Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत

Apple ने खूप प्रतीक्षेनंतर काल रात्री आपली ‘आयफोन 12’ सीरीज सादर केली आहे. कंपनीने एक साथ 4 नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत जे Apple iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हे चारही फोन्स 5G ला सपोर्ट करतात. ऍप्पलने आयफोन 12 सीरीज भारतात ऑफिशियल केली आहे आणि प्राइस व सेल डेटची घोषणा पण झाली आहे. नेहमीपरामें यावेळी पण नवीन iPhone सीरीज येताच ऍप्पलने आपल्या जुन्यात आयफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. या प्राइस कट नंतर बाजारात उपलब्ध असलेले Apple iPhones कमी किंमतीत विकत घेता येतील.

Apple iPhone 11

सर्वप्रथम ऍप्पल आयफोन 11 सीरीज पाहता भारतात Apple iPhone 11 तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 128 जीबी स्टोरेज आणि तिसऱ्या वेरिएंट मध्ये 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ऍप्पलने या आयफोनच्या किंमतीत जवळपास 15,000 रुपयांची मोठी कपात केली आहे.

iPhone 11 चा 64 जीबी स्टोरेज मॉडेल आतापर्यंत 68,300 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण प्राइस कट नंतर या मॉडेलची किंमत कमी होऊन 54,900 रुपये झाली आहे. तसेच Apple iPhone 11 ची किंमत 73,600 रुपये होती लेककिंमत कमी झाल्यानंतर या मॉडेलची किंमत 59,900 रुपये झाली आहे. 256 जीबी स्टोरेज असलेला iPhone 11 बाजारात 84,100 रुपयांमध्ये विकला जात होता, लपरंतु किंमतीत कपातीनंतर या मॉडेलची प्राइस 69,900 रुपये झाली आहे.

Apple iPhone SE 2020

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या ऍप्पल आयफोन एसई 2020 ची किंमत पण कंपनीने कमी केली आहे. विशेष म्हणजे हा आयफोन आधीच ऍप्पलच्या सर्वात स्वस्त मोबाईल फोन्स पैकी एक होता, आता कंपनीने 3,500 रुपयांच्या आसपास किंमत कमी करून हा iPhone अजून अफॉर्डेबल बनवला आहे. हा फोन तीन मॉडेल्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

iPhone SE 2020 चा बेस मॉडेल 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या मॉडेलची किंमत 42,500 होती जी किंमतीत कपात झाल्यामुळे कमी होऊन 39,900 रुपये झाली आहे. तसेच आयफोन एसई 2020 चा दुसरा मॉडेल 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मॉडेल 47,800 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता पण आता प्राइस कटनंतर हा 44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 256 जीबी स्टोरेज असलेल्या Apple iPhone SE 2020 ची किंमत पण 58,300 रुपयांवरून 54,900 रुपये करण्यात आली आहे.

Apple iPhone XR

iPhone 12 सीरीज लॉन्च केल्यानंतर ऍप्पलने गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या iPhone XR च्या किंमतीत पण कपात केली आहे. आयफोन एक्सआर चा 64 जीबी स्टोरेज मॉडेल आधी 52,500 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण प्राइस कट नंतर या मॉडेलची किंमत 47,900 रुपये झाली आहे. तसेच Apple iPhone XR के 128 जीबी मेमरी मॉडेलची किंमत आधी 57,800 रुपये होती, आता या फोनची किंमत कमी होऊन 52,900 रुपये झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here