विवोनं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात गणेशत्सोवानिमित्त एक शानदार ऑफर सादर केली होती. या ऑफर अंतर्गत V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. तर तिकडे आपल्या होम मार्केट चीनमध्ये कंपनीनं आपल्या वाय सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Vivo Y75s 5G आहे जो 12GB RAM, MediaTek Dimensity 700, 64MP Camera आणि 18W 5,000mAh Battery सारख्या शक्तिशाली स्पेसिफकेशन्ससह आला आहे. विवो वाय75एस 5जी फोन सध्या चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल, परंतु लवकरच याची एंट्री भारतीय बाजारात देखील होईल.
Vivo Y75s 5G Specifications
विवो वाय75एस 5जी फोन 20.07:9 अॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन डिस्प्लेमध्ये 401पीपीआय, 16.7एम कलर आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो देण्यात आला आहे. हे देखील वाचा: iPhone वर बंदी! छोट्याशा वस्तूमुळे iPhone 14 लाँच आधीच Apple जोरदार धक्का
फोटोग्राफीसाठी Vivo Y75s 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. Vivo Y75s 8MP Selfie Camera ला सपोर्ट करतो.
Vivo Y75s 5G Phone अँड्रॉइड 11 वर आधारित ओरिजन ओएस ओशियनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी विवो वाय75एस 5जी फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 4जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो, त्यामुळे स्मार्टफोनच्या मोठ्या व्हेरिएंटमध्ये एकूण 16GB रॅमची ताकद मिळवता येते.
Vivo Y75s ड्युअल सिम फोन आहे तसेच 5जी व 4जी दोन्ही नेटवर्क वर चालतो. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर साइड पॅनलवर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. हे देखील वाचा: भन्नाट! 13 हजारांच्या आत गेमिंग स्मार्टफोन; 8GB RAM रॅमसह नवीन Vivo Y22 लाँच, जाणून घ्या किंमत
Vivo Y75s 5G Price
विवो वाय75एस 5जी दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस CNY 1899 म्हणजे भारतीय करंसीनुसार 21,700 रुपयांच्या आसपास आहे. तर Vivo Y75s चा 12GB RAM + 256GB Storage मॉडेल CNY 2199 म्हणजे जवळपास 25,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

















