iPhone 14 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Sep 2022 19:50:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-launched-knwo-price-features-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-launched-knwo-price-features-sale-offer/#respond Wed, 07 Sep 2022 18:31:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12907 Apple iPhone 14 Launch: बहुप्रतीक्षित iPhone 14 सीरिज आज लाँच झाली आहे. कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून Apple Watch Series 8, नवीन AirPods Pro सह नवीन iPhones सादर केले आहेत. दिग्गज टेक कंपनी Apple नं आपली सर्वात नवीन आणि अ‍ॅडव्हान्स आयफोन 14 सीरीज (iPhone 14 Series) लाँच केली आहे. नवीन अ‍ॅप्पल आयफोन सीरिजमध्ये iPhone 14, […]

The post iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 14 Launch: बहुप्रतीक्षित iPhone 14 सीरिज आज लाँच झाली आहे. कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून Apple Watch Series 8, नवीन AirPods Pro सह नवीन iPhones सादर केले आहेत. दिग्गज टेक कंपनी Apple नं आपली सर्वात नवीन आणि अ‍ॅडव्हान्स आयफोन 14 सीरीज (iPhone 14 Series) लाँच केली आहे. नवीन अ‍ॅप्पल आयफोन सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल लाँच झाले आहेत. यातील iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये जुनीच नॉच डिजाईन देण्यात आली आहे.

Apple iPhone 14 Price

अ‍ॅप्पल आयफोन 14 ची प्रारंभिक किंमत 79900 रुपये आहे ज्यात 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच iPhone 14 256GB Storage मॉडेल 89,900 रुपये आणि iPhone 14 512GB Storage ऑप्शन 1,09,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा आयफोन भारतात midnight, blue, starlight आणि purple कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हेंचर प्रेमी भटक्यांसाठी खास Apple Watch Ultra; म्युजिक प्रेमींसाठी शानदार Apple AirPods Pro 2 लाँच

Apple iPhone 14 Plus Price

आयफोन 14 प्लस देखील तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. iPhone 14 Plus 128GB Price 89,900 रुपये आहे. iPhone 14 Plus 256GB Storage मॉडेल 99,900 रुपये आणि iPhone 14 Plus 512GB Storage व्हेरिएंट 1,19,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा आयफोन देखील midnight, blue, starlight आणि purple कलरमध्ये विकत घेता येईल.

Apple iPhone 14 Camera

ब्रँड व्यतिरिक्त आयफोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं फिचर म्हणजे या फोनचा कॅमेरा. जगभरातील चाहते अ‍ॅप्पल आयफोन त्याच्या शानदार फोटोग्राफीसाठी विकत घेतात. iPhone 14 मध्ये देखील 12 मेगापिक्सलचा शानदार रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/1.5 अपर्चरसह चालतो. आयफोन 14 चा कॅमेरा 49 टक्क्यांपर्यंत जास्त चांगली लो-लाईट परफॉर्मन्स देऊ शकतो.

या फोनमध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन सेल्फी कॅमेरा ऑटोफोकस फिचरसह सादर करण्यात आला आहे. हा कॅमेरा एफ/1.9 अपर्चरसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शानदार ग्रुप फोटो कॅप्चर करता येतील.

Apple iPhone 14 Performance

नवीन अ‍ॅप्पल आयफोन 14 दमदार पावर देण्यात आली आहे. Apple नं आपला नवीन iPhone 14 Bionic A15 processor सह बाजारात आणला आहे. हा प्रोसेसर 6 कोर सीपीयू तसेच 5 कोर जीपीयूसह चालतो. तसेच लेटेस्ट iOS 16 सह फोनची परफॉर्मन्स बूस्ट होते.

iPhone 14 Connectivity

अ‍ॅप्पल आयफोन 14 सीरीज पूर्णपणे 5G सह येते. नवीन iPhone 14 आणि iPhone 14 Plus दोन्ही 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात आले आहेत तसेच या दोन्ही मोबाइल फोन्समध्ये eSIM support देण्यात आला आहे. म्हणजे कोणत्याही फिजिकल सिमविना फोनवर सेल्युलर कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच दोनपेक्षा जास्त सिम प्रोफाइल देखील तुम्ही स्टोर करून ठेऊ शकता. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM! 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Vivo Y75s 5G Phone लाँच

iPhone 14 SOS Via Satellite

IPhone 14 सीरिजच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन सेफ्टी फिचर देण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीनं रेंज नसलेल्या ठिकाणहून देखील मेसेज पाठवून आपत्कालीन मदत मागवता येईल. यासाठी सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात येईल. ही सेवा फक्त इमर्जन्सी वापरासाठी आहे, यावरून कॉल करता येणार नाही. दोन वर्षांसाठी ही सेवा मोफत असेल. SOS Via Satellite फिचर फक्त यूएसए आणि कॅनडामध्ये वापरता येईल.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus Display

आयफन 14 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तर आयफोन 14 प्लस मध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. ही सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रीन आहे जी ओएलईडी टेक्नोलॉजीवर आधारित आहे. डॉल्बी व्हिजनसह नवीन आयफोन्समधील डिस्प्ले 1200निट्स ब्राइटनेस व 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो.

The post iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-launched-knwo-price-features-sale-offer/feed/ 0