अॅप्पलनं आज, 7 सप्टेंबरला आपल्या Far Out इव्हेंटमधून Apple Watch Series 8 सादर केली आहे. तसेच या सीरिजमध्ये Apple Watch SE आणि एक नवीन Apple Watch Ultra देखील बाजारात आणलं आहे. तसेच संगीत प्रेमींना खुश करत कंपनीनं शानदार Apple AirPods Pro 2 देखील लाँच केले आहेत. चला जाणून घेऊया या प्रॉडक्ट्सचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Apple Watch Series 8
नवीन वॉच सीरीज 8 डस्ट प्रूफ, स्विम प्रूफ आणि क्रॅक प्रूफ आहे. यात जुने ECG सेन्सर आणि A-Fib डिटेक्शन सारखे फीचर्स तर आहेतच परंतु नव्याने Temperature Sensor, Crash Detection, Low Power Mode आणि International Roaming सारखे फीचर्स जोडण्यात आले आहेत. Temperature Sensor च्या मदतीनं महिलेच्या आरोग्यावर जास्त लक्ष देता येईल आणि शरीराच्या तापमानवरून पीरियडची सुरुवात कधी होईल हे सांगता येईल. Apple Watch Series 8 च्या GPS मॉडेलची किंमत 399 डॉलर (सुमारे 31,800 रुपये) आहे आणि GPS + Cellular मॉडेलची किंमत 499 डॉलर (सुमारे 39,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: अॅडव्हेंचर प्रेमी भटक्यांसाठी खास Apple Watch Ultra; म्युजिक प्रेमींसाठी शानदार Apple AirPods Pro 2 लाँच
Apple Watch SE
नवीन वॉच सीरिज सोबत सेकंड-जेन Apple Watch SE देखील बाजारात आलं आहे. या वॉचमध्ये सीरीज 8 मधील फीचर्स मिळतात यात क्रॅश डिटेक्शन आणि फॅमिली सेटअपचा समावेश आहे. Apple Watch Series 8 प्रमाणे Watch SE मध्ये S8 चिपचा वापर करण्यात आला आहे. हे वॉच 16 सप्टेंबरपासून विकत घेता येईल. Apple Watch SE च्या GPS मॉडेलची किंमत 249 डॉलर (सुमारे 19,900 रुपये) आहे आणि GPS + Cellular मॉडेलची किंमत 299 डॉलर (सुमारे 23,900 रुपये) आहे. यह 16 सप्टेंबर से सेल वर जाएगी.
Apple Watch Ultra
Apple Watch Ultra खास करून अॅडव्हेंचर प्रेमींसाठी सादर करण्यात आलं आहे. यात साधारण अॅप्पल वॉचच्या तुलनेत मोठी स्क्रीन मिळते. या नव्या आणि दणकट वॉचमध्ये चांगल्या कॉलिंग क्वॉलिटीसाठी दोन स्पिकर आणि तीन मायक्रोफोन्स मिळतात. याचा वापर हातात ग्लव्ज घालून देखील करता येतो. अॅप्पलनं हे घड्याळ एक्सट्रीम अॅथलीट आणि एक्सपर्ट डाइवर्ससाठी डिजाइन केलं आहे. Apple Watch Ultra ची किंमत 799 डॉलर (सुमारे 63,700 रुपये) आहे.
AirPods Pro 2
एयरपॉड्स प्रो 2 मध्ये नवीन H2 चिपचा वापर करण्यात आला आहे. नेक्स्ट जेनरेशन AirPods Pro 2 मध्ये पर्सनलाइज्ड स्पॅशियल ऑडियो, हाय बँडविथ कनेक्टिव्हिटी आणि दुप्पट बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर देखील दुप्पट करण्यात आला आहे. तुमची आयफोन कॅमेराच्या मदतीनं पर्सनलाइज्ड साउंड प्रोफाईल बनवू शकता. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM! 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Vivo Y75s 5G Phone लाँच
नवीन एयरपॉड्स प्रो 2 मध्ये 30 तासांचा म्यूजिक प्लेबॅक टाइम मिळेल. फाईंड माय फिचर मदतीनं आता चार्जिंग केस देखील शोधता येईल, जिच्यात स्पिकर्स देखील देण्यात आले आहेत. नवीन AirPods Pro 2 लाइटनिंग पोर्टसह MagSafe, Qi आणि अॅप्पल वॉच चार्जरनं चार्ज करता येतील. Apple AirPods Pro 2 आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होतील. तसेच 23 सप्टेंबरपासून यांची खरेदी करता येईल. याची किंमत 299 डॉलर्स (सुमारे 19,900 रुपये) आहे.