश्वातील दिग्गज कंपनी ऍप्पल यावर्षी आपला नेक्स्ट जनरेशन आयफोन लॉन्च करेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कंपनी आपला नवीन आयफोन सप्टेंबर मध्ये जगासमोर आणण्यासाठी इवेंटचे आयोजन करेल. परंतु, लॉन्चच्या आधी नेहमीप्रमाणे नवीन आयफोन संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. रिपोर्टनुसार आयफोन 11 मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग सपॉर्ट दिला जाईल.
एका रिपोर्टनुसार यावर्षी सादर केल्या जाणाऱ्या आयफोन 11 मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर दिला जाईल. हा काही नवीन फीचर नाही. याआधी अनेक कंपन्यांनी अशाप्रकारचा फीचर आपल्या फोन मध्ये दिला आहे. मार्केट मध्ये रिवर्स चार्जिंग सह हुआवई मेट 20 आधीपासूनच उपलब्द आहे. याचा अर्थ असा कि तुम्ही तुमच्या फोनने दुसरा फोन वायरलेस चार्ज करू शकता. जर हा रिपोर्ट खरा ठरला तर येत्या काळात तुम्ही रिवर्स चार्जिंग फीचरचा वापर करून आपले आयफोनने इतर ऍप्पल डिवाइस चार्ज करू शकाल. रिपोर्टनुसार कंपनी यात 18वॉट फास्ट चार्जरचा वापर करेल.
तसेच कंपनी आयफोन एसई2 बद्दल पण चर्चा आहे कि कंपनी हा लॉन्च करू शकते. कंपनी ने साल 2016 मध्ये आपला सेकेंड जेनरेशन स्मार्टफोन आयफोन एसई लॉन्च केला होता. बोलले जात आहे कि आगामी आयफोन एसई2 मध्ये गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या आयफोन 10एस आणि 10आर प्रमाणे नॉच असेल. याबद्दल ऍप्पल कडून पक्की माहिती मिळाली नाही.
विशेष म्हणजे ऍप्पल आज म्हणजे 25 मार्च 2019 ला स्टीव जॉब्स थियेटर मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंटची टॅगलाइन इट्स शो टाइम अशी आहे. इवेंट बद्दल आधीपासूनच चर्चा आहे कि ऍप्पल या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विस लॉन्च करू शकते. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार ऍप्पल इवेंट मध्ये दोन प्रकारची वीडियो स्ट्रीमिंग सर्विस सुरु करेल ज्यात एक टीवी सब्सक्रिप्शन आणि दुसरी वीडियो सर्विस असेल. ऍप्पल ने अनेक प्रोडक्शन हाउस आणि प्रोड्यूसरशी वीडियो कंटेंट साठी हात मिळवणी पण केली आहे.
आज होणाऱ्या इवेंट मध्ये वीडियो स्ट्रीमिंग सर्विसच्या लॉन्चिंगची चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे कंपनी ने मीडिया इनवाइट मध्ये इट्स शो टाइम टॅगलाइन वापरली होती. इवेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सुरु होईल.